भा रतातील कोरोनाचा वेग अॉक्टोंबरचा शेवटचा आठवडा येईपर्यंत मंदावला, रुग्ण संख्या घटु लागली आहे. अनलॉक प्रक्रियेअंतर्गत जवळपास सर्व काही सुरु झाल आहे. या वातावरणात अनेकजण मात्र जणुकाही कोरोना संपला या अविर्भावात वागत आहेत. तोंडाला मास्क नाही, सॅनीटायजरचा वापर नाही आणि सोशल डिस्टेंसिंग तर नाहीच नाही. दूसरीकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अनेकांना कोरोनाच कसलच गांभीर्य नाही. कोरोना सारखा आजार झाल्यानंतर स्वतः सोबत कुटुंबाची काय दुरावस्था होते हे जे यातुन गेले आहेत त्यांना विचारा, नव्हे मलाच विचारा. कोरोनामुळे मी माझ्या वडिलांना कायमचा गमावून बसलो एवढच नाही तर स्वतः पॉझिटिव्ह झाल्याने त्यांच्या अंत्यविधीलाही उपस्थित राहू शकलो नाही याहुन मोठे काय दु:ख असेल? तो दिवस मी कधीच विसरु शकणार नाही. ९ अॉक्टोंबरला संध्याकाळी गावाकडून डॉक्टर असलेल्या चुलत भावाचा फोन आला. त्याने वडिलांना श्वास घेण्यात अडचण येत असुन तात्काळ अॉक्सिजनची गरज असल्याच सांगितल. मी तात्काळ गावाकडे धाव घेतली आणि वडिलांना स्वाराती मध्ये घेवून आलो. त्यांचा एक्सरे काढला असता न्युमोन...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.