मुख्य सामग्रीवर वगळा

हरवलेली मानवता

नुकत्याच जगात घडलेल्या दोन घटनांनी सर्वांना विचलित केले असून मानवाच्या मानवतेवर यामुळे प्रश्नचिन्ह उभा टाकले आहे. पहिली घटना ही अमेरिकेतील आहे. एका कृष्णवर्णीयाची एका गो-या पोलीस अधिका-याकडुन गळा दाबुन हत्या केली गेली. ईथे काळ्या-गो-याच्या भेदाने मानवतेला तिलांजली दिली. दूसरी घटना ही भारताच्या दक्षिणेकडील राज्य केरळमध्ये गर्भवती हत्तीनीची फटाक्यांनी भरलेले अननस खावू घालुन झालेली हत्या आहे. एका घटनेत मानवाने मानवाची हत्या केली तर दुस-या घटनेत मानवाने मुक्याप्राण्याची.या दोन्ही घटनांनी मात्र मानवतेला काळीमा फासला आहे.
अमेरिकेत वर्णभेदातुन झालेल्या या हत्येमुळे सगळीकडे संतापाची लाट उसळली. मानवतेला वाचवण्यासाठी लोक काळ्या-गो-यातील भेद विसरून रस्त्यावर उतरले. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांना बंकरमध्ये लपवावे लागले. मात्र स्फोटकांनी भरलेली अननस खाल्ल्याने झालेल्या स्फोटामुळे हत्तीनीला झालेल्या वेदना कुणाच्या लक्षात येतील? भारतात सोशलमीडिया आणि प्राणी अधिकारवादी यांच्यात हा चर्चेचा मुद्दा बनला आहे. एकीकडे आपण जागतीक पर्यावरण दिवसाच्या निमीत्ताने पर्यावरण वाचवण्याचा दिखावा करत होतो तर दूसरीकडे या दिवसाच्या आठवडया अगोदर एका जंगली गर्भवती हत्तीनीची निर्घुन हत्या होते. केंद्र सरकारने केरळ सरकारला या घटनेचा संपूर्ण अहवाल मागितला आहे. या घटनेचा तपास करण्यासाठी एक तपास समिती नेमण्यात आली आहे. प्राणीप्रेमी मनेका गांधी यांनी या घटनेचा तिव्र निषेध करत राहुल गांधींवर हल्ला केला आहे. स्मृती ईरानी सोबत गोरखपुरचे खासदार अभिनेता रवि किशन यांनीही या घटनेवर वक्तव्य करून केरळ सरकारला घेरले आहे. याचाच अर्थ हे स्पष्ट आहे की,हत्तीनीचा मृत्यू आता राजकारणाचे केंद्र बनले आहे.
              आपल्या देशात राजकारणी कशातही संधी शोधण्याचा प्रयत्न करतात.ही वेळ राजकारणाची नाही तर हा मुक्या प्राण्यांच्या हितरक्षणाचा प्रश्न आहे. हा मुद्दा गंभीर आहे कारण हत्तीनी गर्भवती होती. केरळमधिल मलप्पुरम येथे काही निर्दयी लोकांनी गर्भवती हत्तीनीला फटाक्यांनी भरलेला अननस खायला दिला. अननसचे आवरण असलेल्या पदार्थात स्थानिकांनी पेटते रॉकेट,बॉम्ब ठेवले होते. भुकेल्या हत्तीनीला हे समजण्यास उशीर झाला. अननस खाल्ल्यानंतर हत्तीनीच्या तोंडात फटाके फुटले. असाहय वेदनासह ती तेथून पळाली आणि एका नदीतजावून उभा राहिली. अखेर आठवडयाभराच्या संघर्षानंतर हत्तीनीच्या गर्भाशयात वाढणा-या मुलासह तिचा तडफडुन मृत्यू झाला. हत्तीनीच्या शवविच्छेदन अहवालानुसार मृत्यूच्या १४ दिवस आधीपासून हत्तीनीने काहीही खाल्ले नव्हते. अननस खाल्ल्यामुळे झालेल्या स्फोटात तिला मोठा त्रास सहन करावा लागत होता. अन्नाच्या शोधात ती गावापाशी आली. मनुष्याच्या स्वार्थी वृत्तीचा तिला अनुभव येईल असे वाटले नव्हते. तिनं लोकांवर विश्वास ठेवला आणि तिचा घात झाला. ती पूढच्या १८ ते २० महिन्यात बाळाला जन्म देणार होती. कोचीतील कोल्लम जिल्ह्यात अशीच घटना महिन्यापूर्वी घडली होती.
