मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सामाजिक ऐक्य महत्वाचे

                                   हिन्दू कहें मोहि राम पियारा, तुर्क कहें रहमाना।       आपस में दोउ लड़ी-लड़ी मुए, मरम न कोऊ जाना।। संत कबीर म्हणतात, हिंदू मानतात की राम सर्वोच्च आहे, तर मुस्लिम मानतात की रहमान सर्वोच्च आहे. या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. दोघांनाही गुपित माहीत किंवा समजलेले नाही. धर्माच्या नावावर संघर्ष सुरू आहे, पण कोणताही धर्म संघर्ष शिकवत नाही, कोणताही धर्म हिंसेला प्रोत्साहन देत नाही, कोणताही धर्म हिंसाचार, जुलूम, भेदभाव आणि एकमेकांविरुद्ध उच्च-नीच यांना प्रोत्साहन देत नाही. परंतु एखादी व्यक्ती आपल्या धर्माला सर्वोच्च बनवण्यासाठी अनैतिक कृत्यांचा अवलंब करते आणि व्यर्थ कृत्यांमध्ये आपले जीवन संपवते. त्यामुळे त्याच्या आयुष्यात प्रगती होत नाही किंवा समाजासाठी काही उपयोग होत नाही. ‘क्या बहरा हुवा खुदाय ’ म्हणत कबीरांनी समाजाला सांगितले की, देव किंवा अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी बाह्य दिखाव्याची काय गरज आहे? देवापर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्याने प्रार्...

सैनिकांवरच्या मानसिक परिणामांचा विचार करायला हवा

भा रतीय सैन्यदलात एकूण १४ लाखांपेक्षा जास्त सैनिक कार्यरत असून अनेकांनी कामाच्या तणावातून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय‌‌. देशात सैनिकांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे , ही अत्यंत चिंतेची बाब आहे. याशिवाय दहशतवाद आणि नक्षलग्रस्त भागात कर्तव्यावर असलेल्या लष्करी दलाच्या शहीद होण्याचे प्रमाणही वाढत आहे. शहीद झालेल्यांमध्ये सीआरपीएफ जवानांची संख्या सर्वाधिक आहे. जम्मू-काश्मीरच्या दहशतवादग्रस्त भागात ते नक्षलग्रस्त भागात तैनात असलेले ९५० सीआरपीएफ जवान तीन वर्षांत कर्तव्य बजावताना शहीद झाले आहेत. दुसरीकडे , सैनिकांच्या आत्महत्येची आकडेवारी पाहिली तर २०२१ मध्ये १५३ जवानांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी ५६ जवान सीआरपीएफचे तर ४२ जवान बीएसएचे होते. नक्षलग्रस्त भागात शहीद झालेल्या जवानांची संख्या ५७ टक्के आहे. सर्व दलातील जवानांना एकत्र घेतले तर २०१९ मध्ये १५ राजपत्रित अधिकार्‍यांसह ६२२ , २०२० मध्ये १४ राजपत्रित अधिकार्‍यांसह ६९१ आणि २०२१ मध्ये १८ राजपत्रित अधिकार्‍यांसह ७२९ जवान शहीद झाले आहेत. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार , २०१५ ते २०२० या ६ वर्षांमध्ये चकमकींपेक्ष...

नेपाळवरील आर्थिक संकट

कोरोना महामारीनंतर रशिया-युक्रेन युद्धामुळे अर्थव्यवस्थेला धोक्याची व्याप्ती वाढली आहे. भारताचे शेजारी राष्ट्र सध्या आर्थिक गर्तेत सापडले आहेत. श्रीलंकेत एक कप चहासाठी श्रीलंकन नागरिकांना शंभर रुपये द्यावे लागत आहेत. श्रीलंकाच नव्हे तर दक्षिण आशियात बांगलादेश वगळता कोणाचीही स्थिती चांगली नाही. श्रीलंकेनंतर नेपाळची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. नेपाळच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत दिवसागणिक घट होत आहे. नेपाळची मध्यवर्ती बँक नेपाळ राष्ट्र बँकेनं कठोर निर्बंध हाती घेण्यास सुरुवात केली आहे. नेपाळ सरकारने महत्वाचे धोरणात्मक निर्णय जारी केले आहेत. महागड्या वस्तूंच्या आयातीवर नेपाळ सरकारने बंदी घातली आहे. नागरिकांना अनावश्यक बाबींसाठी कर्ज न मंजूर करण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहे. बुडत्या अर्थव्यवस्थेला उर्जितावस्था देण्यासाठी एनआरबी आगामी काळात आणखी पावलं उचलण्याची शक्यता आहे. मात्र, नेपाळ सरकारच्या प्रतिनिधींनी आगामी पाच ते सहा महि्न्यांच्या आयातीसाठी पुरेशा चलनसाठा असल्याचं म्हटलं आहे. १९९१ मध्ये आखाती युद्धामुळे भारतावर असेच आर्थिक संकट ओढावले होते, त्यामुळे भारतानेही आता सावध पावल...

