मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शोषणमुक्तीचे शिलेदार : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

तुकाराम भाऊराव ऊर्फ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील वाटेगाव या लहान गावात झाला. अण्णाभाऊ साठे हे एक झपाटलेले लेखक होते. अण्णाभाऊंचे वेगळेपण म्हणजे त्यांनी कुठलेही औपचारिक शालेय शिक्षण घेतले नव्हते. शाळेची पायरीदेखील न चढलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनाट्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. त्यांनी ३७ कादंबऱ्या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्ये, ११ पोवाडे, ३ नाटके, शेकडो गाणी, लावण्या, छकडी अशी विपुल साहित्यसंपदा निर्माण केली आहे. त्यापैकी सात कादंबऱ्यांवर नामवंत दिग्दर्शकांनी मराठी चित्रपटही काढले. अण्णाभाऊंच्या ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला. तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि.स.खांडेकर यांनीही या कादंबरीचे कौतुक केले होते. केवळ वीस वर्षांच्या कालावधीत त्यांनी हे विपूल साहित्य निर्माण केले. ही खरोखरी अचंबित करणारी गोष्ट आहे.  सुरुवातीस ‘लोकयुद्ध’, ‘युगांतर’, ‘मराठा’ सारख्या दैनिकां...

नागपंचमीच्या निमित्ताने...

  जनमानसात श्रावण महिन्याला फार मोठे महत्व आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे बहुतेक धार्मिक सण या महिन्यात येतात. त्यामुळे या महिन्याला पवित्र महिना म्हणून मानले जाते. श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. सापाचे पर्यावरणीय महत्व आपल्या मनावर बिंबवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात. स्त्रिया पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दुध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करतात. नागदेवताची पूजा करून त्याला दुध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो. मात्र आता केवळ सापांची पूजा करून चालणार नाही तर त्यांना वाचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. नागपंचमीच्या निमित्ताने सापाविषयी असलेल्या अंधश्रद्धा नाहीशा करणे, गरजेचे आहे.  साप हा मांसाहारी प्राणी आहे. तो सस्तन प्राणी नाही. त्यामुळे तो लहान असताना सुद्धा दूध पीत नाही. त्य...

बालकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणारे पुस्तक ‘मनोरंजनातून विज्ञान’

 प्राध्यापक देवबा शिवाजी पाटील यांचे ‘मनोरंजनातून विज्ञान‘ हे नुकतेच बाळगोपालांसाठी प्रकाशित झालेले पुस्तक. या पुस्तकाचे मुखपृष्ठ बालकांना आकर्षित करणारे असून मलपृष्ठावर पुस्तकाविषयी मोजक्या शब्दात माहिती लिहिली आहे. पुस्तकाच्या शेवटी लेखकाचा परिचय आहे. या पुस्तकात सुंदरशा सहा विज्ञान बालकथा आहेत. निसर्गात घडणा-या विविध घटनांमागील वैज्ञानिक कारणे अत्यंत सोप्या, साध्या व मनोरंजक स्वरूपात कथा रुपात सांगितली आहेत. विज्ञान साहित्यातील विज्ञानकथा मुलांना खूप आकर्षित करतात. मुलांच्या विज्ञानकथा कशा असाव्यात या प्रश्नाच्या उत्तरात असे म्हटले जाते की मुलांच्या विज्ञानकथा या मनोरंजक शैलीत लिहिलेल्या काल्पनिक कथा असतात. कधीकधी विज्ञानाची तत्वे कठीण आणि कंटाळवाणी वाटतात. ती वर्गात समजत नाहीत, परंतु जेव्हा आपण ती विज्ञानकथेद्वारे समजावून सांगतो तेव्हा ती समजून घेणे सोपे होते. त्यामुळे शिक्षण प्रक्रिया मनोरंजक बनते. मुलांमध्ये शोध घेण्याची प्रवृत्ती आणि तर्कशक्ती विकसित होते. अशाच काल्पनिक कथा या पुस्तकात आहेत.   या विज्ञान कथा खूप मोठ्या आणि कंटाळवाण्या नाहीत सोबत प्रत्येक कथेत आकर्ष...

सुविचारांचा जागर करणारे आत्मचरित्र 'जागरण'

 लेखक, कविवर्य, वात्रटिकाकार श्री. भारत सातपुते यांचे 'जागरण' हे आत्मचरित्र वाचनात आले. पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत आकर्षक आणि बोलके आहे. आत्मचरित्राचा नायक म्हणजे स्वत: लेखक. त्याच्या जीवनातील बहुतांश काळ यात शब्दबद्ध केला जातो. कुठल्याही आत्मचरित्राची सुरूवात लेखकाच्या बालपणापासून होते. लेखकाचा अतीशय सामान्य कुटुंबात झालेला जन्म, हालाखीत गेलेले बालपण आणि शिक्षणासाठी केलेला संघर्ष पुस्तकाच्या पूर्वार्धात आहे. रस्त्यावर ओरडत चालले तर ‘‘ते खायला घे’’ म्हणून आईजवळ रडत बसायचे. आईकडे कुठले पैसे ? केसावर बंबई मिठाई मिळायची. आईने विंचरून न्हाणीच्या तुराटयांनी खचून ठेवलेले केस त्याला देऊन आमचे लाड पुरवायचे. दोन चार दिवसाला पुन्हा तो आला की पुन्हा आईजवळ हट्ट धरायचा, तवा आई चिडून म्हणायची, ‘‘आता कुठून घेऊ, मेले केसही जास्त गळत नाहीत ?’’ ‘कान तुटलेली काटवट अन एका बाजुला पळी व दुस-या बाजूला उलथने असलेले आई बरीच वर्ष जपू जपू वापरीत होती. सांडस नसल्याने पदराने धरून चुलीवरले भगुने उतरून घ्यायची. एकाच परातीत दोघे दोघे जेवायचे कारण घरात दोन दोनच जरमनच्या पराती, वाटया, तांबे असायचे. त्यातला मोठा ...