मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

माणसा.. आता तरी जागा हो!

  आजची परिस्थिती पाहता अस वाटु लागल आहे की, निसर्ग एवढा निर्दयी का झाला आहे ? खरंतर निसर्गाच्या या क्रुरतेच्या पाठीमागे कुठे ना कुठे तरी मनुष्यच कारणीभुत राहिला आहे. मनुष्य निसर्गावर कधीच विजय मिळवु शकत नाही, मात्र निसर्गावर विजय मिळवण्याच्या प्रयत्नात जाणते-अजाणतेपणी तो निसर्गाशी वैर मात्र घेत राहिला आहे. म्हणूनच की काय या शत्रुत्वाचा परिणाम एवढा भयावह आहे की, आज मनुष्य स्वत:ला एका छोट्याश्या विषाणुपूढे एवढा लाचार, भयभीत व असाहय समजत आहे. कोरोना महामारीचे तांडव पाहता मानवाचा सर्वश्रेष्ठ आणि सर्वशक्तीशाली होण्याचा गर्व कदाचित नष्ट झाला असेल आणि जर झाला नसेल तर त्याला भविष्यात याचे आणखिन गंभीर परिणाम भोगण्यासाठी तयार असल पाहिजे. आज मनुष्य निसर्गाशी छेडछाड केल्याबद्दल पश्चताप करत आहे, रडतो आहे मात्र ही आपत्ती संपल्यानंतर हा पश्चताप आणि अश्रु केवळ दिखावा तर ठरणार नाही ना ? जर मनुष्याच्या मनामध्ये आजही निसर्गाच्याप्रती कपट आहे, तर त्याने उज्वल भविष्याची कल्पना करणे व्यर्थ आहे. उज्वल भविष्यासाठी केवळ निसर्गप्रेमी बनण्याचा संकल्प करून काहीच साध्य होणार नाही तर त्याला मनातुन आणि कृतीतुन स...

तथ्यहिन विधानांमुळे देशाच्या प्रतिमेला धोका!

कोरोना रुग्णांवरील अॅलोपॅथी उपचारांबाबत योगगुरु रामदेव बाबा यांनी एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमएने रामदेव बाबा यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्यावर अखेर रामदेव बाबा यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे. रामदेव बाबा यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना एक पत्र लिहून आपण ते वक्तव्य मागे घेत असल्याचं म्हटलंय. बाबा रामदेव यांच्याकडे हे विधान मागे घेण्याशिवाय पर्याय नव्हता. ज्या उपचार पद्धतीच्या आधारे संपूर्ण जग कोरोनासारख्या महामारीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच उपचार पद्धतीची निंदा अशा नाजुक परिस्थितीत करण्यामागील कारण काही लक्षात येत नाही.    नेमकं प्रकरण काय?  कोरोना संकटाच्या काळात योगगुरु रामदेव बाबा यांच्या एका वक्तव्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये रामदेव बाबा यांनी कोरोनावरील अॅलोपॅथी उपचार पद्धतीबाबत अविश्वासार्हता दर्शवली आहे. कोविड उपचार पद्धतीमध्ये फॅबीफ्लू आणि स्टेरॉईड्ससह अन्य अँन्टिबायोटिकही फोल ठरल्याचं वक्तव्य रामदेव बाब...

कोरोनाच्या तिस-या लाटेपासुन आपल्या चिमुकल्यांना सांभाळा!

दे शात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रचंड कहर सुरू आहे. ही लाट आटोक्यात येताच तीन-चार महिन्यानंतर तिस-या लाटेचा धोका उभा राहणार आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबरपर्यंत देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. कोरोनाच्या  संसर्गात लहान मुले आतापर्यंत बऱ्यापैकी सुरक्षित राहिली असली तरी सप्टेंबरच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका वाढेल, अशी शक्यता आहे. या लाटेत लहान मुलांना संसर्ग अधिक होण्याची शक्यता केंद्र सरकारच्या सल्लागारांनी वर्तवली आहे. कोरोनाची पहिली लाट वृद्धांसाठी घातक ठरली होती. दुसऱ्या लाटेचा परिणाम तरुणांवर सर्वाधिक झाला. अशा स्थितीमध्ये कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरेल, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.  त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. मात्र अशा परिस्थितीत घाबरून जाण्याची गरज नाही,  तर सरकारच्या आवाहनानुसार कोरोना नियमावलीचे पालन करण्याची नितांत गरज आहे.   कोविडची तिसरी लाट युरोपच्या काही देशांमध्ये यापूर्वीही आली आहे आणि असे दिसून आले आहे की तिसऱ्या लाटेदरम्यान लहान मुलांवर परिणाम झाला. भारतात तिसरी लाट आली तर आप...

