ब्लूमबर्गच्या २०२२ च्या अहवालानुसार आशियातील देशांना यावर्षी विक्रमी उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागणार आहे. जागतिक पातळीवरील गव्हाच्या पुरवठ्यावर उष्णतेच्या लाटांचा परिणाम झाला आहे. थायलंड आणि बांगला देशातील तापमानातही सातत्याने वाढ होत आहे. चीनच्या युनान प्रांतात तर उष्णतेमुळे दुष्काळ पडला आहे. देशातील विविध भागांत सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट नोंदवली जात आहे. दरम्यान , मे महिन्यात देशातील अनेक भागात तीव्र उष्णतेची शक्यता आहे. राज्यात मे महिन्यात कमाल तापमान अधिक राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात काही प्रमाणात उन्हाची झळ कमी बसणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार , मे महिन्यात कोकणात सरासरीपेक्षा कमाल तापमान अधिक राहणार आहे. विदर्भातील काही ठिकाणी देखील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. विदर्भात एक-दोन जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज असून महिन्यातील दोन दिवस सर्वाधिक उष्ण राहण्याचा अंदाज आहे. ...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.