मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मित्रहिनता

एकदा मी आणि माझ्या सहका-याची चर्चा सुरू होती.गोष्ट या मुद्द्यावर येवून थांबली होती की,कोण खरा मित्र असतो आणि कोण नाही ?मी त्याला विचारले,तुझा कोण विश्वासू मित्र आहे?त्याने तात्काळ उत्तर दिले,अनेक आहेत.मी त्याला चार नावे सांगावयास सांगितले.बराच वेळ विचार केल्यानंतर त्याने कसेबसे एकच नाव सांगितले.मला असे वाटले की,त्याने हे ही नाव लाजून सांगितले कारण त्याला भीती होती की,तुझा तर एकही खरा मित्र नाही असे मी म्हणेल.             चर्चा पूढे चालू राहिल्यानंतर त्याने मला विचारले की,खरा मित्र कोण असतो?मी त्याला सांगितले की,आपण संकटात असताना सर्वप्रथम ज्याचे नाव आपल्याला आठवते तोच आपला खरा मित्र.मजेची गोष्ट अशी की,कित्येक वेळा ती ही व्यक्ती असते जिला आपण आपला शत्रू समजत असतो.मात्र आपण या ख-या मित्रासोबत ना जास्त हसत-बोलत असतो ना सोबत फिरत असतो.त्याच्या सोबत आपण कमीत-कमी वेळ घालवत असतो.हे ऐकल्यानंतर तो माझ्याकडे बघतच राहिला जणू मी त्याच्या मनातील गोष्ट सांगितली आहे. इंटरनेट मुळ जग जवळ आल आहे मात्र माणस दूरावत चालली आहेत.या गर्दीतही माणुस एकटा फिरत आहे.प्रत्येकाला एक...

शाळेतील वर्गही वाटू लागले हिंदू-मुसलमानात

नुकतच एका शाळेतील हिंदू-मुसलमान विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वर्गात वाटल्याचे प्रकरण समोर आले आहे.उत्तर दिल्लीच्या महानगर पालिकेची ही शाळा आहे वजीराबाद गावातील.या शाळेतील पहिली वर्गाच्या अ तुकडीत ३६ हिंदू आहेत तर ब तुकडीत ३६ मुसलमान.दूसरीच्या अ तुकडीत ४७ हिंदू , ब तुकडीत २६ मुसलमान आणि १५ हिंदू तर क तुकडीत ४० मुसलमान. तीसरीच्या अ वर्गात ४० हिंदू , ब तुकडीत २३ हिंदू आणि ११ मुसलमान , क तुकडीत ४० मुसलमान तर ड तुकडीत १४ हिंदू आणि २३ मुसलमान.चौथीच्या अ तुकडीत ४० हिंदू , ब तुकडीत १९ हिंदू आणि १३ मुसलमान आणि क तुकडीत ३५ मुसलमान.पाचवीच्या अ तुकडीत ४५ हिंदू , ब तुकडीत ४९ हिंदू , क तुकडीत ३९ मुसलमान आणि २ हिंदू तर ड तुकडीत ४७ मुसलमान.शाळांचे काम असते मुलांमध्ये सर्वधर्म समभाव आणि सामाजिक ऐक्याची भावना वाढीस लावणे.शाळांमध्येच असे प्रकार घडू लागले तर भारताचे भवितव्य काय असेल ?             शाळेमध्ये विद्यार्थी तुकड्यांमध्ये विभागले जातात ही मान्यताप्राप्त प्रक्रिया आहे आणि ती सगळ्या शाळांमध्ये राबविली जाते मात्र एकाच वर्गातील विद्यार्थ्यांच...

