मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लोकलेखक अण्णाभाऊ साठे

तु काराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील वाटेगाव या लहान गावात झाला. अण्णांनी आपले उभे आयुष्य मुंबईच्या चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली. अण्णाभाऊंची निरीक्षण शक्ती अत्यंत सूक्ष्म होती. नाट्यमयता हाही त्यांच्या लेखनशैलीचा आगळा-वेगळा गुण. ज्या उपेक्षितांच्या जीवनातून अण्णाभाऊंनी अनुभूती घेतली , त्यातील क्षणाचा वेग आणि आवेग त्यांच्या लेखनात जाणवत राहतो. लेखनातील लवचिक भावचित्रे अंगासरशा मोडीने साकार करण्याची त्यांची लकबही स्वतंत्र आहे. लेखन शैलीवर त्यांनी सर्वस्व अर्पण केलं होतं. शाळेची पायरीदेखील न चढलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्यातील लोकवाङमय , कथा , नाट्य , लोकनाट्य , कादंबऱ्या , चित्रपट , पोवाडे , लावण्या , वग , गवळण , प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. त्यांनी ३७ कादंबऱ्या , १९ कथासंग्रह , १४ लोकनाट्ये , ११ पोवाडे , ३ नाटके , शेकडो गाणी , लावण्या , छकडी अशी विपुल साहित्यसंपदा निर्माण केली आहे ; ही खरोखरी अचंबित करणारी गोष...

जिंकलस पोरी

  भा रताची  महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिक मध्ये ४९ किलो वजनी गटात वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदकाची कमाई केली. मीराबाईने स्नॅच आणि क्लीन अँड जर्कमध्ये एकूण २०२ किलो वजन उचलून आपले ऑलिम्पिक पदक पक्के केले. मीराबाईने अनेकवेळा देशाचे नाव उंचावले आहे. त्यामुळे या वेळी ती भारताला पदक मिळवून देईल , अशी जोरदार अपेक्षा व्यक्त केली जात होती आणि ती खरी ठरली. मीराबाईचा जन्म इंफाळपासून २२ किमी दूर असणाऱ्या नोंगपोक काकचिंग गावात गरीब परिवारात झाला होता. तिच्या कुटुंबात सहा भावंड होती. लहानपणापासूनच तिला तिरंदाजी मध्ये करिअर करायचं होतं , पण आठव्या इयत्तेत असताना तिने वेटलिफ्टिंगमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला. इम्फाळची वेटलिफ्टर कुंजराणीला पाहून आपणही वेटलिफ्टर व्हावं , अशी इच्छा मीराबाईला झाली. मीराबाईच्या जिद्दीपुढे आई-वडिलांनाही माघार घ्यावी लागली. २००६ मध्ये तिने सराव सुरू केला तेंव्हा लोखंडाचा बार नसल्यानं ती बांबूच्या बारनं सराव करत असे. जेवणात चिकन आणि अंडी लागायची. पण सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मीराबाईला तेही शक्य नव्हतं. पण यामुळे मीराबाई थांबली नाही. मीराबाईला वेट...

भारताला टोकियो ऑलिम्पिककडून आशा

 टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार असून ८ ऑगस्टला या स्पर्धेचा समारोप होणार आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. ही स्पर्धा अगोदर मर्यादित प्रेक्षकांच्या उपस्थितीत घेण्याचे आयोजकांनी ठरवले होते, मात्र आता ही स्पर्धा प्रेक्षकांविना होणार आहे. खेळाडूंना एकीकडे प्रेक्षकांविना चांगले प्रदर्शन करण्यासाठी स्वत:ला प्रेरित करावे लागेल तर दूसरीकडे कोरोनापासून स्वत:ला वाचवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील. नव्या नियमांनूसार अंतिम फेरीत पोहचल्यानंतर कोरोना संक्रमित झाल्यास पदक गमावण्याचा धोका आहे. यामुळे याचाही अतिरिक्त दबाव खेळाडूंवर असेल. ऑलिम्पिक स्पर्धा सर्वप्रथम १८९६ मध्ये ग्रीसच्या अथेंसमध्ये पार पडली होती. त्यानंतर भारताने १९०० साली पहिल्यांदा ऑलम्पिक स्पर्धेत भाग घेतला होता. भारताची ऑलिम्पिक मधील आत्तापर्यंतची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. भारताने आत्तापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण ९ सुवर्ण, ७ रजत आणि १२ कांस्य पदकं पटकावली आहेत. या ९ सुवर्ण पदकांमधील हॉकीमधले ८ सुवर्ण पदक काढले तर केवळ एक सुवर्ण पदक इतर खेळातील आहे, ज्याला निश...

