मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बालमजूरीतील वाढ चिंताजनक

  बा लपण आयुष्यातील सर्वात सुंदर काळ. बालपण ही माणसाला मिळालेली ईश्वराची सर्वात अमूल्य देणगी आहे असे म्हणतात. कोणत्याही गोष्टीची न काही जबाबदारी न काही चिंता. फक्त खेळण-बागडण, दंगा मस्ती करणं आणि अभ्यास. मात्र अशा प्रकारचे बालपण प्रत्येकाच्याच वाट्याला येत असं नाही. एखाद्या हॉटेल मध्ये, घरामध्ये, दुकानात किंवा विटभट्टीवर एखादा बालक ज्याच्या हातात पुस्तके असण्याऐवजी  झाडू, फडके किंवा अवजारे असलेली दिसतात. जर कोणी १४ वर्षे वयाखालील बालक उपजिविकेसाठी काम करित असेल तर त्याला बालमजूर असे म्हणतात.  आज जगात २१.५ कोटी बालमजूर आहेत. गेल्या दोन दशकांत जगभरात १६ कोटी बालमजूर वाढले आहेत. यात  सुमारे ३९.४ टक्के (६.३ कोटी) मुली आणि ६०.६ टक्के (९.७ कोटी) मुले असून कोरोनामुळे त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (आयएलओ) आणि युनिसेफच्या  ‘चाइल्ड लेबर: ग्लोबल एस्टीमेट्स २०२०, ट्रेंड्स आणि रोड फॉरवर्ड’ या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की २० वर्षांत प्रथमच बालमजूरी कमी करण्यात अपयश आले आहे. गेल्या चार वर्षांत  बालमजूरांमध्ये ८४ लाखांची ...

लोकनेते राजर्षी शाहू महाराज

  रा जर्षी  शाहू महाराज या नावाची अख्ख्या महाराष्ट्राला ओळख आहे. त्यामुळे त्यांची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही , पण खंत ही आहे की आजची तरुण पिढी त्यांना केवळ नावाने ओळखते. त्यांची कार्ये , त्यांनी मांडलेले विचार यांची त्यांना म्हणावी तितकी माहिती नाही. वाळीत टाकल्याप्रमाणे जगणाऱ्या दलित समाजाच्या त्या काळी खंबीरपणे पाठीशी उभ्या राहणाऱ्या या लोकनायकाची , जाती पातीच्या अंधाऱ्या जगात पुन्हा अडकत जाणाऱ्या महाराष्ट्र देशाला आज पुन्हा नव्याने ओळख करून देण्याची गरज आहे.   छत्रपती शिवाजी महाराज सोडले तर अनेक राजांचा इतिहास अन्याय-अत्याचार व जुलमी राजवटीचा आहे. एकाधिकारशाहीचा , हुकूमशाहीचा आहे ; परंतु छत्रपती राजर्षी शाहू महाराज मात्र याला अपवाद आहेत. हा राजा लोकशाहीचा , सामाजिक समतेचा पुरस्कार करणारा आहे , हे "एकवेळ गादी सोडीन ; पण बहुजन समाजाचा उद्धार करण्याचे कार्य सोडणार नाही’’ या त्यांच्या वक्तव्यावरून लक्षात येते.   राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जुन १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. कागलचे जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे हे त्यांचे जन्मदाते वडील , र...

कोरोनाच्या तिस-या लाटेबद्दलच्या सांशकता

                                                      को रोनाच्या दोन लाटा परतवून लावल्यानंतर आता देशभरात तिस-या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. येत्या ६ ते ८ आठवड्यात या साथीची तिसरी लाट येईल व तिला थांबवणे अशक्य असल्याचे विधान एम्सचे प्रमुख डॉ. रणदिप गुलेरिया यांनी केले आहे. पहिल्या लाटेत वृद्ध तर दूस-या लाटेत तरूणांना अधिक झळ पोहचली होती.या तिस-या लाटेचा सर्वाधिक धोका तरुण व लहान मुलांना बसणार असल्याचे म्हटले जात आहे. याबाबतीत प्रसार माध्यमांमधुन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. 'माझी मुले- माझी जबाबदारी' ही नविन संकल्पना याअनुशंगानेच अस्तित्वात आली आहे. या लाटेचा कसा आणि किती प्रमाणात लहान मुलांना फटका बसेल याचा अभ्यास केला जात आहे. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी खरंच घातक सिद्ध होईल की नाही हे अजुनही सुस्पष्ट झालेले नाही. याबाबत संशोधक आणि विशेषज्ञ दररोज वेगवेगळे दावे करत आहेत.  दुसऱ्या लाटेप्रमाणेच भारतामधील कोरोनाची तिसरी लाट ही अधिक घात...

अलविदा मिल्खा सिंह !

