मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ENVORANMENT लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भारतात चित्ता पुन्हा धावणार

  चित्ता  पृथ्वीतलावरचा अत्यंत वेगवान समजला जाणारा हा प्राणी आहे . शिकारीमागे  तो  ताशी १२० किलोमीटरच्या वेगाने धावतो. त्याचा  वेग थक्क करणारा असाच आहे. जेव्हा  तो  शिकारीचा पाठलाग करतो तेव्हा त्याला कॅमे-यात टिपणं अवघड होवून बसतं. कारण त्याच्या शरीराच्या हलचाली अत्यंत वेगवान असतात. वन्यजीव अभ्यासकांच्या मते चित्यांसाठी गवताळ प्रदेश पोषक मानला जातो. चित्ता हा प्राणी सिंह, वाघ, बिब ट्या या प्राण्यांप्रमाणेच फेलिडो अर्थात मार्जारकुळातील असल्याचं काही वन्यजीव अभ्यासकांच म्हणनं आहे. तर काही वन्यजी व अभ्यासकां ना ते मान्य नाही. ए केकाळी चित्त्याचं वास्तव आफ्रिका आणि भारतीय उपखंडातील सपाट भुभागावर होतं. भारतात मुघलांच्या काळात देखील चित्ते मुबलक प्रमाणात होते. १६ व्या शतकात मुघल बादशाह जहांगीर यांच्या काळात जगात पहिल्यांदाच चित्ता पाळण्यात आला. आपल्या काळात एकूण १० , ००० चित्ते होते आणि त्यापैकी १००० आपल्या दरबारात होते, अशी नोंद जहांगीर यांचे वडील अकबर यांनी केली आहे. तर मुघल सम्राट अकबरकडे ९ , ००० पेक्षा जास्त चित्ते होते. ऐतिहासिक नोंदीनुसार छत...

हवामान बदलाची गंभीर दखल घेणे गरजेचे

ए खाद्या ठराविक ठिकाणी अनेक वर्षांपासून असलेली ऊन , वारा ,  पाऊस ,  थंडी यांची स्थिती म्हणजे हवामान. या सरासरी हवामानातला बदल म्हणजेच हवामान बदल.   हवामान बदलामुळे पृथ्वीवरील भीषण नैसर्गिक संकटांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. हा दावा संयुक्त राष्ट्राने नुकत्याच जारी झालेल्या एका अहवालात केला आहे. त्यानुसार २०३० पर्यंत जगाला दरवर्षी ५६० आपत्तींचा सामना करावा लागेल. सध्या २०१५ पासून जग वार्षिक ४०० संकटांचा सामना करत आहे. युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शनच्या अहवालात १९७० ते २००० पर्यंत आपत्तीची वार्षिक संख्या ९० ते १०० च्या आसपास होती. ही मध्यम ते मोठ्या प्रमाणावरील संकटांची आकडेवारी आहे. यूनोच्या अहवालात २०३० पर्यंत दुष्काळ पडण्याच्या प्रकरणांत ३० टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला. या अहवालानुसार २००१ च्या तुलनेत २०३० मध्ये उष्ण वारे अर्थात उष्णतेच्या लाटांचे प्रमाण ३ पट वाढेल. तसेच दुष्काळ पडण्याच्या प्रकरणांतही ३० टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे गत मार्च महिन्यातच वाढत्या तापमानाने १२१ वर्षांतील उच्चांक मोडला होता. संशोधनात सहभागी शास्त्रज्ञा...

