मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

कशासाठी?भाकरीसाठी....

आ पण सर्वांची धडपड ही दोन वेळची भाकर मिळवण्यासाठी चालू असते. ही भाकर मिळवण्यासाठी एखादा व्यवसाय , नौकरी करावी लागते किंवा रोजगार मिळवावा लागतो. अर्थातच ही सोय आपल्या गावातच होते असे नाही त्यामुळे आपले पोट भरण्यासोबतच जीवनमान उंचावण्यासाठी मला किंवा आपल्यापैकी अनेकांना आपल घर , गाव , शहरच नाही तर देश सुद्धा सोडावा लागला आहे. हि परिस्थिती केवळ आजची नाही तर मानव विकासाच्या प्रक्रियेत ही यात्रा सतत सुरू आहे.               पोटासाठी लोक हसत-हसत विस्थापितांच जीवन निवडतात अस म्हटल्यास वावग ठरणार नाही. माझे चुलते , भाऊ आणि अनेक स्वकियांनी भाकरीच्या शोधात आपल घर सोडल , त्यांचा निवासाचा पत्ता बदलला आणि जो जिथ गेला तिथलाच होवून राहिला तोही कायमचाच. ही वास्तविकता मानवी गरज आणि विकासाचा अभिन्न अंग झाली आहे. या गोष्टीला कोणीच नाकारणारही नाही. भाकरीचा शोध ही अशी बाब आहे ज्याला कोणी दूर्लक्षित करू शकत नाही. ही भाकर कुठे मिळेल याचा अंदाज सूरूवातीला कोणीच करू शकत नाही. हे काळच निश्चित करतो की आपल्याला कोठे जावे लागेल.आपला जन्म कुठे...

आता इंटरनेट अडिक्शनची भीती

ल वकरच  भारतामध्ये ५ जी इंटरनेट सुविधा सुरू करण्यासाठी हालचाली होत असल्याचे वृत्त आले आहे. भारतात इंटरनेटचा प्रसार झपाटयाने होत आहे. प्रतीदिन १.५ जीबी इंटरनेट सुविधा अत्यल्प दरात भेटत असल्याने भारतीय तरूणांना बेरोजगारीची जाणिव होत नसल्याचे मागे कुठेतरी माझ्या वाचनात आले होते. ही बाब वास्तविकतेपासून तरूणांना दूर करणारी आणि गंभीर आहे. भारतीय तरूणांमध्ये एकीकडे बेरोजगारी वाढत चालली आहे तर दूसरीकडे मोठया संख्येने तरूण इंटरनेट अडिक्शनकडे वाटचाल करित आहेत. सध्या देशाची एक मोठी संख्या स्मार्टफोन , इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या साइबर अडिक्शनची शिकार झाली आहे. यामुळे युवकात बेरोजगारी तसेच देशाच्या वास्तविक समस्यांच्या प्रती विचार करण्याची आणि त्यांना समजून घेण्याची क्षमता संपत आहे. इंटरनेट अडिक्शने केवळ भारतच नाही तर जगातील अनेक देश आता त्रस्त झाले आहेत. नुकतेच कैंब्रीज एनालिटिका कंपनीने फेसबुक वरिल डेटा लीक करून याचा वापर डोनाल्ड ट्रंप यांना विजयी करण्यासाठी केल्याची बाब समोर आली. तरूणांमधील इंटरनेट अडिक्शनचाच फायदा या कंपनीने घेतला.तरूणांचे व्यक्तीगत आकडे आता एखादया व्यक्तीला अथवा क...

