मुख्य सामग्रीवर वगळा

उत्तर कोरिया संकट आणि जागतिक राजकारण



त्तर कोरियाने अमेरिकेला बघून घेण्याची धमकी देताच सूट्टीवर असलेले अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेच आपल्या खास शैलीत यावर प्रतिक्रीया दिली.ते म्हणाले की,उत्तर कोरियाने धमक्या देणे बंद करावे अन्यथा जगाने आत्तापर्यंत पाहिला नसेल एवढा बाँबहल्ला अमेरिका उत्तर कोरियावर करेल.त्यांच्या या विधानानंतर त्यांचे मंत्री टिलरसन यांनी लगेच सारवासारव केली.खरं पाहिल तर ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग यांनी जगाला गोंधळात टाकले आहे.अमेरीका आणि उत्तर कोरिया यांच्यात सतत वाकयुद्ध सूरू आहे.हे दोन्ही देश कधी युद्ध,कधी अणु बाँम्ब तर कधी आण्वीक क्षेपणास्त्र हल्ला करण्याची भाषा बोलत आहेत,जणू स्वयंपाकघरात भाजी काटली जात आहे.पण खरा प्रश्न हा आहे की,या दोन देशात खरच युद्ध होईल का?जर अस झालच तर उत्तर कोरिया अमेरीकेसमोर कितपत टिकाव धरेल?चीन,रशिया या सारख्या महाशक्तींची या युद्धात काय भूमीका असेल?या सगळ्या बाबींवर प्रकाशझोत टाकणारा हा लेख.
संयुक्त कोरिया १९१० ते १९४५ पर्यंत जपानच्या अधिन होता.दुस-या जागतिक महायुद्धात जपान हारू लागल्यानंतर रशियाने जपानच्या विरोधात कोरियात युद्ध छेडले होते.दुस-या महायुद्धाच्या समाप्तीच्या वेळी रशिया आणि अमेरीका दरम्यान एक तह झाला.या तहानूसार कोरियाचे उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन भागात विभाजन करण्यात आले.या दोन्ही देशांवर रशिया आणि अमेरीका यांनी संयुक्तपणे सत्ता गाजवली.यानंतर बराच काळ कोरियामध्ये युद्धाची आग भडकत होती.
उत्तर कोरियाची ताकद