ऐतिहासिक! स्वातंत्र्याच्या दिशेने एक पाऊल

सर्वोच्च न्यायालयाने अगोदर स्त्रीला वारसा हक्क देवून तिला लैंगिक बरोबरीचा अधिकार प्राप्त करून दिला होता.आता नुकतेच सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यांच्या खंडपीठाने घटनेचे १५८ वर्ष जूने ४९७ कलम रद्द करून तिला लैंगिक स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे.सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिल्यानंतर समाज माध्यमातून या बाबतीत उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या.अगोदरच स्त्रीच्या बाबतीत संकुचीत भावना असणा-या समाजाने स्त्री आणि पुरुष यांचे विवाहबाहय संबंध हा आता गुन्हा ठरणार नाही म्हणून अनैतीक संबंधाला खुली परवानगी एवढाच घेतला आहे मात्र न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे स्त्री स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेले आणखीन एक पाऊल आहे.निश्चितच हा ऐतिहासिक निर्णय आहे. न्यायालयाच्या हा निर्णय देताना स्पष्ट केले आहे की,देह ही स्त्रीची संपत्ती आहे आणि त्याबद्द्ल निर्णय घेण्याचा अधिकार तिला आहे.भारतीय दंड संहितेचे कलम ४९७ महिलेच्या सन्मानाच्या विरोधात आहे.महिलांचा नेहमीच सन्मान करायला हवा.महिलांना समाजाच्या इच्छेनूसार विचार करण्यास सांगता येवू शकत नाही.संसदेनेही महिलांवरिल अत्याचार रोखण्यासाठी कौटुंबीक हिंसाचार व...

संपत्ती कमवा पण ......

या जगात प्रत्येक जण रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हातानेच परत जातो हे त्रिकाल बाधित सत्य माहित असूनही आज प्रत्येक जण पैश्याच्या मागे धावताना दिसतोय. प्रत्येकाला संपत्तीचा संचय करण्याचा हव्यास आहेच. संत कबीरदास यांनी म्हटले आहे - साई इतना दीजीये , जामे कुटुम समाय , मै भी भुखा ना रहुं , साधु न भुखा जाय. पैशाच्या मागे धावत-धावत जीवनाचा खरा आनंदच हरवून बसलो आहोत आपण. संपत्ती संचयासाठी आपण माणूसकी सुद्धा विसरत चाललो आहोत. मला लहानपणापासून ऐकलेली एक गोष्ट आठवते. एक माणूस सारखा देवाला तक्रार करत असतो की , देवा तू मला काहीच दिले नाहीस. देवाने त्रस्त होवून त्याला वरदान दिले की , तू २४ तासात जेवढे अंतर पायी कापशील तेवढी जमीन तुझी होईल. तो माणूस हव्यासापोटी पळत राहिला , पळत राहिला आणि मेला. आज आपली सुद्धा स्थिती अशीच आहे. संपत्ती संचय करण्यासाठी सर्व जण पळताहेत आणि शेवटी काय तर शून्य. संपतीमुळे सुख मिळत ही जर आपली कल्पना असेल तर ती भ्रामक आहे. अमाप संपत्ती असणा-यांनी आत्महत्या करून मृत्यूला कवटाळल आहे याची अनेक ताजी उदाहरण आहेत. आपण संपती का कमावत आहोत , कशासाठी कमावत आहोत हे कुणा...

…. म्हणून पीएचडीवाला चपराशी होतोय ļ

उ त्तरप्रदेशच्या पोलीस विभागात चतुर्थ श्रेणी संदेशवाहक म्हणजे चपराशी पदाच्या ६२ रिकत जागांसाठी नुकतीच जाहिरात देण्यात आल्यानंतर ९३ हजार लोकांनी या पदासाठी अर्ज केले.या आकडयावरून देशातील बेरोजगारी किती वाढली आहे हे दिसून येते.या ठिकाणी नमूद करण्याची विशेष बाब म्हणजे या मुठ्ठीभर जागांसाठी अर्ज करणा-यात ५० हजार पदवीधर , २८ हजार उच्च पदवीधर आणि ३७०० पीएचडी धारक आहेत.या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता फक्त पाचवी उतीर्ण आहे मात्र अर्ज करणा-यात पाचवी ते बारावी पास उमेदवारांची संख्या ९३ हजारांमधून केवळ ७४०० आहे.अर्जाची ही आकडेवारी अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण करते.अस असू शकत की या ९३ हजार उमेदवारांपैकी सगळेच बेरोजगार नाहीत.यापैकी काही जण अपेक्षीत वेतन मिळणा-या खाजगी क्षेत्रातील पदावर काम करणारे असे शकतात.युवकांमध्ये खाजगी क्षेत्रातील नौकरीपेक्षा सरकारी नौकरीला प्राधान्य देण्याची मानसिकता सध्या जास्त असल्यामुळे त्यांनी सुद्धा अर्ज केले असतील तरीसुद्धा यावरून देशातील बेरोजगारी वाढत चालली आहे हे नाकारून चालणार नाही. आपण आता हे लक्षात घेतल पाहिजे की सरकारी नौक-या आता खूप कमी प्रमाणात उपलब्ध ...

