मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

काळजाचा ठाव घेणारी साहित्यकृती ‘पाचाट'

  पुस्तक परीक्षण  सुरेश मंत्री मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणा-या बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील रहिवाशी असलेले माझे मित्र परशुराम गहिनीनाथ नागरगोजे यांच्या ‘पाचाट’ या लघुकादंबरीचे नुकतेच प्रकाशन झाले. मुळ व्यवसायाने विमा प्रतिनिधी असलेले परशुराम नागरगोजे यांची ही पहिलीच कादंबरी. या कादंबरीच्या निमित्ताने त्यांचा साहित्य विश्वात लेखक म्हणून प्रवेश झाला आहे. परशुराम नागरगोजे यांनी स्वत: बालपणी भोगलेल्या ऊसतोड कामगारांच्या कुटुंबातील जीवन संघर्षाची कहानी शब्दबद्ध करून लिहिलेली पाचाट ही साहित्यकृती आहे. या कादंबरीतून त्यांनी अल्पभूधारक शेतकरी, शेतमजुर, ऊसतोड कामगारांच्या कौटुंबीक, आर्थिक, सामाजिक, आरोग्यविषयक समस्या अत्यंत पोटतिडकीने मांडल्या आहेत. त्यांनी ही लघुकादंबरी मला समीक्षणासाठी पाठवून दिली आणि ती माझ्या हातात पडताच मी एका दमात वाचून काढलीही. पण पाचाटचे वाचन केले असता त्यांचे नवखेपण कुठेच जाणवले नाही. अत्यंत संयत, संयमाने आणि आत्मविश्वासाने त्यांनी ही कादंबरी लिहिल्याचे पदोपदी जाणवते. कादंबरी वाचत असताना त्यातील प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उ...

तुळजाभवानी मंदिरातील ड्रेस कोडचा निर्णय मागे

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिर प्रवेशासाठी मंदिर प्रशासनाने नियमावली तयार केली होती. तुळजाभवानी मंदिरात अंगप्रदर्शन करणारे वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना नो एन्ट्री केली होती. अंगप्रदर्शन, उत्तेजक, असभ्य, हाफ पॅन्ट, बर्मुडाधारकांना मंदिरात प्रवेश नाही. कपडे परिधान करण्याचा नियम फक्त महिलांसाठीच नाही तर हा नियम पुरुषांसाठीसुद्धा लागू केला होता. भारतीय संस्कृती व सभ्यतेचे भान ठेवण्याचे मंदिर संस्थांनने आवाहन केले होते. तुळजाभवानी मंदिर संस्थानने मंदिर परिसरात याबाबतचे फलक लावले होते. संस्थानच्या या निर्णयाचे मंदिरातील पुजारी आणि स्थानिक भाविकांनी स्वागत केले होते. परंतु काही जणांनी विरोधही केला.                          गुरुवारी दुपार नंतर वेस्टर्न कपडे किंवा तोडके कपडे असणाऱ्या कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. परंतु यानंतर समाजातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला. तुळजाभवानी मंदीर संस्थानने भाविकांच्या ड्रेस कोडवरून यु टर्न घेतला आहे. तो निर्णय मागे घेतला असून बॅनर काढले आह...

केरला स्टोरीने पठाणला पछाडले

द केरळ स्टोरी या चित्रपटावरुन वाद तर सुरुच आहे. राजकीय पक्षाच्या आक्षेप आणि चित्रपटाला बंदी घालण्याची मागणी, काहींचा पाठिंबा तर काहींचा कट्टर विरोध मात्र वादासोबत चित्रपटाची कमाई देखील तितकीच जोराने सुरु आहे. पहिल्या दिवसापासून चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. चित्रपटाला रिलिज होऊन दहा दिवस झाले असले तरी हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तयार करत आहे. पहिल्या वीकेंडमध्ये धमाकेदार कमाई केल्यानंतर द केरळ स्टोरीने दुस-या वीकेंडलाही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. द केरळ स्टोरीच्­या कमाईत दुस-या रविवारी म्हणजेच १० व्या दिवशी २३ कोटींच्या आसपास कमाई झाली. यासह, द केरळ स्टोरीची एकूण कमाई आता १३५.९९ कोटी रुपयांवर गेली आहे. तर दुसरीकडे शाहरुखचा सुपरहिट चित्रपट पठाण ज्याने बॉक्स ऑफिसवर १००० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचा रेकॉर्डही द केरळ स्टोरीने मोडला आहे. शाहरुख खानच्या पठाणने १० व्या दिवशी देशभरातील सर्व भाषांमध्ये केवळ १४ कोटींची कमाई केली आहे, तर द केरळ स्टोरीने १० व्या दिवशी यापेक्षा ९ कोटी जास्त कमाई केली आहे.               ...

