मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

LITERATURE लेबलसह पोस्ट दाखवत आहे

विचारांचे भावविश्व : विचार मंथन

विचारमंथन हा लेखसंग्रह आहे. यामध्ये विविध विषयांवरचे एकूण ३४ लेख असून पुस्तकास प्रा.डॉ. श्रीमती शैलजा बरुरे यांची प्रस्तावना लाभलेली आहे. मुखपृष्ठ उमेश डोंगे यांचे आहे. या पुस्तकाची अनुक्रमणिका चाळल्यानंतर वाचकांच्या सर्वप्रथम लक्षात येते की, विविध विषयावरील लेखांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. लेखकाने आपल्या मनोगतामध्ये शाळेत विज्ञान शिक्षक म्हणून काम करत असताना नवीन प्रवेशित विद्यार्थिनीचे नाव "नकोशी" आहे हे पाहिल्यानंतर तिच्या जन्माची आणि तिच्या नकोशा असण्याची कथा सर्वप्रथम उजेडात आणली. शिक्षण विभागाने हा लेख प्रकाशित होताच, या मुलीच्या नाव बदलाच्या प्रस्तावास मंजुरी दिली आणि त्या विद्यार्थिनीचे नाव बदलण्यात आले. एक शिक्षक, एक स्तंभ लेखक एका विद्यार्थिनीला तिच्या नकोशा असणाऱ्या अस्तित्वाला शिक्षण विभागाच्या आणि जीवनाच्या केंद्रस्थानी आणतो. मला वाटतं लेखन, साहित्य मग ते कोणत्याही प्रकारच असो, स्तंभ लेखन, ललित अथवा वैचारिक किंवा कथा, कादंबरी, कविता या सगळ्यांचा उद्देश माणूसपण जिवंत ठेवून माणसाला जगण्यासाठी आधार देणे, कधी कधी उभारी देणं हाच साहित्याचा हेतू असतो.  भारतात...

माझा लेखन प्रवास

  आपलं संपूर्ण आयुष्य दूस-यांची उणी-दूणी काढण्यात , त्यांच्यातील कमतरता शोधण्यात जात. स्वत:ला मात्र आपण फार कमी ओळखतो , त्यामुळे आपल्यात असलेली सुप्त कौशल्ये स्वत: आपल्याला माहित नसतात. काहीसं असच माझ्या बाबतीत झाल. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अगदी ११ वी पासून मी पत्रकारीतेला सुरूवात केली. दै. लोकप्रश्नला धारूर तालुका प्रतिनिधी म्हणून सहा वर्षे काम केल. पूढे मात्र शिक्षणासाठी आणि नंतर नोकरीसाठी गाव सोडाव लागल आणि पत्रकारीता मागे सुटली. शिक्षक म्हणून काम करित असताना शाळेत नव्याने आलेल्या नकुशाच नाव बदलण्याचा प्रस्ताव मी कार्यालयामार्फत शिक्षण विभागाकडे पाठवला. मात्र अनेक महिने लोटुनही शिक्षण विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद भेटत नव्हता. तेंव्हा परत एकदा माझ्यातील पत्रकार जागा झाला आणि स्वानुभवातून लिहिलेला ‘नकुशा’ हा लेख साकार झाला. हा माझा पहिला लेख दै. झुंजार नेता मध्ये प्रकाशित झाल्यानंतर या दैनिकाचे तत्कालिन कार्यकारी संपादक अशोक देशमुख यांनी मला फोन करून लेखाची प्रशंसा केली सोबत पूढे लेखन सुरू ठेवा अशी सूचना केली. मी हो-नाही म्हणत जरा कचरतच होकार दिला खरा पण पूढे जमेल का न...

