मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बिहारमधील राजकिय नाटय

बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा गेल्या बुधवारी २६ जुलैला राजीनामा दिला.बिहारमधिल आरजेडी , जेडीयू व काँग्रेसची सत्तेतील २० महिन्यांची महाआघाडी तुटली.लागोलग दूस-याच दिवशी म्हणजे गुरूवारी २७ जुलैला नीतीश कुमार यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली . या राजकिय नाटयामुळे बिहारमध्ये जेडीयू आणि भाजपा युतीचे सरकार सत्तेत आले.भाजपाचे सुशिल मोदी यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.नीतीश यांनी शुक्रवारी विधानसभेत आपले बहुमतही सिद्ध केले.बिहारमधील हे राजकिय नाटय अगोदरच ठरलेले होते , मात्र हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला की , हे सर्व नैसर्गिकरित्या घडत आहे.जनतेला अस वाटाव की , नीतीश यांनी भ्रष्टाचाराच्या विरूद्ध बिगुल वाजवले आहे.ईकडे नीतीश कुमार यांनी राजीनामा दिला नाही की , तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून भ्रष्टाचाराच्या विरूद्ध लढाई मध्ये सहभागी झाल्याबद्दल नीतीश कुमारांचे अभिनंदन केले.देशातील जनता निश्चितच एवढी राजकिय मुर्ख नाही . हा नरेंद्र मोदी आणि नीतीश कुमार यांच्यातील पूर्वनियोजीत कट होता हे आता जनतेच्या समोर आले आहे.भाजपालाही फक्त नीतीश य...

भाजपाची दुटप्पी भुमिका

                    केंद्रातील वर्तमान एनडीए सरकारला सत्तेत येवून ३ वर्षे होवून गेली आहेत.भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा आणि भाजपाच्या अन्य नेत्यांनी दावा केला आहे की , मोदींचे सरकार यापूर्वीच्या यूपीए सरकारच्या तुलनेत अधिक चांगले आणि स्वच्छ प्रतिमा असलेले सरकार आहे.मागील तीन वर्षात मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही.काळ्या धनाच्या प्रश्नापासून नोटबंदीपर्यंत सरकारने केलेल्या कामाबद्दल बोलून या नेत्यांनी केंद्रातील एनडीए सरकार भ्रष्टाचार मुक्त असल्याचे ठासून सांगितले आहे.या नेत्यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे की , मागील सरकारवर लागलेल्या सर्व भ्रष्टाचाराच्या आरोपांचा मोदी सरकार तपास करेल आणि आरोपींना कायदयानूसार शिक्षाही मिळवून देईल.या नेत्यांनी मोदी सरकारच्या बाबतीत केलेला हा दावा काही अंशी खराही आहे , मात्र मागील सरकारवरिल आरोपांच्या तपासासंदर्भातील या नेत्यांच्या विधानावरून काही प्रश्नही निर्माण झाले आहेत.सीबीआय आणि ईडी सारख्या तपास संस्थांमार्फत निष्पक्...

मोबाईलचे युग

त्यावेळी   मी महाविद्यालयात शिकत होतो. मोबाईलचे दूरसंचार क्षेत्रात नुकतेच पदार्पण झाले होते. क्वचितच कुणाच्यातरी हातामध्ये नोकियाचा मोठा मोबाईल हॅन्डसेट दिसायचा. लोकांना त्या कडे बघून कुतुहल वाटायचे. त्याकाळी फक्त कॉल करण्याचे नाही तर कॉल आला तरी कमीत-कमी एका कॉल मागे जवळपास ८ रुपये मोजावे लागायचे. असं वाटायच की फोन नाही बिल येत आहे. व त्यामुळे आत्ता सारख कोणी मोबाईलवर जास्त वेळ बोलत नसे , फक्त कामापूरतेच थोडक्यात बोलत असत. व साहजिकच मोबाईल खूप महागडे आणि कॉलचे दर ही खूप असल्याने याचा वापर करणे सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरचे होते . कुणाकडे मोबाईल असणे हे त्याकाळी खूप प्रतिष्ठेचे लक्षण समजले जायचे. कुणी जर संपर्कासाठी आपला मोबाईल नंबर देवू केला तर लोकांच्या भुवया उंचवायच्या. आज स्थिती अशी आहे की , लोक आपला मोबाईल नंबर व्हिजिटींग कार्डवर टाकून वाटत आहेत. आज मोबाईलवर मोठ-मोठे लोक सहज उपलब्ध होतात , जसे की ते आपल्या चोविस तास सेवेत आहेत. यात अंतर एवढेच आहे की , यापैकी काही लोक ज्यांच्याकडे त्यांचे काम आहे , त्यांचेच फोन उचलतात आणि त्यांच्याकडे ज्यांचे काम आ...

अमरनाथ यात्रेकरूंवरिल हल्ला आणि धार्मिक विरोधाचे राजकारण

काश्मीर मध्ये गेल्या सोमवारी दहशतवादयांनी अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर हल्ला केला.या हल्ल्यात ७ यात्रेकरूंचा मृत्यू झाला तर २५ यात्रेकरू जख्मी झाले.दहशतवादयांनी यावेळी केवळ यात्रेकरूंवर हल्ला केला नाही तर पोलिसांवरही हल्ला केला.तस पाहिल तर हा अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला पहिला हल्ला नाही.यापूर्वीही अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवादयांनी १० पेक्षा जास्त हल्ले चढविले आहेत.या हल्ल्यांपैकी काही हल्ले अयशस्वी झाले होते तर इ.स.२००० मध्ये पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३२ अमरनाथ यात्रेकरूंसहित ३५ नागरिकांचा मृत्यू झाला होता.खरं तर या हल्ल्याची जेवढी निंदा करावी तेवढी कमी आहे मात्र या हल्ल्याची निंदा करण्याच्या आडून काही लोकांनी धार्मिक विरोधाचे राजकारण करण्याचा जो प्रयत्न चालवला आहे तो निंदनीय आहे. गेल्या सोमवारी गुजरात मोटार परिवहनची मान्यता असणारी बस क्रमांक जीजे ०९ जेड ९९७६ ही बस अमरनाथ यात्रेकरूंचे दर्शन झाल्यानंतर परतत होती.या बस मध्ये अधिकाधिक गुजरातच्या भाविकांचा समावेश होता.अस सांगितल जात आहे की , ही बस जम्मू आणि पहलगामच्या मधिल अमरनाथ यात्रेचा नियोजीत मार्ग सोडून श्रीनगर मध्य...