मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कशासाठी?भाकरीसाठी....

आ पण सर्वांची धडपड ही दोन वेळची भाकर मिळवण्यासाठी चालू असते. ही भाकर मिळवण्यासाठी एखादा व्यवसाय , नौकरी करावी लागते किंवा रोजगार मिळवावा लागतो. अर्थातच ही सोय आपल्या गावातच होते असे नाही त्यामुळे आपले पोट भरण्यासोबतच जीवनमान उंचावण्यासाठी मला किंवा आपल्यापैकी अनेकांना आपल घर , गाव , शहरच नाही तर देश सुद्धा सोडावा लागला आहे. हि परिस्थिती केवळ आजची नाही तर मानव विकासाच्या प्रक्रियेत ही यात्रा सतत सुरू आहे.               पोटासाठी लोक हसत-हसत विस्थापितांच जीवन निवडतात अस म्हटल्यास वावग ठरणार नाही. माझे चुलते , भाऊ आणि अनेक स्वकियांनी भाकरीच्या शोधात आपल घर सोडल , त्यांचा निवासाचा पत्ता बदलला आणि जो जिथ गेला तिथलाच होवून राहिला तोही कायमचाच. ही वास्तविकता मानवी गरज आणि विकासाचा अभिन्न अंग झाली आहे. या गोष्टीला कोणीच नाकारणारही नाही. भाकरीचा शोध ही अशी बाब आहे ज्याला कोणी दूर्लक्षित करू शकत नाही. ही भाकर कुठे मिळेल याचा अंदाज सूरूवातीला कोणीच करू शकत नाही. हे काळच निश्चित करतो की आपल्याला कोठे जावे लागेल.आपला जन्म कुठे...

आता इंटरनेट अडिक्शनची भीती

ल वकरच  भारतामध्ये ५ जी इंटरनेट सुविधा सुरू करण्यासाठी हालचाली होत असल्याचे वृत्त आले आहे. भारतात इंटरनेटचा प्रसार झपाटयाने होत आहे. प्रतीदिन १.५ जीबी इंटरनेट सुविधा अत्यल्प दरात भेटत असल्याने भारतीय तरूणांना बेरोजगारीची जाणिव होत नसल्याचे मागे कुठेतरी माझ्या वाचनात आले होते. ही बाब वास्तविकतेपासून तरूणांना दूर करणारी आणि गंभीर आहे. भारतीय तरूणांमध्ये एकीकडे बेरोजगारी वाढत चालली आहे तर दूसरीकडे मोठया संख्येने तरूण इंटरनेट अडिक्शनकडे वाटचाल करित आहेत. सध्या देशाची एक मोठी संख्या स्मार्टफोन , इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या साइबर अडिक्शनची शिकार झाली आहे. यामुळे युवकात बेरोजगारी तसेच देशाच्या वास्तविक समस्यांच्या प्रती विचार करण्याची आणि त्यांना समजून घेण्याची क्षमता संपत आहे. इंटरनेट अडिक्शने केवळ भारतच नाही तर जगातील अनेक देश आता त्रस्त झाले आहेत. नुकतेच कैंब्रीज एनालिटिका कंपनीने फेसबुक वरिल डेटा लीक करून याचा वापर डोनाल्ड ट्रंप यांना विजयी करण्यासाठी केल्याची बाब समोर आली. तरूणांमधील इंटरनेट अडिक्शनचाच फायदा या कंपनीने घेतला.तरूणांचे व्यक्तीगत आकडे आता एखादया व्यक्तीला अथवा क...