मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जीवनाचा खरा आनंद महिलांकडुन शिका

नुकतेच एक संशोधन आले आहे.जे पुरूष महिलांच्या सान्निध्यात राहतात त्यांच्यामधे तणाव आणि नैराश्य कमी निर्माण होते.एवढेच नाही तर ज्या महिला महिलांच्या सान्निध्यात अधिक राहतात त्यांची सुद्धा तणाव आणि नैराश्यासंबंधीची तक्रार कमी असते.याचा अर्थ महिलांच्या सान्निध्यात राहिल्याने तुम्ही स्वत:ला अनेक आजारांपासून वाचवू शकता.असा बिलकुल विचार करू नका की हा केवळ विचार आहे.हे एक वैज्ञानिक सत्य आहे. गोष्ट ही आहे की,पुरूषांचा मेंदु चौकोनी असतो.जो अनेक खान्यात विभागलेला असतो.एकात काम,दुस-यात आराम,तिस-यात प्रसिद्धी आणि चौथ्यात पैसा.मी इथं चार खाने लिहीली आहेत याचा अर्थ असा नाही की केवळ ही चार खानी असतात.असु शकत,शंभर खाने असतील.पुरूष वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या गोष्टींवर विचार करू शकतात.महिलांचा मेंदु मात्र गोलाकार असतो.थांबा,अस मी म्हणताच आपण मेंदुचा एक्स रे घेवून बसु नका की पाहु कुठे चौकोनी असतो आणि कुठे गोल?भौतीक स्वरूपात महिला आणि पुरूषांचा मेंदु एकसारखाच असतो मात्र महिलांचा मेंदु मी यासाठी गोल म्हणतोय कारण त्यांच्या मेंदुत वेगवेगळया खान्यांच्या सीमा असत नाहीत.एक महिला स्वयंपाक करता-करता मुलांचा गृ...