नुकतच केंद्र सरकारने आपल्या ५० लाख कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांनी वाढ केली आहे.६५ लाख पेंशन धारकांनाही याचा लाभ होईल.हा निर्णय जुलै २०१९ पासून लागु होईल.सरकारच्या तिजोरीवर या निर्णयामुळे १५,९०९ कोटी रुपयांचा भार पडणार आहे.सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या म्हण्यानुसार महागाई भत्त्यात एवढी वाढ एकाचवेळी कधीच करण्यात आली नव्हती.सरकार या कर्मचा-यांच्या हातात पैसा यासाठी देत आहे कारण बाजारपेठेत कमालीची मंदी आली आहे.कर्मचारी पैसा खर्च करतील त्यामुळे मागणी वाढेल.दिवाळी सणात चांगली उलाढाल होईल अशी अपेक्षा आहे.केवळ भारतच नाही तर जगातील ९० टक्के देश आर्थिक मंदीमुळे सध्या त्रस्त झाले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे प्रबंध निर्देशक क्रिस्टालिना जियॉरजीवा यांनी म्हटले आहे की,जग आर्थिक मंदीच्या खाईत आहे.जगाची अर्थव्यवस्था वाढत आहे मात्र वाढण्याचा वेग कमी आहे.दोन वर्षांपूर्वी जगाच्या अर्थव्यवस्थेत वाढ होत होती मात्र आज ती मंदावत चालली आहे.२०१९-२० मध्ये आर्थिक विकासाचा दर मागील दहा वर्षातील सर्वात कमी दर असेल.अमेरिका आणि जर्मनी सारख्या देशात बेरोजगारीचे प्रमाण कमी आहे मा...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.