         शेवटी हे युद्ध प्राण्यांशी आहे की निसर्गाशी.मनुष्याला निसर्गावर नियंत्रण हवे आहे. निसर्ग आपले दोन्ही हात खोलून दयायला तयार आहे मात्र माणसाची हाव काही कमी होत नाही. यामुळेच अनेक नैसर्गिक आपत्तींचा आपण सामना करत आहोत. कधी पूर तर कधी दुष्काळ,वादळ,भूकंप,भूस्खलन आणि कोरोनासारख्या महामारीचा आपण सामना करत आहोत.जरा विचार करा मानवाकडून निष्पाप हत्तीनीला क्रुर वेदना देवूनही तिने कुणाला हानी पोहचविली नाही. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी ती नदीत उभी राहिली. निष्पाप हत्तीनीचा त्याग आपण चूकता करू शकणार आहोत का? हे कृत्य अक्षम्य आणि अमानवीय आहे. सभ्य समाजात अशाप्रकारच्या गैरकृत्याला स्थान मिळता कामा नये. वन्यजीव नेहमी आपल्या विकास आणि सभ्यतेचे वाहक राहिले आहेत. आपल्या पर्यावरण संरक्षणात त्यांचे अतुलनिय योगदान आहे. या अमानवीय घटनेची माहिती देणा-यांना एक लाख रूपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. मात्र आपण मानवाची विचारधारा बदलु शकतो का?
एका अहवालानुसार भारतात हत्तींची गणना २०१७ मध्ये झाली होती. भारतात हत्तींची संख्या २७,३१२ नोंदविली गेली. सर्वाधिक संख्या कर्नाटकात नोंदविली गेली. तिथे ती ६,०४९ होती. यानंतर आसाम मध्ये ५,७१९ आणि केरळ मध्ये ३,०५४ हत्ती आढळले होते. झारखण्ड मध्ये हत्ती राजकिय प्राणी आहे. नजिकच्या काळात ईथे सुद्धा त्यांची संख्या कमी झाली आहे. ईथे मागील गणनेत जिथे हत्तींची संख्या ६८८ होती ती घटुन ५५५ झाली आहे. हत्तींच्या संरक्षणासाठी २०१७ मध्ये जागतीक हत्ती दिवसाच्या मुहुर्तावर देशव्यापी अभियान हत्ती यात्रेची सुरूवात तत्कालिन केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी केली होती.
                 भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार कोणत्याही वन्य प्राण्याविरूद्ध कोणत्याही प्रकारची हिंसा दंडनीय गुन्हा आहे. ज्यात केरळ सारख्या कृत्याचा समावेश आहे. मुक्या जनावरांना कैद करणे,विष देणे,जाळ्यात फसविणे,हत्या करणे,त्यांचे शारीरीक अवयव चोरणे वा शिकार हा गुन्हा आहे. २००३ मध्ये या कायदयात संशोधन करून त्यास अधिक कठोर बनवले गेले. मात्र यानंतरही मुक्या वन्य प्राण्यांविरूद्ध हिंसा काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. केरळची घटना सभ्य मानवी समाजाला काळीमा फासणारी आहे. हे अहिंसा परमो धर्म: मूलमंत्रच्या विरोधात आहे. आपल्याला मानव आणि प्राण्यांमध्ये फरक करून चालणार नाही. केंद्र आणि राज्य सरकारला वन्यजीवांच्या रक्षणासाठी आणखीन कठोर पावले उचलावे लागतील. समाजातील लोकांनासुद्धा वन्यप्राण्यांबद्दलचा आपला दृष्टीकोन बदलावा लागेल. जंगल आणि वन्यप्राणी पर्यावरण संरक्षणासाठी किती महत्वाचे आहेत हे अभियान चालवून लोकांना समजावायला हव. प्राणीप्रेमी आणि अधिकारवादयांसोबत अशा सामाजिक संस्थांची यासाठी मदत घेता येईल. केरळच्या घटनेतील दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा मिळाली पाहिजे. घटनेतील दोषींना कोणत्याही किंमतीवर सोडता कामा नये.
-सुरेश मंत्री

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...