सध्या उत्तर कोरियाकडून सैनिकी हालचाली वाढल्या आहेत तसेच तेथील हुकुमशहा किम जोंग याच्याकडून अमेरीकेला सतत धमकी देणारी विधाने केली जात आहेत.त्याच्या या विधानामुळे संपूर्ण जग चिंतीत झाले आहे.उत्तर कोरिया अमेरिकेएवढा शक्तीशाली नाही हे संपूर्ण जगाला माहीत आहे.मात्र त्याच्याकडे संहारक क्षेपणास्त्रे,आण्विक अस्त्रे असल्याने दक्षिण कोरिया आणि जपान सर्वात जास्त चिंतीत झाले आहे.उत्तर कोरियाची क्षेपणास्त्रे अमेरीकेवर हल्ला करू शकत नाहीत.त्याच्याकडे एवढया लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे नाहीत,मात्र त्याचे मित्र देश सहज या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात येतात.उत्तर कोरियाने गुआम बेटावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे.या बेटावर अमेरीकेचा महत्वपूर्ण सैनिकी तळ आहे.त्याची ही धमकी आणि उत्तर कोरियाची असलेली भिती यामुळे डोनाल्ड ट्रम्प आपले मानसिक संतुलन हरवून बसले आणि त्यांनी भडकून उत्तर कोरियावर बाँम्बचा वर्षाव करण्याची धमकी दिली.खर तर ट्रम्प याला सामान्य राजकिय भाषेत प्रती उत्तर देवू शकले असते.
अमेरिकेनेही कबुल केले आहे की,उत्तर कोरियाने आंतरखंडीय बॅलेस्टीक क्षेपणास्त्र आईसीबीएमचे यशस्वी परिक्षण केले आहे.हे परिक्षण उत्तर कोरियासाठी खूप मोठे यश मानले जात आहे.असं मानल जात आहे की,हे क्षेपणास्त्र अमेरीकेच्या अलास्का आणि हवाई बेटांपर्यंत पोहचू शकते.उत्तर कोरियाच्या सरकारी टिव्हीने दावा केला आहे की,हे क्षेपणास्त्र वजनदार आणि विशाल अशा आण्विक अस्त्राला वाहून नेवू शकते.उत्तर कोरियाच्या या दाव्याचे समर्थन अनेक तज्ञांनी अदयाप पर्यंत तरी केलेले नाही.जर असे कोणतेही सामर्थ्य सध्या उत्तर कोरियाकडे नसेल तरी तो याला निश्चितच पूढील काही काळात प्राप्त करेल यात काही शंका नाही.
उत्तर कोरियाने यापूर्वीच पाच वेळा अणू बाँम्बचे परिक्षण केले आहे.२०१६ मध्ये दोन वेळा उत्तर कोरियाने आण्विक चाचणी केली होती.अशात उत्तर कोरियाने दावा केला आहे की,सर्वात शेवटी ज्या अणू बाँम्बची चाचणी झाली त्याला रॉकेटला जोडता येवू शकते.याचा अर्थ स्पष्ट आहे की, सनकी हुकुमशहाची सत्ता असलेला हा देश अणु अस्त्रांनी संपन्न आहे आणि जी काही कमी आहे ती येत्या काही काळात पूर्ण होवू शकते.
उत्तर कोरियाच्या सैन्याबद्दल बोलायचे झाल्यास त्याच्याकडे ७ लाखांपेक्षा जास्त सैनिक आणि ४५ लाख राखिव दल आहे.एवढच नाही तर ईथला सनकी हुकूमशहा आपल्या एक तृतीआंश पेक्षा जास्त नागरिकांना कधीही सैन्यात दाखल होण्याचा आदेश देवू शकतो.ईथे शालेय जीवनापासूनच मुलांना सैन्य प्रशिक्षण दिले जाते.याशिवाय उत्तर कोरियाकडे ७० पाणबुडया,,२०० रणगाडे आणि एक हजाराच्या आसपास लढावू विमाने आहेत.खरं पाहिल तर फक्त अडिच कोटी लोकसंख्या असलेला उत्तर कोरिया युद्ध मानसिकता असलेला देश आहे.येथील नागरिकांना युद्ध परिस्थितीत राहण्याची सवय होवून बसलेली आहे.यामुळे या देशाच्या सैन्य क्षमतेवर कसलीही शंका करता येणार नाही.येथील हुकूमशा किम जोंग त्याच्या खूप घमंडी आणि हेकेखोर स्वभावासाठी प्रसिद्ध असल्याने तो देशाला युद्धात ढकलू शकतो.
जागतीक महासत्तांची भूमीका
