तुकाराम भाऊराव ऊर्फ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील वाटेगाव या लहान गावात झाला. अण्णाभाऊ साठे हे एक झपाटलेले लेखक होते. अण्णाभाऊंचे वेगळेपण म्हणजे त्यांनी कुठलेही औपचारिक शालेय शिक्षण घेतले नव्हते. शाळेची पायरीदेखील न चढलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनाट्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. त्यांनी ३७ कादंबऱ्या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्ये, ११ पोवाडे, ३ नाटके, शेकडो गाणी, लावण्या, छकडी अशी विपुल साहित्यसंपदा निर्माण केली आहे. त्यापैकी सात कादंबऱ्यांवर नामवंत दिग्दर्शकांनी मराठी चित्रपटही काढले. अण्णाभाऊंच्या ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला. तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि.स.खांडेकर यांनीही या कादंबरीचे कौतुक केले होते. केवळ वीस वर्षांच्या कालावधीत त्यांनी हे विपूल साहित्य निर्माण केले. ही खरोखरी अचंबित करणारी गोष्ट आहे. सुरुवातीस ‘लोकयुद्ध’, ‘युगांतर’, ‘मराठा’ सारख्या दैनिकां...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.