पाकिस्तानातील राजकिय घडामोडींचा अन्वयार्थ

अविश्वास ठराव घेवून पदावरून हटविले जाणारे इम्रान खान हे पहिले पंतप्रधान ठरले. सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांचा सभात्याग , सभात्यागावेळी सत्ताधारी व विरोधीपक्षांच्या सदस्यांमध्ये सभागृहातच झालेली हाणामारी आणि शनिवारी मध्यरात्री अविश्वास ठरावावर झालेले मतदान अशा नाट्यमय घडामोडींनंतर पाकिस्तानातील ` इम्रानशाही ` अखेर खालसा झाली. सत्तास्थापनेच्या साडेतीन वर्षानंतर इम्रान सत्तेच्या खुर्चीवरून उतरले. पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांच्या निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पीएमएल-एनचे नेते शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान असतील , हे आता जवळपास निश्चित झालंय. शाहबाज शरीफ हे सध्या पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीतले विरोधी पक्षाचे नेते आहेत. पाकिस्तानाच्या ७५ वर्षांच्या इतिहासात आत्तापर्यंत कोणताही पंतप्रधान आपला कार्यकाळ पूर्ण करू शकला नाही हे विशेष. इम्रान यांना सत्ताच्युत करण्यासाठी ३४२ सदस्यांच्या सभागृहामध्ये विरोधकांना १७२ सदस्यांचे बळ हवे होते. विरोधकांना इम्रान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिके- इन्साफ’ या पक्षाचे मित्र असणाऱ्यांचाही पाठिंबा मिळाला. शनिवारी दिवसभरातील वादविवादानंतर न...

शेती व्यवसायाचे बदलते चित्र

  काळाच्या ओघात शेती व्यवसायाचे स्वरुपही बदलत आहे. यावेळीच्या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी कृषी क्षेत्रच होते. केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर करताना ड्रोनशी संबंधित मोठी घोषणा केली होती. मोबाईल आणि कॉम्प्युटर सारखाच रोजच्या आयुष्यात ड्रोनचाही समावेश करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं होतं. शेती व्यवसायात प्रगती व्हावी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजनांचा लाभ व्हावा हाच   केंद्र सरकराचा उद्देश राहिलेला आहे. त्यानुसारच आता कृषी क्षेत्रामध्ये बदल होत आहे.  ड्रोनच्या माध्यमातून शेतीकामे   तर पार पडावीच शिवाय कृषी पदवीधारकांना या माध्यमातून कामही मिळावे असा दुहेरी उद्देश साधत ड्रोनसाठी अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे ड्रोनचा वापर तर वाढणार आहेच पण हातपंपाने फवारणी करताना होणाऱ्या दुर्घटनाही टळल्या जाणार आहेत. त्याअनुशंगानेच कृषी यांत्रिकिकरण उपअभियनातून कृषी पदवीधारकांना ड्रोनयुक्त अवजारे सेवा सुविधा केंद्र सुरु करण्यासाठी ५ लाखापर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. तर विविध संस्थांनाही अनुदान देऊन ड्रोनचा शेती व्यवसायात वापर वाढवला जाणार आहे. याच अनुशंगाने गेल...

पर्यटकांचा 'स्वर्ग' संकटात

श्री लंकेतील सध्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. महागाई अनेक पटींनी वाढली आहे. देशाचा परकीय चलनाचा साठा रिकामा झाला आहे.   अन्नासाठी रेशनिंग आहे. खाद्यपदार्थांसाठी लोकांना रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यातही गोंधळ आहे. अनेकांचे अन्न पूर्णपणे संपले आहे. वीजपुरवठा खंडित झाला आहे. अधिकृतपणे ही कपात १० तासांची असली तरी प्रत्यक्षात विजेची स्थिती बिकट आहे. पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या असून लोकांना तिथे गाडी पार्क करून परत जा , तेल आल्यावर सांगितले जाईल , असे सांगण्यात आले आहे. श्रीलंका स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या वाईट आर्थिक स्थितीला पोहोचला आहे. लोकांकडे खायला काहीच उरले नाही , पेट्रोल संपले , वीज नाही , रुग्णालयांचे कामकाज ठप्प झालंय , देशावर प्रचंड कर्ज झाले आहे. लोक रस्त्यावर आलेत. परिणामी बरेच लोक देश सोडण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. श्रीलंकेतील लोक आता तेथून बोटीतून पळून शेजारच्या देशांकडे धावत आहेत. श्रीलंका सरकार जर या आर्थिक संकटाला हाताळू शकले नाही किंवा नजीकच्या काळात यावर काही उपाययोजना करू शकले नाही तर भविष्यात श्रीलंकेतील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता...

गुढी पाडवा, पवित्र धार्मिक सण

चै त्र महिन्यापासुन वसंत ऋतुच्या आगमनाला सुरूवात होते. त्यामुळे वातावरणात बदल झालेले असतात. जुनी सुकलेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते , आंब्याला मोहोर येतो. चैत्र महिन्यात हिंदू धर्मातील अनेक पवित्र आणि धार्मिक सण , उपवास इत्यादी पदार्पण करतात.   गुढी पाडवा हा एक भारतीय सण असून याच महिन्यात शुद्ध प्रतिप्रदेला महाराष्ट्रासह इतर काही ठिकाणी साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस असल्याने हिंदू नववर्षाची सुरुवातही याच दिवसापासून होते. गु ढी पाडवा दोन शब्दांच्या मिलनातून बनलेला आहे. गुढी या शब्दाचा अर्थ ' विजयाचा ध्वज ' आणि पाडवा म्हणजे ' प्रतिपदा '. या दिवशी घरा-घरात गुढी उभारली जाते. ही प्रतिकात्मक गुढी आनंदाचे , सुखाचे , सकारात्मकतेचे प्रतिक म्हणून पुजली जाते. या पवित्र दिवशी लोक आंब्याच्या पानांचे तोरण बनवून आपल्या घराचे दरवाजे सजवतात आणि असे मानले जाते की त्यांच्या घरात हे तोरण बनवल्याने सुख , समृद्धी आणि आनंद मिळतो. या पवित्र सणाच्या निमित्ताने लोक सकाळी लवकर उठतात , बेसन आणि उटणे लावून स्नान करतात . या दिवसापासून नविन मराठी वर्षाची सूरूवात होत अ...