जगण्याची अनिच्छा आणि मृत्यूची इच्छा

म हाभारताच्या कथेमध्ये जादूच्या तलावाच्या शेजारी बेशुद्ध पडलेल्या आपल्या चार भावांकडे पाहत असलेल्या युधिष्ठिराला यक्षाने विचारले होते की , सर्वात मोठे आश्चर्य काय आहे? युधिष्ठिराने उत्तर दिले की , प्रत्येक माणसाला हे माहित असते की , त्याचा मृत्यू हा निश्चित आहे मात्र तरीही प्रत्येक जण असा जगतो जस त्याचा मृत्यू हा कधीच येणार नाही. आपल्या जन्मासोबतच मृत्यूसुद्धा निश्चित झालेला असतो. जीवन आपल्या मृत्यूला पूढे ढकलत असते. आपण वाढदिवसाला शुभेच्छा देतो मात्र गुरु रविंद्रनाथ टागोर यांनी म्हटले होते की , वाढदिवसाच्या शुभेच्छा कशासाठी ? आयुष्य तर एका वर्षांनी घटले आहे. भगवान गौतम बुद्धांना सुद्धा बालपणीच ज्ञात झाले होते की , म्हातारपण येते त्यासोबत आजारपण येते आणि मृत्यू सुद्धा होतो.मृत्यू पासून कितीही दूर पळा तो कोणालाही टळलेला नाही. एका इराकी कथेनूसार बगदाद मध्ये एक व्यक्ती घराबाहेर पडली आणि त्याला वाटेतील एका चौकात आपला मृत्यू उभा असलेला दिसला. तो पळत घरी परत आला आणि आपल्या मालकाला म्हणाला की , माझा मृत्यू मी चौकात उभा असलेला पाहिला आहे. आपण मला आपला घोडा दयावा जेणेकरून मला समाराला ...

आपण सगळेच प्रेमाचे हत्यारे

अ नुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या प्रेम संबंधाची परिणीती लग्नामध्ये झाली या गोष्टीला जास्त दिवस झाले नाहीत..त्यांच्या लग्नाची चर्चा संपूर्ण देशात त्यावेळी मोठया उत्साहाने होत होती. त्यांची पहिली भेट ते लग्नापर्यंतच्या प्रवासाची चर्चा सगळ्या न्यूज चॅनल , वर्तमानपत्रे  आणि सोशल मीडियावर घडवून आणली जात होती.आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या लग्नाच्या स्वागत सभारंभाला हजेरी लावून या नवविवाहित दांपत्याला भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.या जोडीचा एक-एक फोटो प्रेमाच्या यशस्वीतीचे उदाहरण म्हणून बघीतले जावू लागले. मात्र याच्या काही दिवसानंतर आणि वैलंटाइंस दिवसाच्या अगोदर अंकित नावाच्या तरूणाची दूस‌-या धर्माच्या मुलीसोबत प्रेम करण्याचा गुन्हा केल्यामुळे खुलेआम हत्येची बातमी येते तिही देशाची राजधानी दिल्लीत घडलेली.एकीकडे आपला समाज प्रेमाचा आनंद साजरा करतो तर दूसरीकडे याच प्रेमाला सहन करू शकत नाही हा किती विरोधाभास आहे. याचा अर्थ असा की , प्रेम चित्रपटात , सेलीब्रेटीजचे किंवा इतर कुणाचे असेल तर ते चांगले वाटते मात्र आपल्या कुटुंबात त्याने आपले पाय पसरू नयेत. आपल्या घराचा उ...

बाहेर सगळेच वाघ असतात पण घरात .......