नव साहित्यिकांना नव साहित्य चळवळीचा मार्ग सापडला

नव साहित्यिकांच्या साहित्यप्रज्ञेचा शोध घेण्याच्या आणि त्यांच्या सृजनशिलतेला मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एका नविन साहित्य चळवळीची सुरूवात येत्या ३१ मेला भूम येथून होत आहे. राष्ट्र्माता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून भूम येथील शंकरराव पाटील महाविद्यालय आणि साहित्य संघाच्या संयुक्त विद्यमाने यादिवशी पहिल्या एकदिवसिय जिल्हास्तरिय साहित्य संमेलनाचे आयोजन शंकरराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील असे नवोदित साहित्यिक ज्यांना अद्याप कुठलेही व्यासपिठ आपले साहित्य सादर करण्यासाठी भेटलेले नाही, त्यांना आपले स्वरचित साहित्य सादरीकरणाची संधी याठिकाणी भेटेलच सोबत या साहित्यिकांना अनुदान स्वरूपात, मोफत स्वरूपात किंवा सवलतीच्या दरात प्रकाशन संस्था उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न साहित्य संघाच्या माध्यमातून केला जाणार आहे. या संमेलनास नवोदित साहित्यिकांचा तसेच रसिक श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळेल यात शंका नाही. पत्रकार व लेखक शंकर खामकर यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या या संमेलनरूपी रोपट्याचे नजिकच्या काळात वटवृक्षात र...

एका पर्वाचा अस्त!

शि वाजी महाराजांचे चरित्र उभ्या महाराष्ट्राच्या घराघरात नेणाऱ्या, अमोघ वक्तृत्वाने मराठीजनांना खिळवून ठेवून त्यांच्यात वीरश्री अन राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्याचा शब्दयज्ञ तब्बल साठहून अधिक वर्षे करणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. समाजप्रिय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा संपर्क अनेक क्षेत्रांशी असल्याने त्यांच्या निधनामुळे केवळ पुण्यातीलच नव्हे तर देशातील त्यांच्या हजारो चाहत्यांना धक्का बसला आहे. अलीकडेच बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभरीत पर्दापण केले होते. यानिमित्त पुण्यात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक राजकीय नेत्यांनी ऑनलाईन उपस्थिती लावत बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.  "शिवाजी महाराज' हा सप्ताक्षरी मंत्र शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यभर जपला. या मंत्राच्या साह्याने "वन्ही तो चेतवावा । चेतविता चेततो।' या समर्थ वचनाला साक्षी ठेवत मराठी मनाची मरगळ दूर केली. बाबासाहेबांनी इतिहासाचे वेड पेरले. त्यांच्या प्रेरणेने अनेक शिवभक्त आणि गडप्...

लोकलेखक अण्णाभाऊ साठे

तु काराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील वाटेगाव या लहान गावात झाला. अण्णांनी आपले उभे आयुष्य मुंबईच्या चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली. अण्णाभाऊंची निरीक्षण शक्ती अत्यंत सूक्ष्म होती. नाट्यमयता हाही त्यांच्या लेखनशैलीचा आगळा-वेगळा गुण. ज्या उपेक्षितांच्या जीवनातून अण्णाभाऊंनी अनुभूती घेतली , त्यातील क्षणाचा वेग आणि आवेग त्यांच्या लेखनात जाणवत राहतो. लेखनातील लवचिक भावचित्रे अंगासरशा मोडीने साकार करण्याची त्यांची लकबही स्वतंत्र आहे. लेखन शैलीवर त्यांनी सर्वस्व अर्पण केलं होतं. शाळेची पायरीदेखील न चढलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्यातील लोकवाङमय , कथा , नाट्य , लोकनाट्य , कादंबऱ्या , चित्रपट , पोवाडे , लावण्या , वग , गवळण , प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. त्यांनी ३७ कादंबऱ्या , १९ कथासंग्रह , १४ लोकनाट्ये , ११ पोवाडे , ३ नाटके , शेकडो गाणी , लावण्या , छकडी अशी विपुल साहित्यसंपदा निर्माण केली आहे ; ही खरोखरी अचंबित करणारी गोष...