शि वाजी महाराजांचे चरित्र उभ्या महाराष्ट्राच्या घराघरात नेणाऱ्या, अमोघ वक्तृत्वाने मराठीजनांना खिळवून ठेवून त्यांच्यात वीरश्री अन राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्याचा शब्दयज्ञ तब्बल साठहून अधिक वर्षे करणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. समाजप्रिय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा संपर्क अनेक क्षेत्रांशी असल्याने त्यांच्या निधनामुळे केवळ पुण्यातीलच नव्हे तर देशातील त्यांच्या हजारो चाहत्यांना धक्का बसला आहे. अलीकडेच बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभरीत पर्दापण केले होते. यानिमित्त पुण्यात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक राजकीय नेत्यांनी ऑनलाईन उपस्थिती लावत बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. "शिवाजी महाराज' हा सप्ताक्षरी मंत्र शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यभर जपला. या मंत्राच्या साह्याने "वन्ही तो चेतवावा । चेतविता चेततो।' या समर्थ वचनाला साक्षी ठेवत मराठी मनाची मरगळ दूर केली. बाबासाहेबांनी इतिहासाचे वेड पेरले. त्यांच्या प्रेरणेने अनेक शिवभक्त आणि गडप्...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.