मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

बालविवाह रोखण्यातील अपयश

भारत जगातील असा एकमेव देश आहे जिथे सर्वाधिक बालविवाह केले जातात. आज घडीला भारतात जवळपास २३ कोटींहून जास्त बालवधू आहेत. दुसरीकडे भारतात दरवर्षी १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या १५ लाख मुलींची लग्न होतात. अल्पवयीन मुलींचे हात पिवळे करून त्यांना बोहल्यावर चढविण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत तब्बल १५ हजारांहून अधिक बालविवाह झाले असल्याची धक्कादायक माहिती आहे. तर १८ वर्षांखालील तब्बल १५ हजार २५३ मुली माता बनल्याचीही माहिती सरकारने दिली आहे. त्यामुळे २००६ साली अस्तित्वात आलेला बालविवाह प्रतिबंध कायद्याची अद्यापही प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तसचं, केवळ १० टक्के बालविवाह रोखण्यातच राज्य सरकारला यश आलं आहे. ज्याची माहिती मिळाली, ते बालविवाह रोखले, परंतु गुप्तपणे झालेल्या बालविवाहांचे काय, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. कायदा असतानाही ही प्रथा बंद झाली नसल्याने कायद्यात दुरुस्तीची वेळ आली आहे, असे जाणकारांचे मत आहे. लोक इंस्टाग्राम वापरायला लागले पण त्यांचे विचार बदलले नाहीत हे यातून लक्षात येते. नॅशनल क्राईम रेकॉर्डनुसार, २०१९, २०२०, २०२१ या ती...

नाटू - नाटू... च यश

 जागतिक पातळीवर सन्मानाचा असा पुरस्कार सोहळा म्हणजे ऑस्कर. ऑस्कर पुरस्कार जिंकण्यासाठी जगभरातील चित्रपटांमध्ये चुरस रंगलेली असते. नुकत्याच झालेल्या ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोवला गेला आहे. आरआरआर या चित्रपटातल्या ‘नाटू नाटू’ या गाण्याला ‘बेस्ट ओरिजनल साँग’चा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. भारतीय प्रोडक्शनमध्ये बनलेलं हे पहिलं गाण आहे ज्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. याआधी स्लमडॉग मिलेनिअरच्या वेळी अशीच चर्चा झाली होती. तेव्हा जय हो गाण्याला हा पुरस्कार मिळाला होता. तो चित्रपट पूर्णपणे भारतीय नव्हता. त्याच्या चित्रपटाचं दिग्दर्शन डॅनी बॉयल ने केलं होतं. ‘नाटू’ शब्दाचा अर्थ अस्सल देशी आहे. इथल्या मातीच्या सुगंधाची अभिव्यक्ती आहे. या गाण्यातील प्रत्येक शब्द त्या गोष्टीशी नातं सांगतो, ज्या गोष्टींना इथल्या मातीचा गंध आहे. हे गाणं खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचं गीत आहे. यात एक कमकुवत लोक नाचता नाचता अजिंक्य समजल्या जाणाऱ्या ब्रिटिशांना आव्हान देतात आणि नमतं घ्यायला लावतात. याबाबत कुणाचंच दुमत नाहीय की, आरआरआरच्या यशाचं एक कारण सिनेमातील नाटू नाटू हे...