समलैंगिकांना समाज स्विकारेल?

२०१८ चा ६ सप्टेंबर हा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहायला पाहिजे. यासाठी नाही की , या दिवशी सवर्णांनी एससी/एसटी कायदयाच्या विरोधात भारत बंद केला होता. सर्वोच्च न्यायालयाने मार्च महिन्यातच सांगितले होते की , अनुसुचित जाती आणि जमातीच्या अत्याचार निवारण कायद्याअंतर्गत होणा-या गुन्हयात आरोपीला वरिष्ठ पोलीस अधिका-याच्या परवानगी वा प्राथमिक तपासानंतरच अटक करता येईल मात्र संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने वटहुकुम आणला आणि अगोदरच कायदा निश्चित केला. सवर्णांना हा अन्याय वाटल्याने सरकारच्या या वटहुकुमाच्या विरोधात भारत बंद होता. या दिवशी एकीकडे भारत बंद होता तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकांना समाजाची दारे उघडून दिली. अशा समाजाची ज्यात याच समाजाचा एक हिस्सा गुलाम बनून राहिला होता. नव्हे तो समाजाचा भागच नव्हता.समाजाने यांना तर कधी आपल मानलच नव्हत. समाजाला वाटत की हे निसर्गाच्या विरोधात आहे. म्हणून त्यांनी स्वत:ला लपवून ठेवले पाहिजे. यांना तर तो समाज पाहिजे ज्यात बलात्कारी , खुनी , लुटमार करणारे आणि दुस-यांचा हक्क हिरावून घेणारी सन्मानीत पुरुष आहेत जी उच्च पदावर बस...

आरक्षणासाठी आंदोलनं

आ ज भारतात क्वचितच कोणती जात असेल जिने आरक्षणासाठी मागणी केलेली नाही. महाराष्ट्रात मराठा आंदोलना सोबत धनगर समाजाने आरक्षणासाठी जोर धरला आहे. नुकतीच मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मराठा क्रांती मोर्चाने १ नोव्हेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास १ डिसेंबरपासून परत आंदोलन तिव्र करण्याचा इशारा नुकताच दिला आहे. पंजाब मध्ये जाट समाजाची आरक्षणासाठी जेंव्हा-तेंव्हा आंदोलन सुरूच असतात. आंध्रप्रदेश मध्ये कापू सुद्धा आंदोलन करत आहेत. मतं कमी होण्याच्या भितीने जी ती सरकारं आरक्षणाची मागणी मान्य करतात मात्र नंतर न्यायालयं त्यावर स्थगिती आणतात. मराठा आरक्षणाच्या बाबतीतही हेच घडल. राजकिय पक्षात ही हिम्मत नाही की , ती ख-याला खरं आणि खोटयाला खोटं म्हणू शकतील यामुळेच आरक्षणाचा तिढा न सुटता अधिकच गंभीर बनत चालला आहे. आरक्षणाच्या बाहेर असलेल्या जातींना आजही वाटते की , त्यांचा उद्धार आरक्षण मिळाल्यानेच होईल जेंव्हाकी सरकारी नौक-या मात्र नावालाच उरल्या आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी खरे म्हटले होते की , सरकारी नौक-या आता राहिल्यात कुठे ? ८० टक्के न...