सामान्य जनतेला असं वाटत असेल की,जर उत्तर कोरिया एवढा वाईट देश आहे तर जगातील सर्व महाशक्ती असणारे देश एकत्र येवून त्याचा बंदोबस्त का करत नाहीत?जागतीक राजकारणाचे डावपेच खूप किचकट असल्याने हे घडत आहे.एखादया युद्धात जागतीक राजकारणाची भूमिका अत्यंत महत्वाची असते.अशा परिस्थितीत आपापल्या हितसंबंधामुळे जागतीक महासत्ता एकमेकांच्या विरोधात उभा टाकतात हा ईतिहास आहे.आत्ताचेच ताजे उदाहरण या बाबतीत घेता यईल.सीरियावर नियंत्रण मिळवण्यावरून अमेरिका आणि रशिया एकमेकांविरोधात उभा टाकले आहेत.याचाच परिणाम म्हणून अनेक लोकांना सीरिया मधून पलायन करावे लागले आहे आणि तिथे मानव अधिकारांचे हनन चालूच आहे.अफगाणिस्तान युद्धातही या दोन देशांनी अनेक दशकांपर्यंत सहभाग घेतला.अफगाणिस्तानचे यात काय भले झाले हे संपूर्ण जगाला माहित आहे.
उत्तर कोरिया अमेरिकेला सतत धमकावतो आहे,याचाच अर्थ त्याला संकट काळी मदत करण्याचे आश्वासन नक्कीच कुणीतरी दिले असेल.उत्तर कोरियाचा पाठीराखा देश आहे चीन.या दोन देशात १९६१ मध्ये एक करार झाला होता.या करारानूसार जर चीन आणि उत्तर कोरिया यापैकी कोणत्याही एका देशावर ईतर देशाने हल्ला केला तर हे दोन्ही देश एकमेकांची तात्काळ मदत करतील.म्हणजेच जर अमेरिका उत्तर कोरियाच्या विरोधात सैनिकी कार्यवाहीचा पर्याय अवलंबेल तेंव्हा चीनला उत्तर कोरियाची साथ दयावी लागेल.चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सच्या अनूसार यावेळी अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यामध्ये असलेल्या तणावाच्या वातावरणात चीन कोणालाही समजावण्यासाठी समर्थ नाही.मात्र जर अमेरीकेच्या कोणत्याही कार्यवाहीमुळे चीनचे हित धोक्यात असेल तर चीन याचे जोरदार प्रतीउत्तर देईल.
ग्लोबल टाईम्सने पूढे म्हटले आहे की,जर अमेरीकेच्या विरोधात उत्तर कोरियाने हल्ला केला तर चीनने तटस्थ राहिले पाहिजे.मात्र जर अमेरीका आणि दक्षिण कोरिया सत्ता परिवर्तनाच्या हेतूने जर उत्तर कोरियावर हल्ला करत असतील तर चीनला गप्प बसून चालणार नाही.आता ही बाब स्पष्ट आहे की,जर असा हल्ला उत्तर कोरियावर झालाच तर तेथे सत्ता परिवर्तन होईलच अन्यथा काय होईल?याचा अर्थ स्पष्ट आहे की,भलेही अमेरीका उत्तर कोरियाच्या आण्विक कार्यक्रमांच्या विरोधात चीन काही ठोस आणि कडक पाऊल उचलत नसल्याबद्दल चीनवर टिका करत असेल मात्र चीन उत्तर कोरियामध्ये सत्ता परिवर्तन होवू देवू ईच्छीत नाही.चीनने सुद्धा आपला सैन्य हस्तक्षेपाचा पर्याय राखून ठेवला आहे.तो आवश्य उत्तर कोरियाची मदत करेल.जेंव्हा अमेरिका आणि चीनसारख्या आर्थिक आणि सैनिकी महाशक्ती एकमेकांसमोर उभा टाकतील तेंव्हा गंभीर परिस्थिती निर्माण होईल.रशिया आणि अमेरिका यांच्यातील संबंध चांगले नसल्याने तो सुद्धा अमेरिकेच्या विरोधात जाईल.अशा स्थितीत जगातील देश पुन्हा दोन गटात विभागले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.ही स्थिती तिसरे महायुद्ध होण्याला कारणीभूत होवू शकते,जे पहिल्या दोन महायुद्धांपेक्षा अधिक विनाशकारी असेल.
भारताच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास भारताची या संभाव्य युद्धात महत्वपूर्ण भूमिका असू शकते.जवळपास सात दशकांपूर्वी झालेल्या कोरियन युद्धात भारताने महत्वाची भूमीका बजावली होती.त्यावेळी चीन आणि अमेरीकेच्या दरम्यान मध्यस्थाची भूमीका भारताने बजावली होती,त्यामुळेच हे मोठे देश युद्धबंदीसाठी तयार झाले होते.सध्यातरी भारत या मुद्दयावर आता शांत आहे,मात्र आता जागतीक राजकारणात भारत अशा स्थितीत पोंहचला आहे जिथे तो गप्प बसूच शकत नाही.
-    सुरेश मंत्री


 

     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...