ए खाद्या ठराविक ठिकाणी अनेक वर्षांपासून असलेली ऊन , वारा , पाऊस , थंडी यांची स्थिती म्हणजे हवामान. या सरासरी हवामानातला बदल म्हणजेच हवामान बदल. हवामान बदलामुळे पृथ्वीवरील भीषण नैसर्गिक संकटांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. हा दावा संयुक्त राष्ट्राने नुकत्याच जारी झालेल्या एका अहवालात केला आहे. त्यानुसार २०३० पर्यंत जगाला दरवर्षी ५६० आपत्तींचा सामना करावा लागेल. सध्या २०१५ पासून जग वार्षिक ४०० संकटांचा सामना करत आहे. युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शनच्या अहवालात १९७० ते २००० पर्यंत आपत्तीची वार्षिक संख्या ९० ते १०० च्या आसपास होती. ही मध्यम ते मोठ्या प्रमाणावरील संकटांची आकडेवारी आहे. यूनोच्या अहवालात २०३० पर्यंत दुष्काळ पडण्याच्या प्रकरणांत ३० टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला. या अहवालानुसार २००१ च्या तुलनेत २०३० मध्ये उष्ण वारे अर्थात उष्णतेच्या लाटांचे प्रमाण ३ पट वाढेल. तसेच दुष्काळ पडण्याच्या प्रकरणांतही ३० टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे गत मार्च महिन्यातच वाढत्या तापमानाने १२१ वर्षांतील उच्चांक मोडला होता. संशोधनात सहभागी शास्त्रज्ञा...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.