बिहार विधानसभा निवडणूका बरोबरच ११ राज्यांच्या ५६ जागांसाठी पोटनिवडणूका होणार आहेत. या पोटनिवडणूकांचे खास महत्व असल्याने याकडे दूर्लक्ष करून चालणार नाही. विशेषकरून मध्यप्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणूकांचे निकाल अर्थपूर्ण राहतील. मध्यप्रदेश मध्ये २८ जागांसाठी मतदान होणार आहे. याच्या निकालांवर तेथील सरकारची स्थिरता अवलंबून असेल. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि कमलनाथ यांचे राजकिय भवितव्य या निकालांवर अवलंबून असेल. जर या जागांचे समिकरण बघितले तर यापैकी अधिकाधिक जागा अशा आहेत जिथे २०१८ मध्ये भाजपाच्या राज्यस्तरिय प्रबळ नेत्यांचा पराभव करून काँग्रेसचे उमेदवार जिंकले होते. मात्र हेच काँग्रेसचे उमेदवार या पोटनिवडणूकीत भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणूक मैदानात असतील कारण ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सोबत त्यांनीही पक्षांतर केले आहे. पक्षांतर करणा-या सर्व काँग्रेसी नेत्यांना भाजपाकडून जर तिकिट देण्यात आलं तर भाजपाच्या जुन्या नेत्यांकडून बंडखोरीचे संकट भाजपासमोर निर्माण होवू शकत. पक्षामध्ये या मुद्दयावर विचारमंथन सुरू आहे. भाजपाच्या नेत्यांचा एक वर्ग असा आहे ज्यां...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.