सकारात्मकता कायम ठेवा

को रोना महामारीच्या दुस-या लाटेतच देशातील आरोग्य व्यवस्था ढासळली असताना आणि त्यामुळे निर्माण झालेली भीती आणि नैराश्याच्या दरम्यान अशा काही बातम्या येत आहेत ज्या आशेचा किरण निर्माण करण्याच काम करित आहेत. या कठिण प्रसंगातही देशातील एक मोठा गट समर्पण आणि संकल्पाच्या भावनेने काम करण्यासाठी तत्पर आहे. खरंतर कोणतीही आपत्ती केवळ सरकारसाठीच नाही तर समाजासमोरही आव्हान ऊभा करत असते. समाजातील मोठा समुह त्या आव्हानांना समजतोही आणि आपापल्या सामर्थ्यानुसार ऊभा राहतो आणि या आव्हानांना दुर करण्याचा किंवा कमी करण्याचा शक्य तितका प्रयत्नही करतो. एका संवेदनशिल, सक्रिय आणि सतर्क समाजाचे हेच लक्षण आहे. कोरोना महामारीच्या या हाहाकारादरम्यान आपल्यासमोर अशा बातम्या येत आहेत ज्यात धार्मिक, राजकिय आणि सामाजिक संघटनाच नाही तर वैयक्तीक स्तरावर सुद्धा लोक आपापल्या पद्धतीने पिडित लोकांना आणि गरजवंतांना मदत करित आहेत. सध्या गाजियाबादच्या एका गुरुद्वाराने देशाचे लक्ष वेधले आहे. या गुरूद्वाराने आव्हान केले आहे की, जर कोणी ऑक्सीजनशिवाय तडफडत असेल तर त्याला आमच्याकडे घेवून या. आम्ही त्याला तोपर्यंत ऑक्सीजन देत राहु जोपर...

आता लसीकरणच वाचवेल

  दे शात कोरोना महामारीची दुसरी लाट आपल्या मध्यावर आहे. भारताची दैनिक नविन रूग्णसंख्या चार लाखाच्या पूढे गेली आहे. या महामारीला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्यांकडुन युद्धस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. नुकतेच केंद्र सरकारने २० एप्रिलला लसीच्या वितरणाच्या  बाबतीत ज्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्या केवळ कोरोनाला रोखण्यासाठीच नाही तर भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी उभारी देण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावतील. याच्या अंतर्गत १ मे पासून १८ वर्षांपूढील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याची घोषणा केली मात्र याची जबाबदारी संबंधित राज्य सरकारांवर टाकण्यात आली आहे. एवढया मोठया लोकसंख्येचे लसीकरण करायवयाचे असल्याने मोठया प्रमाणात लसींची गरज भासणार आहे. मात्र अनेक ठिकाणी लसीअभावी अनेकदा लसीकरण थांबवण्यात आल्याच्या बातम्या येत राहिल्या आहेत.        भारतात कोविशिल्ड लस तयार करणा-या सीरम इन्सिटयुटला लस तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल अमेरिकेने रोखल्याने या लसीच्या उत्पादनात अडचण निर्माण झाली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बाइडेन यांच्याशी फ...

मढयावरच लोणी

को विड-१९ महामारीची दुसरी लाट सध्या देशात सुरू आहे. दिवसागणिक रूग्णसंख्येत वाढ होतच आहे. सोबत मोठया प्रमाणावर रेमडिसिविर इंजेक्शन्स, ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा जाणु लागला आहे. महत्वाचा प्रश्न हा आहे की, खरंच असा तुटवडा आहे की आणखीन काही ? खरंच रेमडिसिविर इंजेक्शन्स वा फैबी फ्लूच्या टॅबलेटस उपलब्ध होत नाहीत का? कोण म्हणत उपलब्ध होत नाही, फक्त आपल्याला याची किंमत चुकवावी लागेल. काही दिवसांपूर्वी माझ्या एका परिचितांचा फोन मला आला, त्यांना रेमडिसिविर इंजेक्शन पाहिजे होते. गयावया करून म्हणाले, काहीही करून उपलब्ध करून द्या. मी त्यांना समजावुन सांगितल की, नियमानूसार हे इंजेक्शन त्यांना संबंधित रूग्ण उपचार घेत असलेल्या कोविड हॉस्पीटलच देवु शकते. त्यांनी सांगितल- हॉस्पीटलवाल्यांनीच सांगितलय, बाहेरून जुगाड लावायला. काही घंटयांनंतर ते रेमडिसिविर इंजेक्शनच जुगाड बाहेरून लावण्यात यशस्वी झाले, म्हणाले- ब्लॅक मध्ये मिळालं.     हीच अवस्था ऑक्सिजन सिलेंडरच्या बाबतीत आहे. काही ठिकाणी दहा-दहा हजार रुपयांना एक-एक सिलेंडर मिळत असल्याच माझ्या ऐकण्यात आलय. पाहिजे असेल तर पैसे देवुन घेवुन जा आणि आपल्...

प्राणवायूचा तुटवडा

को रोना विषाणूच्या दुस-या लाटेने सध्या देशात थैमान घातले आहे. गुरूवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात एका दिवसात आत्तापर्यंतचे सर्वाधिक ३.१४ लाखाहून अधिक  रूग्ण आढळले तर २९०४ जणांचा बळी गेला. या महामारीला सुरूवात झाल्यापासून एखाद्या देशात इतक्या मोठया संख्येने नवीन रूग्ण सापडल्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे. यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढून १,५९,३०,९६५ इतका झाला आहे तर मृतांचा आकडा १,८४,६५७ इतका झाला आहे. सलग ४३ व्या दिवशी कोरोना रूग्णवाढीचा आलेख कायम राहिल्याने अ‍ॅक्टिव्ह रूग्णसंख्या वाढून २२,९१,४२८ इतकी झाली आहे. या वाढत्या रूग्णवाढीमुळे साहजिकच ऑक्सिजनची मागणी सुद्धा वाढत चालली आहे. देशात सर्वाधिक रूग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तर महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागल्याने, राज्य सरकार केंद्राच्या पाया पडायलाही तयार आहे पण महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनचा पुरवठा करावा अशी मागणी गुरूवारी केली. यावरून हा प्रश्न खूप गंभीर असल्याचे लक्षात येते मात्र, देशातील उपलब्ध प्राणवायूच्या वितरणाचे योग्य नियोजन केले तर यावर स...