कोरोना मारतोय अन महागाई जगु देत नाही

गेल्या ४ मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सतत वाढ होत आहे. दिल्लीत पेट्रोल १००.५६ रुपये प्रती लीटर तर डिझेल ८९.६२ रुपये प्रती लीटर मिळतंय तर मुंबईकरांना पेट्रोलसाठी १०६.५९ रुपये प्रती लीटर आणि डिझेलसाठी ९७.१८ रुपये प्रती लीटर मोजावे लागत आहेत. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्यूटी, डीलर कमिशन आणि इतर सर्व दर जोडल्याने इंधनाची किंमत जवळजवळ दुप्पट होते. देशाला ८९  टक्के कच्चे तेल आयात केले जाते. म्हणूनच जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात किंमतीमध्ये चढ-उतार होतो तेंव्हा भारतातील तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होते. तेलाच्या किंमती वाढण्यामागे प्रामुख्याने दोन कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती आणि केंद्र व राज्ये यांच्याकडून उच्च कर दरात वाढ. पेट्रोल आणि डिझेलवरील कराचे दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे असतात. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलींडर अशा जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. अच्छे दिनचे गाजर दाखविल्याची टीका होत आहे. एकीकडे कोरोनामुळे आर्थिक मंदीच्या झळा सोसा...

अभिनयाचा जादूगार : दिलीप कुमार

  दि लीप कुमार म्हणजे भारतीय फिल्म इंडस्ट्रीतील एक अजरामर नाव. केवळ चित्रपटात काम करुन प्रेक्षकांच्या मनोरंजनापलिकडेही दिलीप यांनी त्या भूमिकांतून स्वत:ला देशातील एक मानाचा व्यक्ती बनवलं.   दिलीप कुमार यांचे मूळ नाव मुहम्मद युसुफ खान होते पण ते जगभर दिलीप कुमार नावानेच ओळखले गेले. त्यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानातील लाहोर या ठिकाणी झाला होता. ते १२ भावंडांपैकी एक अपत्य होते. वडील फळविक्रेते आणि सावकार होते , त्यामुळं घरात सधनता होती. पेशावर आणि नाशिकच्या देवळालीमध्ये त्यांच्या मालकीच्या फळबागा होत्या. देवळालीच्याच बार्नेस स्कूलमध्ये दिलीप कुमारांचे प्राथमिक शिक्षण झाले. अभिनेते राजकपूर हे दिलीप कुमारांचे बालमित्र. पुढे दोघांनीही हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली. ते हिंदी चित्रपटसृष्टीत ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जात. सहा दशकं त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं आहे. या काळात त्यांनी ६३   चित्रपटात काम केलं. आपल्या कामामुळे अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी नवे आयाम प्रस्थापित केले. ज्वारभाटा (१९४४) हा त्यांचा पहिला आणि किला (१९९८) हा शेवटचा चित्रपट होय. १९७६...

सावधान ! आपली बेफिकीरी म्हणजे तिस-या लाटेला आमंत्रण

ज गासाठी २०२० हे वर्ष कोरोना विषाणू संसर्गाचं संकट घेऊन अवतरलं. महाराष्ट्रात २०२० च्या मार्चमध्ये कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. टाळेबंदी हा आजाराला प्रतिबंध करण्यासाठी अवलंबण्याचा एक पर्याय असतो या गोष्टीचा अनुभव प्रथमच सर्वांनी घेतला. काही दिवसांच्या किंवा महिन्यांच्या टाळेबंदीने कोरोना संकटातून आपण बाहेर येऊ अशी अपेक्षा असतानाच त्या वेळी विस्कळीत झालेले जनजीवन आज तब्बल दीड वर्षांनंतरही पूर्ववत होण्याचे लक्षण दिसत नाही. विषाणू संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतून तावून-सुलाखून बाहेर पडल्यानंतर आता महाराष्ट्रासह देशासमोर कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचे संकट आ वासून उभे आहे. तिसरी लाट नेमकी कधी येणार, येणार तेव्हा तिची तीव्रता पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी असेल की अधिक, तिसऱ्या लाटेचा संसर्ग झाल्यास रुग्णांना लक्षणे नेमकी काय असतील, मृत्यूचे प्रमाण कमी असेल किंवा अधिक आणि महत्वाचे म्हणजे सध्या आपण घेत असलेली कोरोना प्रतिबंधक लस तिसऱ्या लाटेतील संसर्गाचा प्रभाव रोखणार की नाही, असे अनेक प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहेत. महाराष्ट्रातही आता डेल्टा प्लसचे रुग्...