हरवलेली मानवता

नु कत्याच जगात घडलेल्या दोन घटनांनी सर्वांना विचलित केले असून मानवाच्या मानवतेवर यामुळे प्रश्नचिन्ह उभा टाकले आहे. पहिली घटना ही अमेरिकेतील आहे. एका कृष्णवर्णीयाची एका गो-या पोलीस अधिका-याकडुन गळा दाबुन हत्या केली गेली. ईथे काळ्या-गो-याच्या भेदाने मानवतेला तिलांजली दिली. दूसरी घटना ही भारताच्या दक्षिणेकडील राज्य केरळमध्ये गर्भवती हत्तीनीची फटाक्यांनी भरलेले अननस खावू घालुन झालेली हत्या आहे. एका घटनेत मानवाने मानवाची हत्या केली तर दुस-या घटनेत मानवाने मुक्याप्राण्याची.या दोन्ही घटनांनी मात्र मानवतेला काळीमा फासला आहे. अमेरिकेत वर्णभेदातुन झालेल्या या हत्येमुळे सगळीकडे संतापाची लाट उसळली. मानवतेला वाचवण्यासाठी लोक काळ्या-गो-यातील भेद विसरून रस्त्यावर उतरले. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांना बंकरमध्ये लपवावे लागले. मात्र स्फोटकांनी भरलेली अननस खाल्ल्याने झालेल्या स्फोटामुळे हत्तीनीला झालेल्या वेदना कुणाच्या लक्षात येतील? भारतात सोशलमीडिया आणि प्राणी अधिकारवादी यांच्यात हा चर्चेचा मुद्दा बनला आहे. एकीकडे आपण जागतीक पर्यावरण दिवसाच्या निमीत्ताने पर्यावरण वाचवण्याचा दिखावा करत होत...

जीवनशैली बदलण्याची गरज

    उ र्जेचा काटकसरीने उपयोग करण्यासाठी आयोजित अनेक आतंरराष्ट्रीय परिसंवाद फक्त औपचारिकता म्हणून आयोजित केले जातात. जगातील कोणताही असा देश नाही जो आपल्या वाट्याचा विकास थांबवु ईच्छित नाही. कोणीही कार्बन उत्सर्जनावर अंकुश लावू ईच्छित नाही. आजही जगातील सर्वात मोठा उर्जेचा स्त्रोत औष्णिक उर्जा हाच आहे. कमीत-कमी पूढील दोन-तीन दशक तरी आपण कोळशाला पर्याय शोधु शकणार नाही. यामुळेच आपण आतापर्यंत पॅरीस अथवा क्योटा मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करू शकलो नाहीत.                       आज जगात एकुण उर्जेच्या ४२ टक्के उर्जा कोळशापासुन मिळवली जाते. खरंतर जगात मागील काही वर्षात कोळशाच्या वापरात कमी आली आहे. जागतीक आकडेवारीनुसार २०१० मध्ये कोळशावर झालेला खर्च १३४ अरब डॉलर होता तर २०१८ मध्ये ८० अरब डॉलरचा खर्च झाला. भारतात मात्र हे चित्र बदलले नाही. भारतात २०१० मध्ये कोळशावर झालेला खर्च ६ अरब डॉलर तर २०१८ मध्ये तो वाढुन ८ अरब डॉलर झाला. चीनने मात्र याबबतीत खूप तत्परता दाखवली आहे. तिथे २०१० मध्ये कोळशावर ५० अरब डॉलर...

सामुहिक आत्महत्येच्या दिशेने

मागिल काही काळात लोकप्रिय झालेल्या चित्रपट मालिका अवेंजर्सचा खलनायक थैनोस विश्वाला वाचवण्यासाठी पृथ्वीवरिल अर्ध्या मानव जातीला नष्ट करतो.थैनोस असे मानतो की,मानवाने पर्यावरण आणि संसाधनांचा नाश करून संपुर्ण विश्वाला धोका निर्माण केला आहे त्यामुळे मानव जातीला समुळ नष्ट केले पाहिजे.या चित्रपटाचे नायक थैनोस विरुद्ध महायुद्ध लढतात आणि शेवटी यशस्वी होतात.मात्र वास्तवात जे होत आहे ते याच्या एकदम उलट आहे.कोण्या थैनोसला आपल्याला नष्ट करण्यासाठी कष्ट करण्याची गरजच नाही कारण या पृथ्वीवर राहणा‌-या आपण मानवांनी अगोदरच सामुहिक आत्महत्येच्या दिशेने पाऊल टाकलेले आहे.एवढच नाही तर आपण चार अरब वयस्क,तीन अरब बालक आणि युवकांना सुद्धा मृत्युच्या दाढेकडे ओढत नेत आहोत जे या पापात कधीच भागिदार नव्हते. पर्यावरणाच्या अभ्यासातुन येणा-या जवळपास सर्व संशोधनांतुन असे दिसते की,धोक्याची घंटा सगळीकडुन वाजत आहे आणि आता सर्वांना याचा अंदाज आला आहे की,मानवाच्या स्वार्थ आणि अत्याचारामुळे पृथ्वीची सहनशक्ती आता संपली आहे.जीवनावश्यक हवा आणि पाणी विषारी होत आहे.भुगर्भातील खनिज संपत्तीचे साठे संपत चालले आहेत.जागतीक तापमानात ...

