मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सर्वसामान्यांना दिलासा हवा

म हागाईच्या आगीत जनता होरपळून निघत आहे मात्र यावर बोलायला ना प्रसारमाध्यमांना वेळ आहे ना लोकप्रतिनिधिंना. देशात पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलचे भाव शंभराच्या पूढे गेले आहेत मात्र याची दखल कोण घेणार ? केवळ हेच नाही तर अन्नधान्य, भाजीपाला अशा सर्वच वस्तू सर्वसामांन्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने आम्ही खायचे काय? हा प्रश्न सर्वसामांन्यांना पडला आहे. सत्ताधारी आणि विरोधक मात्र एकमेकांकडे बोट दाखवून महागाईचे हे पाप आमचे नाहीच असे भासवण्याचा प्रयत्न करीत आहेत पण महागाई कमी करण्याचा प्रयत्न कोणीच करताना दिसत नाही. यापेक्षा प्रसारमाध्यमांना आणि लोकप्रतिनिधिंना आर्यन खानच्या प्रकरणात जास्त रस आहे. आपला विवेक हरवलेली जनता हा तमाशा मात्र उघड्या डोळ्याने बघत निमुटपणे महागाईची ही मार सहन करित आहे. घरगुती गॅसवरिल सबसिडी सरकारने गेल्या एक वर्षापासून बंद केली आहे. सामान्य नागरिकाला आता प्रती सिलेंडर ९५० रूपये खर्च करावे लागत आहेत. ग्रामिण भागात आता परत चुली पेटु लागल्या आहेत. खाद्यतेलाच्या भावात मागील काही दिवसात भरमसाठ वाढ झाली आहे. सीएनजी आणि इतर सर्व इंधनांचे दर वाढल्याने सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेने...

सावधान ! शाळकरी मुलांमध्ये तंबाखूचे व्यसन वाढतेय

  कें द्रीय  आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जागतिक युवा तंबाखू सर्वेक्षण- २०१९ ची राष्ट्रीय तथ्य जाहीर केली आहेत. हा अहवाल आपले डोळे उघडणारा आहे. आता अगदी लहान शाळकरी मुलं सुद्धा तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी जात असल्याचे यात नमुद करण्यात आले आहे. केवळ हा अहवालच नाही तर अनेक अभ्यास , शोध आणि सर्वेक्षणातून आलेली आकडेवारी आपली चिंता वाढवणारी आहे. तंबाखू व तत्सम मादक पदार्थांचे व्यसन केवळ युवक वर्ग करतात हा आपला भ्रम आपण आता दूर केला पाहिजे. हे सर्वेक्षण २०१९ मध्ये धूम्रपान देखरेख आणि तंबाखू नियंत्रणाबाबत करण्यात आले. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने   केलेल्या या सर्वेक्षणाचे निष्कर्ष नुकतेच काही दिवसांपूर्वी जाहीर केले आहेत.   ग्लोबल यूथ टोबॅको सर्वेने तंबाखूच्या वापराचे वय , अप्रत्यक्ष धूम्रपानाच्या प्रदर्शनाचे वय ,  तंबाखूच्या जाहिराती इ.चा सुद्धा अंदाज लावला आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत १३ ते १५ वर्षांच्या तरुणांचाही समावेश करण्यात आला. हे सर्वेक्षण भारतातील ९८७ शाळांमधील एकूण ९७ हजार ३०२ विद्यार्थ्यांमध्ये करण्यात आले. आरोग्य आणि ...

एअर इंडियाच्या पंखांना टाटांचे बळ

त ब्बल ६८ वर्षांनंतर एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटाकडे गेली आहे. टाटाने या कंपनीच्या विक्रीसंदर्भातला लिलाव जिंकला. एअर इंडियासाठी टाटा समूह आणि स्पाईसजेटच्या अजय सिंग यांनी बोली लावली होती. टाटा सन्सने एअर इंडियासाठी १८,००० कोटी रुपयांची बोली जिंकली. यापूर्वी एअर इंडिया ही पुन्हा टाटा समुहाकडे जाणार या वृत्ताचं खंडन करण्यात आलं होतं परंतु अखेर यावर शिक्कामोर्तब झाल आहे. एअर इंडिया ही कंपनी पूर्वी टाटाच्याच मालकीची होती. पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरकारने ही कंपनी अखत्यारित केली होती. जेआरडी टाटा यांच्या नेतृत्वाखाली एअर इंडियाने एकेकाळी जगातील सर्वात प्रतिष्ठित विमान कंपन्यांपैकी एक म्हणून नावलौकिक मिळवला होता. आधीच्या वर्षांमध्ये मिळालेली प्रतिमा आणि प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याची संधी टाटाला मिळेल. एअर इंडियाची स्थापना १९३२ मध्ये टाटा एअर सर्व्हिसेस म्हणून झाली होती. भारतीय व्यावसायिक असलेल्या जेआरडी टाटा यांनी ही विमान सेवा सुरू केली होती. एप्रिल १९३२ मध्ये टाटाने इंपिरियल एअरवेजसाठी मेल घेऊन जाण्याचा करार जिंकला. यानंतर टाटा सन्सने दोन सिंगल इंजिन विमानांसह आपला हवाई वाहतूक ...