भा रताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांचे शुक्रवार १८ जुन रोजी निधन झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्याच आठवड्यात त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. ते आयसीयूमध्ये असल्याने पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांना उपस्थितीत राहता आले नव्हते. मिल्खा सिंह फ्लाईंग सिख नावाने प्रसिद्ध होते.राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिल्खा सिंह यांनी जिंकून दिले होते. भारताकडून पद्मश्री हा किताब देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.        मिल्खा सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचं २० मे रोजी समोर आलं होतं. ते चंदीगडमध्ये आपल्या घरी आयसोलेट होते. मात्र त्यांना २४ तारखेला मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवडाभर उपचारानंतर त्यांना घरीही सोडण्यात आले होते. घरी परतल्यावर त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली, त्यानंतर त्यांना पीजीआयएमईआर चंदीगडमध्ये दाखल केले गेले. त्यादरम्यान त्यांनी कोरोनावर मात केली होती. १३ जुन रोजी कोव्हिड चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही, कोरोनामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या इतर काही समस्यांमुळं त्...

सलग दुसऱ्या शैक्षणिक वर्षावर कोरोनाचे सावट

  ग तवर्षी कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले. यावर्षीचे शैक्षणिक वर्ष सुरळीतपणे सुरु होईल असे वाटत होते मात्र अद्यापही कोरोनाचा धोका कायम असल्याने यावर्षीचे शैक्षणिक वर्षही वाया जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात १५ जुन पासुन शाळा तर सुरु झाल्या आहेत मात्र शाळेत केवळ शिक्षकांची उपस्थिती आहे. एकीकडे येत्या १५ ते २० दिवसात परिस्थिती पाहून निर्णय घेऊ असे विधान राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे तर दुसरीकडे सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन बहुतांश शाळांनी अॉनलाईन शिक्षणाची तयारी सुरू केली आहे.                गतवर्षी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे विद्यार्थ्यांचे निम्मे शैक्षणिक वर्ष वाया गेले होते. शैक्षणिक वर्षाला सुरूवात होवूनही शाळा बंदच होत्या. शाळा बंद काळात विद्यार्थ्यांना अॉनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे देण्यात आले होते. महाराष्ट्रातील काही भागात या कालावधीत विद्यागम योजना सुरू करण्यात आली होती. विद्यागम सुरु असताना अनेक शिक्षकांचा कोरोनामुळे बळी गेला होता. त्यामु...

कोरोना बळींची संख्या खरी की खोटी ?

दे शात बुधवारी ९ जुनला तब्बल ६ हजार १४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एका दिवसांत आत्तापर्यंत झालेले हे सर्वाधिक मृत्यू होते. तसेच जगात एका दिवसांत सर्वाधिक मृत्यू भारतात झाले. यापूर्वी भारतात सर्वाधिक  मृत्यू १८ मे २०२१ रोजी झाले होते. त्यावेळी ४ हजार ५२९ मृत्यूची नोंद झाली होती. परंतु खरंच हे एका दिवसातील मृत्यू आहेत का ? देशातील अनेक राज्यांत मृतांची आकडेवारी लपवण्यात आली होती. कोरोनाच्या दुस-या लाटेत झालेल्या मृत्यूंच्या संख्येवर नेहमीच प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यात स्मशानात लागलेल्या मृतदेहांच्या रांगा आणि गंगेत सापडलेल्या मृतदेहांमुळे हा संशय अधिकच बळावला होता. आता खुद्द बिहार सरकारने कोरोना मृतांची संख्या लपवल्याची कबुली दिली आहे. यामुळे  आता ही संख्या दुरुस्त केली जात आहे. बिहार राज्यात आत्तापर्यंत ५ हजार ४२४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती होती. पण आरोग्य  विभागाचे प्रधान सचिव प्रत्यय अमृत यांनी राज्यात आत्तापर्यंत ९ हजार ३७५ रूग्णांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. तसेच आकडेवारी देण्यात चूक झाल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे या क्रमवारीत बिहार १६ वरून १२ ...

अनाथ बालकांना मिळणार आधार व दिलासाही

  को रोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या बालकांना आधार देण्यासाठी त्याच्या नावावर एकरकमी पाच लाख रुपयांची मुदत ठेव ठेवण्याचा, तसेच बालक सक्षम होईपर्यंत त्याचा बालसंगोपन योजनेतून खर्च उचलण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाच्यावतीने नुकताच घेण्यात आलाय. या योजनेत १ मार्च २०२० रोजी आणि त्यानंतर कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक (आई व वडील) मृत्युमुखी पडलेले किंवा एका पालकाचा कोविड १९ मुळे आणि अन्य पालकांचा इतर कारणामुळे मृत्यू झाला असल्यास किंवा एका पालकाचा (१ मार्च २०२०) पूर्वीच  मृत्यू झाला असेल आणि त्यानंतर एका पालकाचा कोविडमुळे मृत्यू झाला असल्यास अशी ० ते १८ वयोगटातील बालकांचा या योजनेत समावेश होणार आहे. बालकाचे संगोपन करण्यास कुटुंबातील कुणी इच्छूक नसल्यास, त्याला बालगृहात दाखल करण्यात येईल. मुदत ठेव बालक व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या संयुक्त बँक खात्यावर राहणार आहे. ठेवीची ही रक्कम मुलाच्या वयाची २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर व मुलीच्या बाबतीत १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर व्याजासह मिळणार आहे. कोरोनामुळे आई-वडीलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या बालकांन...