उ त्तर कोरियाने अमेरिकेला बघून घेण्याची धमकी देताच सूट्टीवर असलेले अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेच आपल्या खास शैलीत यावर प्रतिक्रीया दिली.ते म्हणाले की , उत्तर कोरियाने धमक्या देणे बंद करावे अन्यथा जगाने आत्तापर्यंत पाहिला नसेल एवढा बाँबहल्ला अमेरिका उत्तर कोरियावर करेल.त्यांच्या या विधानानंतर त्यांचे मंत्री टिलरसन यांनी लगेच सारवासारव केली.खरं पाहिल तर ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग यांनी जगाला गोंधळात टाकले आहे.अमेरीका आणि उत्तर कोरिया यांच्यात सतत वाकयुद्ध सूरू आहे.हे दोन्ही देश कधी युद्ध , कधी अणु बाँम्ब तर कधी आण्वीक क्षेपणास्त्र हल्ला करण्याची भाषा बोलत आहेत , जणू स्वयंपाकघरात भाजी काटली जात आहे.पण खरा प्रश्न हा आहे की , या दोन देशात खरच युद्ध होईल का ? जर अस झालच तर उत्तर कोरिया अमेरीकेसमोर कितपत टिकाव धरेल ? चीन , रशिया या सारख्या महाशक्तींची या युद्धात काय भूमीका असेल ? या सगळ्या बाबींवर प्रकाशझोत टाकणारा हा लेख. संयुक्त कोरिया १९१० ते १९४५ पर्यंत जपानच्या अधिन होता.दुस-या जागतिक महायुद्धात जपान हारू लागल्यानंतर रशियाने जपानच्या विरोधात कोर...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.