मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

युती,आघाडयांचा वेग वाढला

पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरून गेलेला असला तरी राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय हालचालींचा आणि राजकीय समिकरणे जुळवण्याचा वेग मात्र यत्किंचितही कमी केलेला नाही.या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सभा आणि विविध प्रकल्प उद्घाटन सभारंभाचा धडाका कायम आहे.देशात भाजपासोबत विविध राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणूकीची तयारी युद्ध स्तरावर सुरू केली आहे. दोन्ही बाजूने महायुती करण्यासाठी स्पर्धा लागली आहे.एक-एक पक्ष आणि एक-एक राज्याच्या नफ्या-तोटयाचा विचार केल्यानंतर पक्ष आपसात चर्चा करत आहेत.            भाजपाने आपल्या नाराज असलेल्या जुन्या सहकारी पक्षांचे मन वळवण्यासाठी कसरत सूरू केली आहे ज्यात केवळ लोकसभा निवडणूकीत चांगले प्रदर्शनच नाही तर निवडणूकीनंतरच्या डावपेचाही विचार केला आहे.भाजपा आपल्या एनडीएला सर्वात मोठी निवडणूक पूर्व महाआघाडी दाखवण्याच्या प्रयत्नात आहे.दूसरीकडे काँग्रेसही महाआघाडीच्या आधारे निवडणूक रिंगणात उतरणार आहे. नुकतच भाजपाने महाराष्ट्रात शिवसेनेसोबत युती केल्याची घो...

काँग्रेसचे विधान लज्जास्पद

काँग्रेस पक्षाच्या नुकत्याच झालेल्या अल्पसंख्यांक अधिवेशनात महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी म्हटले की,जर २०१९ मध्ये काँग्रेस सत्तेत आली तर तीन तलाक कायदा रद्द केला जाईल.त्यांचे हे विधान ऐकूण खूप वाईट वाटले की,त्या स्वत: एक महिला असून सुद्धा त्यांनी इस्लामच्या नावावर महिलांच्या अधिकारांच हनन करणा-या मुल्लांसारख विधान का बरं केल असेल?विशेष म्हणजे या अधिवेशनात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी स्वत: हजर होते.राजकारण आपल्या जागी आहे मात्र केवळ मतांसाठी एका धर्माच्या महिलांच वर्षानुवर्षे होत असलेल शोषण रोखणारा कायदाच रद्द करण्याची गोष्ट करणे न्याय संगत कस होईल?निश्चितच मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणाच्या टोकावर पोहचून मुस्लिम पुरुषांना स्वत:कडे वळविण्यासाठी काँग्रेसने परत एकदा राजकारणाच्या पटावर खूप खालच्या थरातील डाव खेळला आहे. पाकिस्तान सारख्या कट्टर मुस्लिम देशात तीन तलाकवर कित्येक वर्षांपूर्वीच बंदी घालण्यात आली आहे.हे आपले दुर्भाग्य आहे की,भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात एक राष्ट्रीय पक्ष या गोष्टीवर मत मागत आहे की,तो मुस्लिम महिलांच्या या शोषणाच्या पद्धतीवर लागलेली...

विवाह संस्थेवरिल वाढता विश्वास

असं म्हणतात की , या पृथ्वीवर ८४ लाख योनी आहेत आणि या योनी पार केल्यानंतर मनुष्य जन्म मिळतो.मनुष्य हा सर्व सजिवात श्रेष्ठ आहे हे सर्वांनाच माहित आहे.मनुष्य आपली निष्ठा , कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडण्याच्या प्रवृतीमुळेच सर्वश्रेष्ठ आहे.वैवाहिक जीवन स्विकारणे हे याच जबाबदा-यांपैकी एक आहे.याच जबाबदारीत दोन अनोळखी जीव सोबत राहणे , सुख-दु:खात वाटेकरी होण्यासोबत मरेपर्यंत एकमेकांची सोबत न सोडण्याची शपथ घेतात सोबत अपत्यांना जन्म देवून आपला वंश पूढे वाढवितात.विवाहाची ही परंपरा जवळपास सर्व जगात वेगवेगळ्या रुपाने कार्यरत आहे.मध्यंतरीच्या काळात युवक पिढीचा विवाह संस्थेवरिल विश्वास उडत चालला होता आणि त्यांचा लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याकडे कल वाढत चालला होता   मात्र नजिकच्या काही उदाहरणांवरून युवकांचा विवाह संस्थेवरिल विश्वास वाढल्याचे दिसून येत आहे.   युवक आपले अर्धे आयुष्य लग्न न करता घालवतात ही आता ही सामान्य गोष्ट झाली आहे मात्र दिपीका पदुकोण आणि रणविर सिंह , अनुष्का-विराट कोहली , सोनम-आनंद आहुजा यासारख्या अनेक सेलीब्रेटीजनी स्वत:ला मागिल काही दिवसात लग्नाच्या ...