समानतेच्या दिशेने

    रा ष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए मध्ये प्रवेशासाठी आता महिला व मुलींना मे-२०२२ मध्ये होणारी प्रवेश परीक्षा देता येणार आहे. केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी ही माहिती देण्यात आली आहे. महिला व मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सहभागी करण्यात यावं, यासाठी दाखल केल्या गेलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करून, वरील माहिती देण्यात आली. सरकारकडून सांगण्यात आले की, योग्य वैद्यकीय आणि शारीरिक फिटनेस स्टॅण्डर्ड्सची मानके निर्धारित करण्याच्या प्रक्रियेत आहेत. याचबरोबर आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. पुरूष व महिला कॅडेट्स यांच्या निवासस्थानाची स्वतंत्र व चांगल्याप्रकारे सोय केली जात आहे. वय आणि प्रशिक्षणाचे स्वरूप लक्षात घेऊन, नियम बनवले जात आहेत. एनडीएमध्ये महिलांची पहिली बॅच २०२३ पासून सुरु होऊ शकते. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही दलांमध्ये देशातले सर्वोच्च अधिकारी या अकदामीतून तयार होतात.  एनडीएमध्ये महिलांना प्रवेश नाकारणं ही लिंगभेद करणारी गोष्ट आहे असं सांगत  या सं...

कोव्हिड योद्धयांची सरकारकडून उपेक्षाच

को रोना विरूद्धच्या लढ्यात डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफसह पहिल्या फळीतील कोरोना योद्धयांचे योगदान महत्वपूर्ण आहे. सेवा बजावत असताना आपले कुटुंबीय, प्रियजनांपासून दूर राहत इतरांच्या कुटुंबातील प्रियजन कोरोनाने हिरावले जावू नयेत म्हणून या सर्वांनी अहोरात्र मेहनत घेतली. कोरोनाची साथ भारतात पसरू लागली, तेंव्हा आपल्याकडिल आरोग्य सुविधा अतिशय तोकड्या होत्या. कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी अगदी पीपीई किट मिळणे अवघड होते. बाकी ऑक्सिजन, व्हेंटिलेटरर्स, औषधे आणि इतर भौतिक सुविधा तर सोडाच. सुरुवातीच्या काळात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून आरोग्य कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचं मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला. मग ते अगदी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी थाळ्या वाजवणं, दिवे लावणं, हेलिकॉप्टरमधून आरोग्य कर्मचाऱ्यांवर फुलांचा वर्षाव करणं इथपर्यंत अनेक गोष्टी केल्या गेल्या. सोबत केंद्र सरकरनं सांगितल की, आरोग्य क्षेत्रातील कर्मचा-याच कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला ५० लाख रूपयांची नुकसान भरपाई दिली जाईल. ही योजना जाहीर करताना भारताच्या अर्थमंत्र...

आत्मविश्वास

 स्व त:विषयी  जाणवणारा दृढ विश्वास म्हणजेच आत्मविश्वास. आत्मविश्वास म्हणजेच जगण्याचं मनोबल. आत्मविश्वास म्हणजेच जगण्यातला आनंद. आत्मविश्वास म्हणजेच जगण्याची ऊर्जा. आत्मविश्वास म्हणजेच जगण्याची उमेद ! आणि आत्मविश्वास म्हणजेच जगण्यातलं यश.. आत्मविश्वास मूलत: स्वभावात असतोच ; तो बोलण्यातून जाणवत असतो आणि कृतीतून दिसत असतो. खरं तर आत्मविश्वास ही स्वत:च्या विचारांची प्रतिक्रिया असते. विचारांमध्येच आत्मविश्वासाचा स्रोत दडलेला असतो. विचारांमधला दृष्टिकोनच मनोबल वाढवत असतो. त्यामुळे स्वत:कडे , वास्तवाकडे , आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन विचारांच्या मांडणीसाठी अधिक महत्वाचा ठरतो. म्हणून प्रत्येक कृतीमागचा विचार आणि दृष्टिकोन महत्वाचा असतो. एकदा एक व्यक्ती म्हणून जगायचं ‘कसं’ आणि ‘का’ ठरलं की , आत्मविश्वास अधिकाधिक वृद्धिंगत होत जातो.   एखाद्या व्यक्तीकडे आत्मविश्वासाचा अभाव असतो म्हणजे नेमकं काय तर त्या व्यक्तीची विचार करण्याची पद्धत बऱ्याचदा नकारात्मक आणि चुकीची असते. कारण अंतर्मनातल्या भीतीचा परिणाम हा विचारांवर होत असतो. प्रत्येक व्यक्तीकडे उपजतच बुद्धिमत्ता , गुणवत्ता आणि क्षम...

बैलपोळा

  "अमावस्या श्रावणाची, आली घेऊन सणाला…कृषीवल आनंदाने, सजवितो हो बैलाला”    श्रावण महिन्यात पावसाचे दिवस असल्याने सृष्टी आधीच हिरवाईचा शालु नेसुन नवीकोरी झालेली असते. संपुर्ण वातावरणात एक गारवा पसरल्याने मानवी मन देखील ताजं तवानं झालेलं असतं. अशा या श्रावण महिन्यात सणांची रेलचेल पहायला मिळते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी यांसारखे  अनेक सण या महिन्यात आपल्या भेटीला येतात. पुर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरांप्रमाणे हे सण आजही गावागावांमधुन साजरे होतांना आपल्याला दिसतात. या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावास्या येते आणि संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे 'बैलपोळा'. कर्नाटकात याला बेंदूर असं म्हणतात तर कर्नाटकाच्या काही भागात याच सणाला करुनुर्नामी म्हणतात. दक्षिण भारतात यास पोंगल आणि उत्तर व पश्चिम भारतात गोधन म्हणतात.निसर्गातील प्रत्येक वृक्ष, वेली, प्राणी, डोंगर, नदीची पूजा करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा भारतात आहे. ही परंपराच माणसाची निसर्गाशी असलेली नाळ कायम जोडून ठेवते. भारत हा एक कृषिप्रधान द...