मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फक्त रोहिंग्यांच्याच बाबतीत दूजाभाव का ?

म्याममारमधून विस्थापित झालेले जवळपास चाळीस हजार रोहिंग्या मुसलमान भारताकडे शरण मागत आहेत.भारत सरकारने सर्वोच्च न्यायालयात देशाच्या सुरक्षेला रोहिंग्या मुसलमानांपासून धोका असल्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.सरकारचा हेतू हाच की,सर्वोच्च न्यायालयाने यात दखल देवू नये.यावर न्यायालयात ३ ऑक्टोंबरला सुनावणी होणार आहे.जी लोक आपला जीव वाचवण्यासाठी आपला देश सोडून दूस-या देशात शरण मागण्यासाठी विवश आहेत ते दहशतवादी कसे काय असू शकतात?ज्या लोकांची घरे आणि गावेच्या गावे जाळण्यात आली आहेत ते आपली तान्ही मुल आणि गर्भवती महिलांना सोबत घेवून हजारो किलोमीटर दूर पळण्यासाठी विवश आहेत,खरंच ही लोकं देशाच्या सुरक्षिततेला धोका आहेत का? भारत सरकारचे असे मत आहे की,रोहिंग्यांचा देशाच्या सुरक्षिततेला धोका आहे.काही रोहिंग्यांचा जम्मू,दिल्ली,हैद्राबाद मध्ये दहशतवादी कारवायात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.सरकारचे असेही मत आहे की,भारताची लोकसंख्या अगोदरच अधिक असल्याने यांना शरण देवून देशातील नैसर्गिक साधन संपत्तीतून सूविधा दिल्यास याचा नागरिकांवर वाईट परिणाम होईल तसेच अनेक रोहिंग्यांकडे अगोदरच खोटे पॅनकार्ड आणि ...

देशातील उच्च शिक्षणाची अवस्था वाईट

अस वाटत आहे की , देशातील उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षणाचे वाईट दिवस आले आहे त.उच्च शिक्षणाचा दर्जा ढासळत असल्याची चर्चा मागिल पाच वर्षापासून सूरू आहे मात्र कोणत्याही सरकारने यासाठी काहीच केले नाही.आता देशातील उच्च शिक्षण पूर्णपणे ध्वस्त झाले आहे.काही दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षणाची सर्वात मोठी नियामक संस्था ऑल इंडिया कांउसिल फॉर टेक्निकल एजुकेशन (एआईसीटीई) ने निश्चित केले आहे की , ज्या इंजिनियरिंग महाविदयालयांमध्ये मागिल ५ वर्षात ३० टक्के पेक्षा कमी प्रवेश झाले आहेत अशी महाविदयालये बंद करण्यात येतील. सध्या देशभरात एआईसीटीईशी संलग्न १० , ३६१ इंजिनियरिंग महाविदयालय आहेत ज्यात ३ , ७०१ , ३६६ जागा आहेत.या ३७ लाख जागांपैकी २७ लाख जागा खाली आहेत.निश्चितच ही आकडेवारी खूप भयावह आहे. एआईसीटीईने सुरवातीला ना काही विचार करता , ना गुणवत्तेची चिंता करता देशात हजारो इंजिनियरिंग महाविदयालयांना परवानगी देवून टाकली आणि विना मागणी आणि पूरवठा या तत्वाचा व रोजगाराचा विचार करता एवढया मोठया प्रमाणावर जागा निर्माण केल्या.आता या जागाच भरत नसल्याने एआईसीटीई चिंतीत झाले आहे. व्यावहारिकतेपासून दूर...

शिक्षक बनायचय ? नकोरे बाबा !

नु कताच ५ सप्टेंबरला देशभरात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.   देशात ठिक- ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या दिवशी शिक्षकांचे गुणगौरव गावून शिक्षकी पेशाला महान महान म्हटले गेले. मात्र खरच आपल्या देशात शिक्षण आणि शिक्षकांचा सन्मान आहे का ? आता शिक्षक कोण बनत आहेत ? जर आपण कुण्या शहरात किंवा महानगरात राहत असताल तर आपल्याला हे दिसेल की , आपल्या आसपास राहणारे शेजारी-पाजारी विविध क्षेत्रात नौकरी करित आहेत , पण ते शिक्षक नाहीत. शाळेतील शिक्षक बनायला घेवून जणू सगळ्या समाजात विरक्ती आली आहे. हुशार तरुण शिक्षक बनण्याऐवजी खासगी क्षेत्रात छोट्या-मोठ्या नौक-या करणे पसंद करू लागले आहेत. वर्तमानपत्रात छापल्या जाणा-या विवाह संबंधी जाहिरातींचा अभ्यास करून पहा. यात आपल्याला शिक्षक वरांच्या जाहिराती खूप कमी दिसतील. भावी वधू शिक्षिका तरी मिळेल मात्र भावी वर शिक्षक मिळण्याची शक्यता खूप कमी होते. एनसीईआरटीच्या ताज्या आकडेवारीनूसार , देशातील शिक्षकांपैकी ६९.१ महिला शिक्षिका आहेत. शाळात तेच शिक्षक बनत आहेत ज्यांना इतर क्षेत्रात नौकरी मिळत नाही. मोठ्या सरकारी नौक-यां...

बाबांचे बदलते अवतार

नुकताच एका बाबाने देशात कहर माजविला.बलात्काराच्या आरोपाखाली या बाबाला न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर त्याच्या तथाकथित अंध भक्तांनी दोन राज्यात आणिबाणीसारखी परिस्थिती निर्माण केली होती.या बाबाला न्यायालयाने दोषी ठरवताच या अंध भक्तांनी जो हिंसाचार माजवला त्यात जवळपास ३५ निरपराध लोकांचा जीव गेला.जागोजाग जाळपोळ केली गेली आणि प्रशासन अशी अवस्था निर्माण होणार आहे हे माहित असताना आवश्यक खबरदारी न घेता हा चाललेला प्रकार पाहत राहिले.या बाबाच्या भक्तांची दहशत एवढी की न्यायाधिशांना हेलीकॉप्टरने तुरुंगात शिक्षा सुनावण्यासाठी स्वत: जावे लागले.हा बाबा २० वर्षासाठी आता गजाआड झाला आहे.प्रत्येक जण हा विचार करत होता की , या बाबात एवढ काय आहे की , त्याचे भक्त त्याच्यासाठी आपला जीव देण्यासाठी पूढे आले.हा बाबा आधुनिक बाबा आहे , ईतर बाबांपेक्षा वेगळा.बाबा गुरमित राम रहिमजी इंसा असे त्याचे नाव.याने प्रत्येक धर्माचा काही ना काही आधार घेतला आहे आणि राम , रहिमच्या अगोदर इंसा म्हणजेच माणूस असल्याचा दावा याने केलेला आहे.हा बाबा रॉकस्टार आहे आणि खूप अष्टपैलू व्यक्तीमत्वाचा सुद्धा. हे जाणने जरूरी आहे की , अन...