सं कट कधीच सांगून येत नाही.ज्या गोष्टींबाबत कधी आपल्या पूर्वजांनीही कधी विचार केला नसेल त्याही अचानक संकटात येतात. जगात वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत त्याप्रमाणे संकटेही वेगवेगळ्या प्रकारची असतात हे आपल्याला विसरून चालणार नाही.सरळ शब्दात सांगायचे झाल्यास जग हे नानाविध संकटांनी आणि त्यांचा सामना करणा-या शूर-विरांनी भरलेले आहे.नुकतेच काहीं दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधिशांनी पत्रकार परिषद घेवून त्यात ज्याप्रकारे लोकशाही संकटात असल्याची आशंका व्यक्त केली त्यामुळे मला सुद्धा नैतीक बळ मिळाले आहे की , मी सुद्धा माझ्या वैवाहिक जीवनातील संकटांबाबत काही गोष्टी आपल्यासमोर ठेवू ईच्छीतो. या जगात मी काही एकटा पति नाही जो या संकटाला झेलत असेल. जवळपास सर्व प्रकारचे पति या संकटाला झेलत रोजचे जीवन जगत , मरत व्यतीत करीत आहेत.माझे हे वैयक्तीक मत आहे की , वैवाहिक जीवनातील अडचणी संकटापेक्षा वेगळ्या नाहीत. या संकटाची तलवार सतत डोक्यावर लटकत असते.पति होण्याच्या नात्याने या संकटाला मी रोज कसे तोंड देतो हे माझे मलाच माहित. पहिल्यांदा मलाही वाटत होते की , वैवाहिक जीवनात आनंद ही आनंदआहे....

पुन्हा ‘पंचफूलाची’ पुनरावृत्ती होईल ?

प द्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. सेंसॉर बोर्डाने अनेक बदल सुचवून या चित्रपटाच्या प्रदर्शनास मान्यता दिली होती,एवढेच नाही तर पद्मावती नावात बदल करून पद्मावत असे ठेवण्यात आले मात्र यानंतरही चार राज्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा हवाला देवून या चित्रपटावर बंदी लादली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने कायदा व सुव्यवस्था राखणे ही संबंधीत राज्यांची जबाबदारी असल्याचे सांगून या चित्रपटाच्या प्रदर्शनास हिरवा कंदील दिला.करणी सेना आणि अन्य काही संघटनांनी आपला विरोध तिव्र केल्यानंतर देशातील नेत्यांनी या गरम तव्यावर भाकरी भाजणे सुरूच ठेवले आहे. भावी निवडणूका लक्षात घेवून काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यात या चित्रपटावर बंदी लादण्याची जणू स्पर्धाच लागली होती. सोमवारी राजस्थान आणि मध्यप्रदेश सरकारांनी तसेच करणी सेना आणि क्षत्रीय महासंघ यांनी सुद्धा सर्वोच्च न्यायालयात यावर पुर्नविचार याचिका दाखल केली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आता पून्हा पंचफूला सारखे प्रकरण तर होणार नाही ना याची भीती आहे. मागील चार महिन्यात या चित्रपटा...

चालू वर्ष मोठया राजकिय घडामोडींचे

मो दी सरकारचे पुढील काही महिन्यात चार वर्ष पूर्ण होतील. २०१९ मध्ये लोकसभा निवडणूका होणार असल्याने २०१८ वर्ष संपताच निवडणूक वर्षाची उलटी गिनती सूरू होईल. अशात निश्चितच काही लोकप्रिय निर्णय मोदी सरकारकडून घेतले जातील.जी लोक आजही भारतीय राजकारणाच्या भविष्याचा अंदाज यापूर्वीच्या हिट फॉर्म्युल्यांच्या आधारावर घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या पदरी मोठी निराशा पडेल. वेगाने बदलणा-या समाजाला राजकिय विश्लेषक आणि पत्रकारांपेक्षा राजकिय नेते आता जास्त समजून घेत आहेत. जनतेला काय हव आणि काय नाही हे त्यांना चांगले माहित आहे.काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा आता राहुल गांधींच्या खांदयावर आहे.बदललेल्या परिस्थितीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये एकमेकांवर मात करण्यासाठी चालू वर्षात स्पर्धा लागलेली दिसेल.लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने या वर्षी मोठे राजकिय युद्ध पहायला मिळेल हे मात्र नक्की. पूढील वर्षी मिजोराम, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून कोणते लोकप्रिय निर्णय घेतले जातील याचे उत्तर नरेंद्र मोदी यांनी प...