'द केरळ स्टोरी' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर डंका

  द केरळ स्टोरी’ हा चित्रपट ५ मे रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वी त्यावरून बराच मोठा वाद निर्माण झाला होता. अजूनही काही राज्यांमध्ये या चित्रपटाला विरोध केला जात आहे. मात्र या वादानंतरही चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी जवळपास १६.६० कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत हा चित्रपट ५० कोटींचा टप्पा सहजरित्या गाठू शकेल, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत.  ज्या ज्या चित्रपटावरून वाद निर्माण झाला किंवा ज्याला प्रदर्शनाआधीच विरोध करण्यात आला, त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केल्याचा बॉलिवूडचा इतिहासच आहे. याआधी विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबाबतही हेच घडलं होतं. इतकंच नव्हे तर शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटानेही वादानंतर तुफान कमाई केली होती. त्यामुळे ‘द केरळ स्टोरी’लाही वादाचा फायदा झाल्याचं म्हटलं जातंय.  'द केरळ स्टोरी' विरोधात काल चेन्नईत निदर्शन झालं.  सिनेमाच्या निर्माते, कलाकार आणि दिग्दर्...

कृत्रिम बुद्धिमत्ता मानवासाठी धोकादायक ठरू शकते

कृत्रिम बुद्धिमत्ता   क्षेत्रात गुंतवणूक करणा-या जगभरातील शेकडो कंपन्या त्याचा फायदा घेत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मानवालाच हॅक केले जात असल्याचा दावा इस्रायलचे प्रख्यात इतिहासतज्ज्ञ आणि लेखक प्राध्यापक युवाल नोवा हरारी यांनी नुकताच केला आहे. सोशल मीडियावर आपण ज्या मित्रांची निवड करतोय कदाचित हा विचार केवळ आपलाच नसेल , ते कृत्रिम बुद्धिमत्ताने ठरवले असेल. आपले नाते कसे असावे , त्यातही हस्तक्षेप केला जातोय. समान राजकीय , धार्मिक विचारसरणीच्या लोकांना ‘व्होट बँक’बनवण्याचे लक्ष्य कृत्रिम बुद्धिमत्तेला दिले जाऊ शकते. त्या गटात लोकांना सामावून घेत नंतर प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तित्वाचा सखोल अभ्यास करून त्याचे विचार बदलले जाऊ शकतात. विश्वास ठेवा , जगात सध्या असे सुरू झाले आहे , असा दावा प्रा.हरारी यां नी केला आहे. आजवर कृत्रिम बुद्धिमत्ता अनेकविध उद्योगांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी सज्ज झाली आहे. गेली अनेक वर्षं बुद्धिबळासारख्या खेळात कृत्रिम बुद्धिमत्ता ने आव्हान दिलं होतंच ; पण आताही आरोग्यसेवेपासून ते वित्त , वाहतूक ते उत्पादनापर्यंत...

मे महिन्यात सूर्य आग ओकणार, अशी घ्या काळजी

ब्लूमबर्गच्या २०२२ च्या अहवालानुसार आशियातील देशांना यावर्षी विक्रमी उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागणार आहे. जागतिक पातळीवरील गव्हाच्या पुरवठ्यावर उष्णतेच्या लाटांचा परिणाम झाला आहे.   थायलंड आणि बांगला देशातील तापमानातही सातत्याने वाढ होत आहे. चीनच्या युनान प्रांतात तर उष्णतेमुळे दुष्काळ पडला आहे.   देशातील विविध भागांत सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट नोंदवली जात आहे. दरम्यान , मे महिन्यात देशातील अनेक भागात तीव्र उष्णतेची शक्यता आहे.   राज्यात मे महिन्यात कमाल तापमान अधिक राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात काही प्रमाणात उन्हाची झळ कमी बसणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.   हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार , मे महिन्यात कोकणात सरासरीपेक्षा कमाल तापमान अधिक राहणार आहे. विदर्भातील काही ठिकाणी देखील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. विदर्भात एक-दोन जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज असून महिन्यातील दोन दिवस सर्वाधिक उष्ण राहण्याचा अंदाज आहे.      ...

एटीएम पासून ते जीएसटी पर्यंत, १ मे पासून होतील हे ४ मोठे बदल

  एप्रिल महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे. सोमवारपासून नवीन महिन्याची सुरुवात होत आहे. १ मे पासून अनेक क्षेत्रात   बदल   दिसून येतील. त्याचा परिणाम तुमच्या खिशावर पडेल. गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल होऊ शकतो. वस्तू आणि सेवा करांपासून   ते म्युच्युअल फंडासंबंधीच्या नियमात बदलाचे वारे आहे. १ मे रोजी तुमच्या मोबाईलवरील कॉल आणि एसएमएस संबंधी सर्वात फायदेशीर बदल होत आहे. त्यामुळे तुमची नकोशा कॉल्सपासून सूटका होणार आहे. आता कॉल आणि फसवणुकीच्या एसएमएसच्या जाळ्यात कोणी अडकणार नाही.                      जीएसटी नियमांत बदल १ मे पासून व्यापारांना , व्यावसायिकांना जीएसटीमध्ये मोठा बदलाची पूर्तता करावी लागणार आहे. आता १०० कोटी रुपयांहून अधिकची उलाढाल असणाऱ्या कंपन्यांसाठी हा नियम आहे. त्यानुसार , या कंपन्यांनी व्यवहाराची पावती सात दिवसांत इनवॉयस रजिस्ट्रेशन पोर्टलवर   अपलोड करणे आवश्यक आहे. हा नियम अनिवार्य करण्यात आला आहे. अजून यासाठी कालावधी निश्चित करण्यात आला नाही. एटीएम बाबत मोठा बदल देशातील सर्वात मोठी सरकारी बँकेत...