आज २९ अॉगस्ट हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. ह्याच दिवशी भारताचे राष्ट्रपती खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करतात. आज संपूर्ण देश हॉकीच्या इतिहासातील सर्वाधिक उत्कृष्ट खेळाडू मेजर ध्यानचंद यांची आठवण काढत आहे. ब्रिटीशांच्या राजवटीत गुलामांचे जीणे जगणाऱ्या भारताला जगज्जेतेपदाच्या सिंहासनावर बसवणारे मेजर ध्यानचंद यांची कर्तबगारी कोणत्याही अव्वल देशभक्तापेक्षा कमी नव्हती. १९२८, ३२ व ३६ या पाठोपाठच्या ऑलिम्पिकमध्ये हॉकीतील सुवर्ण पदकांची हॅट्ट्रिक भारताने साजरी केली, त्यात मेजर ध्यानचंद यांचा सिंहाचा वाटा होता. त्या तीन ऑलिम्पिकमध्ये भारताच्या १०१ गोलापैकी ३८ गोल तर चक्क ध्यानचंदने लगावलेले. हॉकीतील या जादूगाराविषयी लिहावं-बोलावं तितकं थोडकच. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे २९ ऑगस्ट १९०५ मध्ये ध्यानचंद यांचा जन्म झाला.त्याचं मूळ नाव “ध्यान सिंग” आहे. परंतु ते रात्री उशीरापर्यंत हॉकीचा सराव करायचे म्हणून त्यांच्या मित्रांनी त्यांना रात्रीच्या चंद्राची उपमा देऊन त्यांचं ध्यानचंद हेच नाव...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.