मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतात चित्ता पुन्हा धावणार

  चित्ता  पृथ्वीतलावरचा अत्यंत वेगवान समजला जाणारा हा प्राणी आहे . शिकारीमागे  तो  ताशी १२० किलोमीटरच्या वेगाने धावतो. त्याचा  वेग थक्क करणारा असाच आहे. जेव्हा  तो  शिकारीचा पाठलाग करतो तेव्हा त्याला कॅमे-यात टिपणं अवघड होवून बसतं. कारण त्याच्या शरीराच्या हलचाली अत्यंत वेगवान असतात. वन्यजीव अभ्यासकांच्या मते चित्यांसाठी गवताळ प्रदेश पोषक मानला जातो. चित्ता हा प्राणी सिंह, वाघ, बिब ट्या या प्राण्यांप्रमाणेच फेलिडो अर्थात मार्जारकुळातील असल्याचं काही वन्यजीव अभ्यासकांच म्हणनं आहे. तर काही वन्यजी व अभ्यासकां ना ते मान्य नाही. ए केकाळी चित्त्याचं वास्तव आफ्रिका आणि भारतीय उपखंडातील सपाट भुभागावर होतं. भारतात मुघलांच्या काळात देखील चित्ते मुबलक प्रमाणात होते. १६ व्या शतकात मुघल बादशाह जहांगीर यांच्या काळात जगात पहिल्यांदाच चित्ता पाळण्यात आला. आपल्या काळात एकूण १० , ००० चित्ते होते आणि त्यापैकी १००० आपल्या दरबारात होते, अशी नोंद जहांगीर यांचे वडील अकबर यांनी केली आहे. तर मुघल सम्राट अकबरकडे ९ , ००० पेक्षा जास्त चित्ते होते. ऐतिहासिक नोंदीनुसार छत...

सुपरस्टार राजेश खन्ना

 बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचा आज स्मृतीदिन आहे. राजेश खन्नाचं नाव इतिहासात नोंदलं गेलं आहे ते १९६८-७६ या कालावधीतल्या त्याच्या अशक्य अशा यशामुळे. राजेश खन्ना यांनी एकामागोमाग एक असे सलग १५ हिट सिनेमे दिले होते. यानंतर प्रत्येक दिग्दर्शक आणि निर्मात्याला राजेश यांच्यासोबतच काम करायचं होतं. सिनेमात राजेश खन्ना असणं हीच गोष्ट तो सिनेमा हिट करण्यासाठी पुरेशी होती. या काळात रोमान्सला एक नवी ओळख देणारे राजेश खन्ना होते. पुढेही त्याने सुपरहिट चित्रपट दिले, नाही असं नाही. पण ही वर्षं फिरून पुन्हा आली नाहीत. वैभवाचे दिवस सरले तरी राजेश खन्ना पुन्हा सामान्य माणूस होऊच शकला नाही. मनाने तिथंच राहिला. चित्रपट उद्योग बदलला. प्रेक्षक बदलले. अमिताभ बच्चन नावाच्या नव्या वादळाने जुने हिशेब उधळून टाकले. राजेश खन्ना मात्र अखेरपर्यंत पुनरागमनाचे प्रयत्न करत राहिले. राजेश खन्ना यांचा जन्म २९ डिसेंबर १९४२ मध्ये पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्यांचं मूळ नाव जतीन खन्ना असं होतं. त्यांच्या वडिलांचे नाव होते लाला हिरानंद आणि आईचे नाव होते चंद्रानी खन्ना. त्यांचे वडील लाला हिरानंद एम. सी. हायस्कू...

पाकिस्तानही श्रीलंकेच्या वाटेवर ?

 आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी  देश सोडून पलायन केल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. भारताकडून श्रीलंकेला शक्य ती मदत केली जात आहे. श्रीलंकेपाठोपाठ आता पाकिस्तानही दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असल्याची बातमी आहे. पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीबाबत जगातील आघाडीच्या रेटिंग एजन्सींनी इशारा दिला आहे. फिचकडून १७ देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये पाकिस्तान, ट्युनिशिया, घाना, इथिओपिया, ताजिकिस्तान, अर्जेंटिना, बेलारूस इत्यादी देशांचा समावेश आहे. एजन्सीने जारी केलेल्या अहवालात पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे दिवाळखोर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानची सद्य आर्थिक परिस्थिती पाहून असे वाटते की, तोही श्रीलंकेच्या वाटेवर जात आहे. श्रीलंकेतही या परिस्थितीची सुरुवात परकीय चलनाच्या साठ्यात घट झाल्यापासून झाली. यानंतर रेटिंग एजन्सींनी तेथील रेटिंग कमी केले. त्यामुळे श्रीलंकेतील गुंतवणुकीवर परिणाम झाला. एवढेच नाही तर सहज कर्ज मिळणे बंद झाले. सध्या श्रीलंकेचा महागाईचा दर ५०...

समलैंगिकता आणि भारतीय चित्रपट

  समलैंगिक संबंध हा खरं तर संवेदनशिल विषय. फ्रा न्स , यूएसए , यूके आणि न्यूझीलंड मध्ये समलिंगी विवाहाला परवानगी आहे. तर नेपाळ आणि चीन मध्ये समलैंगिक संबंध हा आता गुन्हा नाही मात्र इराणच्या कायद्यात यासाठी मृत्यूदंड आहे. सहमतीचा समलैंगिक संबंध म्हणजे गुन्हा नाही हे ठरवणारा भारत हा नेपाळनंतर दक्षिण आशियातील दुसरा देश. हा निर्णय येऊन जवळपास चार वर्षेच झाली आहेत. समलैंगिक समुदाय भावना , सत्य , सामाजिक मर्यादा , परंपरा , समानता आणि कायदा यांच्या या चक्रात आजही अडकलेला दिसून येतो. समाज आणि चित्रपट हे नाते परस्परपूरक आहे हे सर्वश्रुत आहेच. समाजाचे प्रतिबिंब चित्रपटात आणि चित्रपटाचा प्रभाव समाजावर असे ते समीकरण आहे. समलैंगिक संबंधांवर आधारीत चित्रपट बनवणं हा हिंदी चित्रपटसृष्टीसाठी अनेक वर्षांपासून नाजूक आणि क्लिष्ट मुद्दा राहिलेला आहे. पूर्वी अशा विषयावर चित्रपट बनवण आणि प्रदर्शित करण हे एकप्रकारच धाडसच होत. सुरूवातीच्या काळात अशा चित्रपटांना बऱ्याच प्रश्नांना सामोरे जावे लागले. अनेकदा त्यावरून वादही झाले. चित्रपटांवर बंदीचे सावटही आले. त्या काळी समलैंगिक संबंध हा विषय तितक्या सहजतेने स्...