मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नवीन वर्षाचे स्वागत करताना...

ब दल हा निसर्गाचा नियम आहे, तो सर्वांना मान्य करावाच लागतो. याच निसर्ग नियमानुसार २०२१ ला निरोप देण्याची आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याची वेळ आता जवळ येऊन ठेपली आहे. भारत शकांचा, मन्वन्तरांचा, तसेच इसवींचाही सन मोठय़ा उत्साहाने साजरा करतो. प्रारंभ म्हणजे सुरुवात! मागील चांगल्या-वाईट गोष्टींना मागे सारून नवीन होणा-या सूर्योदयासोबत नवसंकल्पांचे अवलंब करणे, आपल्यासाठी नक्की काय चांगले हे पडताळणे, सत्याची कास धरणे, हे माझ्याकडून सुटणारच नाही ह्यापेक्षा खरंच याने माझी किती हानी होते ह्याचा विचार करायला हवा. आपण नवीन वर्षात नव्या उत्साहाने कामाला लागणे म्हणजेच नवीन वर्षाचे स्वागत. नवे वर्ष आले म्हटल्यावर त्याचे स्वागत आणि त्यानिमित्ताने संकल्प करणे देखील ओघाने आलेच. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वांनी काहीना काही तरी प्लॅन्स केले असतील, आणि त्याच्या बरोबरीने नवीन वर्षामध्ये काय करायचे याचा संकल्पही केला असेल.. तसे पाहता प्रत्येकाचा नववर्षाचे स्वागत करण्याचा दृष्टीकोन वेग-वेगळा असतो..पद्धती वेगळ्या असतात..हा ज्याच्या त्याच्या संतोषाचा आणि समाधानाचा भाग आहे. नववर्षा...

आता २१ व्या वर्षी वाजवा रे वाजवा!

  मु लीच्या लग्नासाठी सध्या किमान १८ वर्षे वयाची अट आहे. मात्र लवकरच यात बदल होऊ शकतो. कारण मुलीच्या लग्नाचं किमान वय १८ वर्षांवरून २१ वर्ष करण्याच्या प्रस्तावावर सरकार दरबारी हालचाली सुरु झाल्या आहेत. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे विधेयक संसदेत मांडण्यासाठी मंजुरी देण्यात आली. या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक संसदेत मांडलं जाण्याची शक्यता आहे. विवाहाचं वय वाढवण्यासाठी बालविवाह कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून याविषयीचे संकेत दिले होते. या मुद्द्यावर स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सनं आपल्या अहवालात मुलीच्या लग्नाचं किमान वय १८ वरून २१ वर्षे करण्याची शिफारस केली होती. माजी खासदार जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. टास्क फोर्सनं आपल्या अहवालात आई बनण्याची वयोमर्यादा आणि महिलांशी संबंधित इतर समस्यांबाबतही आपल्या शिफारशी दिल्या होत्या. असा झाला कायद्याचा विकास... १. १८६० मध्ये भारतीय दंडसंहिता लागू करण्यात आल्यानंतर त्यात १० वर्षे वयाखालील मुलीशी शारीर...

जगावर ओमिक्रॉनची दहशत

  अ वघ्या १३ दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉनचा फैलाव आता जगभरात होतोय. दक्षिण आफ्रिकेच्या शेजारी देशात याच्या प्रसाराचा वेग वाढला आहे. बोत्सवाना, इस्वातिनी, झिम्बाब्वे, ब्राझिल, अमेरिका, कॅनडा, युरोपमध्ये अनेक देशांमध्ये ओमिक्रॉन आढळल्यानंतर भारत, दक्षिण कोरिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, साऊदी अरेबिया अशा आता जगभरातील तब्बल ४० देशांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झाल्यानं चिंतेत आणखी भर पडलीय. ओमिक्रॉनचा सर्वात जास्त फैलाव ख्रिश्चन बहुल राष्ट्रांमध्ये होण्याची शक्यता आहे. अवघ्या दोन दिवसांत २३ देशांत संसर्ग परसरला आहे. ओमिक्रॉनमुळे अद्याप एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही हे विशेष. ओमिक्रॉनमुळे जगभरातील अर्थव्यवस्थांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अनेक देशांमध्ये ख्रिसमस बाजारही बंद करण्यात आलेत. आता ओमिक्रॉनमुळे नव वर्षाच्या स्वागताच्या उत्साहावर देखील विघ्न आलंय. ब्राझीलमधील रिओ दि जेनेरियो या शहरात ३१ डिसेंबरचा उत्सव रद्द करण्यात आलाय. अमेरिकेतही ओमिक्रॉनचा संसर्ग वेगानं वाढत आहे. न्यूयॉर्कमध्ये आणखीन तीन ओमिकॉनबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आता अमेरिकेत येणाऱ्या सर्वच...

ओमायक्रॉन आणि वास्तविकता

 कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे सध्या जगातील अनेक देशांची चिंता वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेत सापडलेला ओमायक्रॉन व्हेरिएंट सध्या १९ हून अधिक देशांत पसरला आहे. डेल्टा व्हेरिएंटपेक्षा हा व्हेरिएंट घातक आणि अधिक वेगाने पसरत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना सतर्क केले आहे. त्यामुळेच बहुतांश देशांनी आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवेवर निर्बंध आणले आहेत. भारत सरकारनेही येत्या १५ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवेचा निर्णय स्थगित केला आहे. २६ नोव्हेंबरला नागरी उड्डाण मंत्रालयाने १५ डिसेंबरपासून भारतात येणाऱ्या आणि जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवेवरील बंदी हटवली होती. परंतु कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे सरकारने हा निर्णय तुर्तास स्थगित केला आहे. नवीन तारखेची घोषणा पुढील परिस्थितीचा आढावा घेऊन केली जाईल असं सांगण्यात आले आहे. काही देशांनी आफ्रिकेवरुन येणारी उड्डाणं रोखली तरीही यूरोप आणि अमेरिकेत हा व्हेरिएंट आढळला आहे. त्यामुळे भारतातही ओमायक्रॉनचा व्हेरिएंट आढळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत लसीकरण हा सर्वात्तम पर्याय आहे. भारतातील ७० टक्के जनतेला लसीचे दो...