मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अर्थसंकल्पापूढील आव्हाने

अर्थमंत्री निर्मला सीतारमण  मोदी सरकारची दुस-यांदा सत्ता स्थापन झाल्यानंतरचा दुसरा अर्थसंकल्प लोकसभेत उद्या सादर करणार आहेत.या अर्थसंकल्पाकडे अर्थातच संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीत मोठा विजय मिळवून परत सत्तेत आलेल्या मोदी सरकारसाठी आज पर्यंतचा सर्वात कठिण आणि आव्हानात्मक असा अर्थसंकल्प म्हणून याकडे पाहिले जात आहे.मोदी सरकार अशा वेळी अर्थसंकल्प सादर करणार आहे जेंव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल मंदीकडे असल्याच्या चर्चेने जोर पकडला आहे.सर्व आकडेवारीही याकडेच संकेत करित आहे.अशात मोदी सरकारपूढे कोटयावधी भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान आहेच सोबत ढासळत चाललेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्याची जबाबदारी सुद्धा. सध्या उत्पादनापासून मागणीपर्यंत मागील दोन दशकातील सर्वात सुस्तीचा काळ आहे.काही जाणकार सध्याच्या अवस्थेला नव्वदच्या दशकातील मंदीशी जोडत आहेत.तसतर सरकारने या मंदीला अल्पकालीन म्हटले होते मात्र ही गोष्ट खरी ठरली नाही आणि परिस्थिती दिवसेंदिवस खराबच होत गेली.अशा कठिण परिस्थितीत विविध सर्व्हेक्षणातुन आलेल्या आकडेवारीने एनडीए सरका...

चंद्र आहे साक्षीला

सुमारे ५० वर्षांपूर्वी मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते.तो दिवस होता २१ जुलै १९६९.नील आर्मस्ट्रांग याने चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर म्हटले होते ‘एका मानवाचे हे छोटेसे पाऊल मानतेसाठीची एक उंच उडी आहे.’अपोलोमिशन अंतर्गत १९६९ ते ११९७२ एकूण नऊ यान चंद्राकडे पाठविले गेले आणि सहा वेळा मानवाला चंद्रावर उतरविले गेले.अपोलो मिशन संपल्यानंतर तीन दशकांपर्यंत चंद्र मोहिमेबाबतीत एक प्रकारचा निरूत्साह जगात दिसून आला.मात्र आता चंद्राचे आकर्षण परत वाढत आहे.मागिल वर्ष चंद्र मोहिमांबाबतीत खूप विशेष राहिले.जानेवारी २०१९ मध्ये चीनी अंतराळयान चांग ई-४ ने एका छोटया स्वयंचलित रोवर सोबत चंद्रावर उतरून इतिहास रचला.दूसरीकडे मागिल वर्षातच भारताने आपल्या महत्वाकांक्षी चंद्र मोहिमेअंतर्गत चंद्रयान-२ ला चंद्राकडे पाठविले मात्र यात अपेक्षित यश मिळाले नाही.मागिल वर्षात ईस्त्राईलने सुद्धा एक छोटा लैंडर त्याच्याकडे पाठवला होता मात्र तोही दुर्घटनाग्रस्त झाला होता. आता परत अमेरिकेने आपले लक्ष चंद्राकडे केंद्रीत केले आहे.२०२३-२४ पर्यंत चंद्रावर मानवाला पाठवण्याच्या मिशनला घेवून अमेरिकेने कामाला वेग दिला आहे.अंतरा...