म ला हे बघून आश्चर्य वाटते की , लोक कस सहजरित्या आपल्या निष्पाप मुलांचे बालपण , त्यांची संवेदनशिलता आणि जिज्ञासा हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण मुलांना मशिन बनवण्यासाठी , एका व्यवस्थेचा भाग बनवण्यासाठी किती उत्सुक आहोत. अशा व्यस्थेचा भाग तयार करून देण्यासाठी आपल्या सरकारने जागो-जागी कारखाने तर खोलून ठेवलेच आहेत , ज्यांना हुकूमशाही आणि भांडवलशाही प्रवृत्तीचे लोक मोठया तत्परतेने चालवित आहेत. अशा कारखाण्यांत व्यवस्था जशाच तशी ठेवण्यासाठी आपले डोळे बंद करून चालणारी मोठी खेप तयार केली जात आहे. मी ठोसपणे सांगू शकतो की , सध्याची ही शिक्षण व्यवस्था कधीच असा समाज तयार करू शकत नाही ज्याच्यात मानवता , रचनात्मकता आणि प्रगतीशिलता असेल आणि मला असे वाटते की , आपण या समस्येला सध्या तोंड देत आहोत. आपण निष्पाप बालकांच्या को-या मनावर कट्टरता , अवैज्ञानिकता आणि असा अभ्यासक्रम लादत आहोत ज्याचा त्यांच्या भविष्याशी काही एक देणे-घेणे नाही. त्यांची ईच्छा आणि परवानगीशिवाय आपण असा अभ्यासक्रम छापत चाललो आहोत. भूछत्रा सारख्या जागो-जागी उगवलेल्या या शाळांमध्ये बालकांकडून त्यांचे स्...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.