भारतातील बेरोजगारीतील वाढ चिंताजनक

वाढती बेरोजगारी ही भारतामधील एक प्रमुख समस्या आहे. गेली अनेक दशकं भारताला ही सामाजिक समस्या सतावतेय. हाताला काम मिळावे म्हणून देशातील तरूण वर्ग वणवण भटकतो आहे. पण सरकारी वा खासगी कुठल्याच क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधीच उपलब्ध होत नसल्याने बेरोजगारांच्या या फौजांवर वैफल्यग्रस्त होण्याची वेळ आली आहे. देशात बेरोजगारीचा दर पुन्हा वाढलेल्याचे दिसून येत आहे. भारतामध्ये आज लाखो तरुण नोकरीच्या शोधात आहेत. विशेष: सुशिक्षित तरुणांची यामध्ये संख्या मोठी असल्याचे प्राप्त आकडेवारीवरून दिसून येते. फेब्रुवारीमध्ये हा दर ७.४५ टक्के राहिला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इन इंडियन इकॉनॉमीने सांगितले की, शहरांपेक्षा ग्रामीण भागामध्ये बेरोजगारीचा दर वाढला आहे. शहरांमधील बेरोजगारीचा दर जानेवारीत ८.५५ टक्क्यांवरून ७.९३ टक्क्यांवर घसरला आहे. ग्रामीण भागामध्ये तो वाढून ६.४८ टक्क्यांवरून ७.२३ टक्के झाला आहे. केंद्र सरकार मात्र बेरोजगारीच्या समस्येवर समाधान शोधण्याऐवजी अर्थव्यवस्थेचा गाडा बघा कसा धावतो आहे, याचे आभासी चित्र रंगवण्यात मशगूल आहे. जीएसटीचे संकलन कसे नवनविन उच्चांक प्रस्थापित करत आहे आणि देशाची औद्योग...

देशातील घरकामगारांना गुलामाची वागणूक

देशातील ९ १ लाखांपेक्षा अधिकच्या घरकामगारांना कामाच्या ठिकाणी गुलामाची वागणूक मिळत असल्या ची बाब एका संशोधनातून समोर आ ली आहे. आपल्या मागण्यांविषयी घरेलू कामगारांनी अलिकडेच नॅशनल प्लॅटफॉर्म फॉर डोमेस्टिक वर्कर्सच्या बॅनरखाली २० हून अधिक राज्यांत आंदोलन केले होते. घरकाम करणाऱ्यांकडून घरातील धुणी, भांडी, कचरा, लादी, डस्टिंगपासून सगळी कामे केली जातात. मात्र या कामाचे पैसे न ठरल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळा मोबदला मिळतो. अनेकदा हा मोबदला घरकामगार काय मागणी करतो, ज्याच्या घरी काम करायचे त्याचे बार्गेनिंग स्किल अशा गोष्टींवर अवलंबून असतो. घरकामगारांना मिळणारा पगार हा शहरांमधील सामाजिक आर्थिक स्तरानुसार ठरतो. बंगळुरूतील कंपनी बाबाजॉब.कॉमच्या स र्व्हे नुसार, भारतात काम करणाऱ्यांना घरकामगारांना दरमहा १० हजारांपेक्षा कमी रुपये मिळतात. अहमदाबादमध्ये यांना दरमहा ६५०० रुपये मिळतात. तर मुंबईतील घरांत काम करणाऱ्यांना ७५०० रुपयांपर्यंत मिळतात. कोलकात्यात हे सर्वात कमी ५००० रुपये आहे. छोट्या शहरांत हा पगार ३००० ते ४००० दरम्यान असतो.   मोठ्या शहरांमध्ये झारखंड, रांची, आसाम, ओडिशा या राज्...

भारत बनणार आर्थिक महासत्ता

विकसीत जगतावर सध्या रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे या विकसीत राष्ट्रांवर मंदीचे सावट असून अनेक देशात महागाईने उच्चांक मोडीत काढले आहेत. अशा काळातही भारतीय अर्थव्यवस्था मात्र गतीने पुढे सरकत आहे. अलीकडच्या काळात भारताची आर्थिक वाढ झपाट्याने झाली आहे. भारताची दरडोई वाढ चीनच्या तुलनेत केवळ एक चतुर्थांश आहे. माञ योग्य धोरणांमुळे भारताचा विकास दर भविष्यात ७ टक्क्यांच्या वर असू शकतो. भारताची अर्थव्यवस्था चीनच्या तुलनेत खूप वेगाने वाढेल. यामुळे आगामी काळात भारत एक मजबूत आर्थिक शक्ती म्हणून उदयास येईल. रुपयाच्या आंतरराष्ट्रीय स्वीकृतीची व्याप्ती वाढवून, आर्थिक स्थिरतेचा आधारही वाढेल. जागतिक पातळीवर भारतीय रुपया कालांतराने प्रमुख चलनांपैकी एक बनू शकेल. म्हणजे येत्या काही काळात जगभरात भारतीय रुपया खणखणणार आहे. एकूणच कालांतराने डी-डॉलरायझेशनची प्रक्रिया होईल. भारत एक मोठा देश आहे आणि देशातील बहुतांश लोकसंख्या तरुण आहे. उत्तम शिक्षण आणि कौशल्य असलेले येथील तरुण भारताला एका मजबूत विकासाकडे नेऊ शकतात.  अनेक आव्हानाचा सामना करत असताना भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर ...

असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांच्या आर्थिक व सामाजिक समस्या

भारतात फक्त १० टक्क्यांपेक्षा कमी कामगार हे संघटीत क्षेत्रात काम करतात तर ९०  टक्क्यांपेक्षा अधिक कामगार हे असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात. त्यांची संख्या ४० कोटींपेक्षा अधिक आहे. असंघटित क्षेत्रातील कामगार हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. १९९५ च्या नॅशनल अकांउटस स्टॅटिटिक्स रिपोर्ट नुसार देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी ६५ टक्के उत्पन्न हे असंघटित क्षेत्रातील कामगारांकडून मिळते. अस्थिरता हे असंघटित क्षेत्राचे वैशिष्ट्य आहे. असंघटित कामगारांकरिता कल्याणकारी कार्यक्रम राबविण्यासाठी विविध मंडळांची स्थापना महाराष्ट्रात झाली खरी, परंतु असंघटित कामगारांपकी कितीजणांना या मंडळांमुळे सामाजिक सुरक्षा लाभली वा कल्याणकारी उपक्रमांचा लाभ पोहोचला हा संशोधनाचा विषय आहे. असंघटित क्षेत्रात कामगारांना किमान वेतन, बोनस, सामाजिक सुरक्षा मिळत नाही. त्यात महिलांना असंघटित क्षेत्रात अधिक काम करावे लागते. शेतमजूर, बांधकाम मजूर, घरकाम करणाऱ्या महिला, असे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण मोठे आहे. घरकामगार म्हणून काम करणा-या ८० टक्के महिलाच आहेत. कमी पगारावर काम करण्यास स्त्रिया...

भारताने दुध उत्पादनातील अव्वलस्थान टिकवणे गरजेचे

सहकाराच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय साकारणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे असे म्हणता येईल. अन्न आणि कृषी संघटनेच्या कॉर्पोरेट सांख्यिकी डेटाबेसमधील (एफएओएसटीएटी) उत्पादनविषयक माहितीनुसार २०२१-२२ मध्ये जागतिक पातळीवरील दूध उत्पादनात २४ टक्क्यांचे योगदान नोंदवत भारताने या क्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.  त्यानंतर अमेरिका, चीन, पाकिस्तान आणि ब्राझीलचा क्रमांक लागतो. २०१४-१५ ते २०२१-२२ अशा मागील ८ वर्षांच्या कालावधीत भारतातील दूध उत्पादनात ५१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. दुग्धव्यवसाय देशात या क्षेत्रातील ८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना थेट रोजगार देखील प्रदान करतो. २०२१-२२ मध्ये देशातील दुधाचे उत्पादन सुमारे ६.२ टक्के च्या चक्रवाढ वार्षिक वाढीने २०९.९६ दशलक्ष टन झाले आहे. २०१४-१५ मध्ये ते केवळ १४६.३१ दशलक्ष टन होते. न्यूझीलंड, नेदरलंड, बल्गेरिया, चीन, डेन्मार्क, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, लिथुआनिया, मलेशिया, इंग्लंड, अमेरिका, थायलंड असे मोठे स्पर्धक दूध उत्पादनात असताना त्यांना मागे टाकून अव्वल स्थान अबाधित राखणे तशी सोपी गोष्ट नाही. महासत्ताक होण्याच्या दिशेने भारताचे हे ए...