आ पल्याला माहित आहे का , सर्वात मोठा रोग कोणता आहे ? हा रोग म्हणजे लोक काय म्हणतील ? प्रत्येक माणसाची दोन रुपे असतात , एक त्याचे खरे रुप ज्याला तो फक्त स्वत: जाणतो आणि दुसरे रुप जे तो लोकांसाठी जगतो. पहिले रुप हे बालवयातच उत्पन्न होते. ज्यात ना कशाची चिंता असते , ना भिती. या वयात काहीही करण्याची तयारी असते. काही तरी नविन शिकण्याची ईच्छा आणि उमेद असते. पण व्यक्ती जस-जशी मोठी होत जाते तस-तशे स्वत:च्या विचारांचे दमन व्हायला सुरुवात होते आणि हळू-हळू लोक आपले विचार थोपवायला सुरुवात करतात. काळाच्या ओघात व्यक्तीचे बालपणीचे पहिले रुप कुठेतरी लुप्त होते आणि दुसरे रुप उदयाला येते जे लोकांच्या विचारानूसार असायला हवे. मग ती प्रत्येक वेळी वागताना , बोलताना एकच विचार करायाला लागते , लोक काय म्हणतील ? कधी-कधी तर लोकांच्या काही म्हणायच्या अगोदर व्यक्ती स्वत:च लोक काय म्हणतील ? हे ठरवते. मी कोण आहे , मला काय हव , मी काय बनू ईच्छीतो हे सगळ विसरून लोकांच्या मतानूसार जगायला सुरुवात करते. आपल्यातील ९० टक्के लोकांना यामुळे कधी जीवन जगण्यातील ख-या आनंदाला तर कधी मोठया यशाला मुकावे लागते. मी अशा अ...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.