पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरून गेलेला असला तरी राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय हालचालींचा आणि राजकीय समिकरणे जुळवण्याचा वेग मात्र यत्किंचितही कमी केलेला नाही.या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सभा आणि विविध प्रकल्प उद्घाटन सभारंभाचा धडाका कायम आहे.देशात भाजपासोबत विविध राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणूकीची तयारी युद्ध स्तरावर सुरू केली आहे. दोन्ही बाजूने महायुती करण्यासाठी स्पर्धा लागली आहे.एक-एक पक्ष आणि एक-एक राज्याच्या नफ्या-तोटयाचा विचार केल्यानंतर पक्ष आपसात चर्चा करत आहेत.
भाजपाने आपल्या नाराज असलेल्या जुन्या सहकारी पक्षांचे मन वळवण्यासाठी कसरत सूरू केली आहे ज्यात केवळ लोकसभा निवडणूकीत चांगले प्रदर्शनच नाही तर निवडणूकीनंतरच्या डावपेचाही विचार केला आहे.भाजपा आपल्या एनडीएला सर्वात मोठी निवडणूक पूर्व महाआघाडी दाखवण्याच्या प्रयत्नात आहे.दूसरीकडे काँग्रेसही महाआघाडीच्या आधारे निवडणूक रिंगणात उतरणार आहे.
नुकतच भाजपाने महाराष्ट्रात शिवसेनेसोबत युती केल्याची घोषणा केली आहे.भाजपा आणि शिवसेना लोकसभा आणि विधानसभा निवडणूक सोबत लढतील असे निश्चित झाले आहे.महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी भाजपा २५ आणि शिवसेना २३ जागांवर लढेल.विधानसभा निवडणूकीत मात्र युतीच्या मित्र पक्षांच्या जागा सोडून शिल्लक जागांवर दोन्ही पक्ष समान जागांवर लढतील.तमिळनाडु मध्ये भाजपाने जयललितांच्या अण्णा द्रमुक पक्षाला आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले आहे.तमिळनाडु आणि पदुच्चेरी या दोन्ही ठिकाणी अण्णा द्रमुक आणि भाजपा एकत्र लोकसभा निवडणूक लढणार आहेत.विशेष म्हणजे अण्णा द्रमुक आणि भाजपाच्या या युतीत पीएमकेही सहभागी झाल्याने भाजपाचा उत्साह वाढला आहे.भाजप या राज्यात फक्त पाच जागा लढवणार आहे आणि बाकी जागांवर अण्णा द्रमुक लढणार आहे.त्यामुळे भाजपाला तमिळनाडु मध्ये जरी युती करण्यात यश मिळाले असले तरी केवळ या राज्यात फक्त आपले अस्तीत्व टिकवण्यात यश मिळवले आहे असे म्हणता येईल.शिवसेने सारखा भाजपाचा पंजाब मध्ये अकाली दल हा कायम मित्र पक्ष राहिला आहे.बिहार मध्ये जनता दल युनायटेड आनि रामबिलास पासवानची लोकतांत्रिक पार्टी भाजपाची साथ देणार आहे. उत्तरप्रदेश मध्ये मात्र त्यांची अपना दल सोबत चर्चा फिसकटली आहे.आसाम मध्ये आसाम गण परिषदेने भाजपाची साथ मागेच सोडली आहे मात्र त्यांच मन वळवण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे.
आंध्रप्रदेशातील लोकसभेच्या २० जागांपैकी भाजपाकडे सध्या फक्त २ जागा आहेत.चंद्राबाबुंच्या तेलगू देसम पक्षासोबत त्यांची युती होवू शकत नाही मात्र जगन मोहन रेड्डींचा वाईएसआर काँग्रेस मोठी ताकद बनत आहे.सद्य स्थितीत या पक्षाकडे लोकसभेच्या फक्त ३ जागा आहेत मात्र त्यांची वाढती लोकप्रियता बघून भाजपा जगन रेड्डींसोबत हात मिळवण्यासाठी ईच्छूक असेल.जगन रेड्डींना सुद्धा भाजपा हाच एकमात्र पर्याय आहे कारण ते न काँग्रेस सोबत जावू शकतात न टीडीपी सोबत.दूसरीकडे तेलंगाना मध्ये लोकसभेच्या १५ जागांपैकी भाजपा जवळ केवळ एक जागा आहे आणि जगन मोहन रेड्डींकडे सुद्धा एकच.इथे भाजपाजवळ चंद्रशेखर रावच्या टीआरएस आणि जगन मोहन यांच्या सोबत जाण्याच्या पर्याय आहे.याशिवाय उत्तर पूर्व राज्यात भाजपा युती किंवा आघाडी करण्याच्या प्रयत्नात आहे.
दूसरीकडे भाजपाचा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने बिहार मध्ये आरजेडी,कुशवाहा,मांझी सारख्यांना सोबत घेतले आहे.झारखंड मध्ये ती झारखंड मुक्ती मोर्चा सोबत आहे.तामिळनाडु मध्ये एआईडीएमके,पीएमके आणि भाजपाचा सामना करण्यासाठी काँग्रेस डीएमकेची साथ घेणार आहे ज्यात आणखीन काही पक्ष सहभागी होवू शकतात.महाराष्ट्रात काँग्रेस एनसीपीच्या सोबत तर कर्नाटक मध्ये जेडीएसला सोबत घेवून लढेल.केरळ मध्ये काँग्रेस आपला जुना सहकारी पक्ष मुस्लिम लीग सोबत आहे मात्र दिल्ली आणि पश्चिम बंगाल मध्ये युती होईल की नाही हे अद्याप निश्चित नाही.आणखीन एक युती आहे जिच्यामुळे भाजपाची सर्वात जास्त हानी होवू शकते ती म्हणजे उत्तर प्रदेश मधिल सपा आणि बसपाची युती.
हे निश्चित आहे की,भारतात कोणताच पक्ष स्वबळावर लोकसभा निवडणूक लढू शकत नाही.एकंदर भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी निवडणूकीच्या अनुषंगाने राजकीय समिकरणे जुळवण्याच्या कामात वेग घेतला असल्याने या महिन्याच्या शेवट पर्यंत किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणूकीच्या आखाड्यातील चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.भले ही या आघाडया वेगवेगळ्या विचारधारांचा संगम दिसत असतील मात्र हा आहे केवळ संधीसाधुपणा.ही समिकरणे जुळवताना देशावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासारखा प्रश्न हे पक्ष किती संवेदनशिलतेने व गांभिर्याने हाताळतात यावर त्यांचे निवडणूकीतील भवितव्य ठरणार आहे.
-सुरेश मंत्री

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा