मुख्य सामग्रीवर वगळा

काँग्रेसला स्वत:ला सावरण्याची गरज


काँग्रेससाठी ही सुखद गोष्ट आहे की,तिला गुजरात मध्ये हारता-हारता राज्यसभेची एक जागा मिळाली.खरं-तर ही जागा काँग्रेसने अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत जिंकलेली असल्याने पक्षात उत्साह निर्माण होणे स्वाभाविक आहे.मात्र हा उत्साह रसातळाला गेलेल्या काँग्रेसला वर उठण्यासाठीचा मार्ग बनू शकेल का?मागील तीन वर्षात काँग्रेसची पंजाब वगळता सर्व आघाडीवर पिछेहाट झाली आहे.येत्या काळात गुजरात आणि हिमाचल प्रदेश मधिल विधानसभा निवडणूका होणार आहेत.या राज्यात काँगेसला यश मिळवता येईल का?काँगेसचा भावी चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिल जात ते राहुल गांधी अध्यक्षपदाची धुरा स्विकारून काँग्रेससाठी अच्छे दिन आणतील का?
          काँग्रेसमध्ये स्वत:चा मतदार संघही नसलेल्या मात्र नेहरू आणि गांधी परिवाराशी केवळ जवळीकता असलेल्या नेत्यांच्या मर्जीनूसार काँग्रेसचे काम चालायचे.मोतीलाल व्होरा,अरूण सिंह,माखनलाल फोतेदार असे न जाणो कितीतरी.काँग्रेस मध्ये स्वत:चे स्वतंत्र अस्तीत्व असणा-नेत्यांची आजही कमी आहे.गुजरात मध्ये अहमद पटेल यांनी राज्यसभा निवडणूक जिंकल्यानंतर पक्षातीलच काही नेत्यांनी त्यांच्यावर टिका केली होती.सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अहमद पटेल हे कांग्रेस मधिल स्वत:चे स्वतंत्र अस्तीत्व असणारे एकमात्र असे नेते आहेत.कोणताही राजकिय वारसा नसलेल्या पटेलांनी गुजरातच्या राजकारणावर पकड ठेवली आहे.
          १९६० पर्यंत भारतीय राजकारण फक्त एका पक्ष प्रणालीवर आधारित होते.तो पक्ष काँग्रेस होता.आता फरक एवढाच आहे की काँग्रेसची भूमिका भाजप बजावित आहे.अशात जर जनतेचा भाजप केंद्रीत राजकारणापासून मोहभंग झाला तर याला दूसरा पर्याय जनतेसमोर असेल का?खरं तर देशात भाजपविरोधी पक्षांची काही कमतरता नाही मात्र एकटी काँग्रेस सोडून ईतर राजकिय पक्षांचे राजकारण एक-दोन राज्यांपूरतेच मर्यादीत आहे.त्यांच्याकडे कोणताही राजकिय दृष्टीकोनही नाही ज्याच्या आधारे ते भाजपासमोर कडवे आव्हान उभे करतील.अशात जर काँग्रेस स्वत:ला एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून जनतेसमोर आपली प्रतिमा ऊभा करत नाही तर हा भारतीय लोकशाहीसाठी वाईट संकेत मानला पाहिजे.
काँग्रेस संघटन सध्या संक्रमाणातून जात आहे.मागील अनेक काळापासून प्रसार माध्यमे राहुल गांधी लवकरच काँग्रेस पक्षाची कमान सांभाळतील असे सांगून सांगून थकले आहेत.सोनिया गांधी यांनी सक्रीय राजकारणापासून दूर होण्याचे संकेत अनेक वेळा देवून सुद्धा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यासाठी टाळाटाळ का करित आहेत याचे उत्तर तेच देवू शकतात.याची कदाचित दोन कारणे असू शकतात.एक तर त्यांचा आपल्या क्षमतेवरच विश्वास नसेल.दूसरे कारण म्हणजे कदाचित ते काँग्रेस आणि कांग्रेस बाहेरील काही नेत्यांच्या सक्रीय राजकारणातून बाहेर पडण्याची वाट बघत आहेत.शरद पवार,लालू प्रसाद यादव,मुलायम सिंह यादव,एम.करूणानिधी,विरभद्र सिंह,तरूण गोगाई,दिग्विजय सिंह,अमरिंदर सिंह अशा सत्तरी पार केलेल्या आणि अनुभवी असलेल्या नेत्यांसोबत राजकिय संवाद साधने अतीसुरक्षित वातावरणात वाढलेल्या ४७ वर्षिय राहुल गांधींच्या निश्चितच आवाक्यातली बाब नाही.त्यांचे पिता राजीव गांधी यांनी सुद्धा त्यांच्यापेक्षाही कमी वयात पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली होती मात्र त्यांचे व्यक्तीमत्व हे खूप वेगळे होते.
राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळण्याच्या बाबतीत अनिच्छेचे काही तीसरे कारणही असू शकते मात्र निवडणूक आयोगाने पक्षाची अंतर्गत निवडणूक ३१ डिसेंबरच्या आत पार पाडण्यासाठी सांगितले आहे.यामुळे राहुल गांधी यांना एक तर या तीन महिन्यात अध्यक्षपद स्विकारावे लागेल अथवा राजकारणातून पिछेहाट होण्यासाठी तयार रहावे लागेल.२०१४ च्या लोकसभा निवडणूकांपासून काँग्रेसची पिछेहाट सूरू आहे.लोकसभेत काँग्रेसला विरोधी पक्ष म्हणून ही मान्यता मिळाली नाही.काँग्रेसला गेल्यातीन वर्षात चांगली बातमी फक्त पंजाब मधून मिळाली आहे.बिहारमध्ये असलेली सत्ता नुकतीच काँग्रेसला गमवावी लागली तर गोव्यात चांगला जनादेश मिळूनही काँग्रेस सत्तेत येवू शकली नाही.यापूढे गुजरात आणि हिमाचल प्रदेश मधिल विधानसभा निवडणूका होणार आहेत.या दोन्ही राज्यात काँग्रेसची अवस्था अगोदरच चांगली नाही.
काँग्रेसने गेल्या तीन वर्षात एक गोष्ट चांगली केली ती म्हणजे जिथे-जिथे विधानसभा निवडणूका झाल्या तिथे-तिथे पक्षाकडून संभ्रमात टाकणारी अवस्था ठेवली नाही.पंजाब मधिल निवडणूका अमरिंदर सिंहच्या,उत्तराखंडच्या निवडणूका हरीश रावतच्या तर आसामच्या निवडणूका तरूण गोगाई यांच्या नेतृत्वाखाली लढण्यात आल्या.याचा वाईट परिणाम एवढाच झाला की,काही जण पक्ष सोडून गेले.मात्र एक बाब काँग्रेससाठी चांगली झाली म्हणजे दूधाचे दूध आणि पाण्याचे पाणी झाले.सगळ्यांना घेवून चालणा-या काँग्रेसमध्ये शंकर सिंह वाघेला आणि हरिश रावत सारख्या दोन नावात स्वार होवून चालणा-या काँग्रेसी नेत्यांची फौज खडी झाली होती.आता याचे प्रमाण कमी होत चालले आहे.राहुल गांधी यांचा पक्षावरील प्रभाव सत्तेच्या राजकारणासाठी वाईट तर वैचारिक लढाईसाठी चांगला आहे.
एक पक्ष सत्तेच्या बाबतीत विचार केला तर १९६० च्या दशकापर्यंतची काँग्रेस आणि आत्ताची भाजपा यांच्यातील फरक हा विचारधारेतील आहे.काँग्रेसची भूमीका सर्वसमावेशक तर आत्ताच्या भाजपाची भूमीका समाजातील काही घटकांना कमी माननारी,त्यांच्या बद्दल सांशकता ठेवणारी आणि त्यांच्या विरोधात तणाव निर्माण करणारी राहिली आहे.यामुळे लोकांचे लक्ष्य सरकारच्या गडबडींपासून हटत असते.मात्र अशा परिस्थितीत आपल्या मोठया अपयशाला सांभाळणे सरकारला सोपे असणार नाही.अशात विरोधी पक्षासाठी देशातील जनतेसमोर भाजपाला पर्याय म्हणून स्वत:ला उभा करण्याचे आव्हान लोकसभा निवडणूकीच्या अगोदर येवू शकते.काँग्रेसला अशा शक्यतेचे नेतृत्व करून जनतेसमोर भाजपाला पर्याय म्हणून जर उभा टाकायचे असेल तर त्याला लवकरात लवकर युवकांना पक्षात संधी देवून समाजातून होणा-या स्वंयफूर्त विरोधाशी जवळीकता साधून सुसंवाद साधला पाहिजे.काँग्रेसची ताकद त्याच्या संघटनापेक्षा त्याच्या विचारधारेत जास्त आहे.काँग्रेसचे विचार जर परत लोकांना पटले तर बाजू पलटायला वेळ लागणार नाही.
-सुरेश मंत्री

    


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...