देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या सत्तर वर्षानंतर प्रथमच भारतीय समाज आणि राजकारण दोन गटात विभागल्यासारखी अवस्था निर्माण झाली आहे.एकीकडे हिंदू राष्ट्र निर्मितीची धारणा घेवून चालणा-या संघटना आहेत ज्यांना २०१४ च्या लोकसभा निवडणूकीनंतर सत्तेवर मजबूत पकड बनवून ठेवली आहे.ज्यांच्या विचारधारेचे आधार आपले प्राचिन ग्रंथ रामायण , महाभारत , वेद आणि उपनिषद आहेत तर दूस-या गटात असे राजकिय पक्ष आहेत जे असे मानतात की , भारतीय राजकारण १९५० च्या भारतीय घटनेच्या मूळ संरचनेच्या आधारावर चालले पाहिजे आणि सत्तेचा आधार स्वातंत्र्य , समानता आणि सहिष्णुता सारखी मूल्ये असली पाहिजेत. प्रश्न हा आहे की , भारताला केवळ हिंदू राष्ट्राच्या रूपात बघितल जावू शकत का ? भाजपाची वैचारिक धारा ही संघ परिवाराला अनुसरून राहिली आहे.यासाठी संघ परिवाराच्या वैचारिक अभियानाला रोखणे हेच एकमेव उद्दिष्ट अशा विरोधी पक्षांचे बनत चालले आहे जे सामाजिक विविधतेचे समर्थक आहेत आणि पूर्ण देशाला सोबत घेवून चालू ईच्छितात. संघ परिवाराच्या विचारधारेचा विरोध करणारे हे विरोधी पक्ष केंद्र आणि राज्यांतील भाजपाचा विजय रथ रोखू ईच्छितात मात्र त्यांच्य...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.