विकासाकडे की विनाशाकडे ?

वि कास  म्हणजे नेमके काय अपेक्षित आहे यावर फक्त भारतच नाही तर संपूर्ण जगात चर्चा होत आहे , एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अविकसित आणि विकसित देशांमध्ये राजकिय सत्ता विकासाची नव-नविन स्वप्न जनतेला दाखवत आहेत. विकसनशिल देशांमध्ये ज्या विकासाबद्दल बोलल जात आहे , तो अधिक प्रमाणात आर्थिक बाबींशी जुडलेला आहे. रस्ते , विज , पाणी , शाळा , पक्की घरे , ईस्पीतळ बनवणे , पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गती वाढवणे म्हणजेच विकास होय. समाजाच्या अगदी खालच्या स्तरातील नागरिकांचे जीवनमान उंचावून त्यांना वरच्या स्तरापर्यंत पोहचविणे हा विकासाचा मुळ उद्देश आहे. मात्र प्रश्न हा आहे की , केवळ भौतिक संसाधन मोठया प्रमाणावर उपलब्ध करून देणे हा खरा विकास आहे ? अशा प्रकारच्या भौतीक विकासाला कोणत्याही राज्य अथवा देशाची योग्य दिशेने होणारी वाटचाल म्हणता येईल ?                   सगळ्या नद्या शेवटी समुद्राला जावून मिळतात , हा निसर्गाचा नियम आहे.मानवी जीवनाला गती देण्यासाठी बनवलेला विकास नावाचा रस्ता जर त्याला शेवटी विनाशाकडे घेवून जाणार असेल तर ह...

स्वछतेसाठी एक पाऊल पुढे

काही दिवसांपूर्वी स्वछता सर्वेक्षणाचे निकाल जाहिर करण्यात आले आणि या सर्वेक्षणानूसार अनेक शहरांना स्वछ घोषित करण्यात आले.या मागिल भावनेचा निश्चितपणे सन्मान केला पाहिजे.मात्र या योजनेत एक प्रकारची अनाकलनियता दिसून येते तिला अधोरेखित करणे गरजेचे आहे.इंदौरला तिस-यांदा स्वछतेत पहिले स्थान मिळाले आहे,हा नक्कीच योग्य निर्णय आहे कारण तेथील नागरिक स्वछतेच्या बाबतीत खरेच जागरूक आहेत.मात्र ज्या शहरात डंपिंग ग्राउंडचा कुठेच पत्ता नाही आणि त्या शहरांच्या प्रत्येक गल्लीचा कोना कच-याने भरलेला आहे अशा काही शहरांना स्वछ घोषित करण्यात आले आहे यामुळे या एकूण निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभा राहतात. खरं तर स्वछता हा सामाजिक विषय आहे.ही सरकारपेक्षा नागरिकांची जबाबदारी जास्त आहे.जिथला समाज जागरूक आहे तिथे आपोआप स्वछता राखली जाते.देशातील कित्येक गावात बघा तिथे शहरांसारखी अस्वछता पसरलेली नाही.तिथे स्वछता हा प्रतिष्ठेचा विषय समजला जातो.अशा प्रकारची गावे आज सुद्धा कोणत्याही प्रकारच्या सर्वेक्षणावर आधारलेली नाहीत.सरकारी आर्थिक मदती विना आणि प्रकल्पाविना कुठे जर स्वछता कायम होत असेल तर ते ठिकाण आपल्यासाठी आ...