चै त्र महिन्यापासुन वसंत ऋतुच्या आगमनाला सुरूवात होते. त्यामुळे वातावरणात बदल झालेले असतात. जुनी सुकलेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते , आंब्याला मोहोर येतो. चैत्र महिन्यात हिंदू धर्मातील अनेक पवित्र आणि धार्मिक सण , उपवास इत्यादी पदार्पण करतात. गुढी पाडवा हा एक भारतीय सण असून याच महिन्यात शुद्ध प्रतिप्रदेला महाराष्ट्रासह इतर काही ठिकाणी साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस असल्याने हिंदू नववर्षाची सुरुवातही याच दिवसापासून होते. गु ढी पाडवा दोन शब्दांच्या मिलनातून बनलेला आहे. गुढी या शब्दाचा अर्थ ' विजयाचा ध्वज ' आणि पाडवा म्हणजे ' प्रतिपदा '. या दिवशी घरा-घरात गुढी उभारली जाते. ही प्रतिकात्मक गुढी आनंदाचे , सुखाचे , सकारात्मकतेचे प्रतिक म्हणून पुजली जाते. या पवित्र दिवशी लोक आंब्याच्या पानांचे तोरण बनवून आपल्या घराचे दरवाजे सजवतात आणि असे मानले जाते की त्यांच्या घरात हे तोरण बनवल्याने सुख , समृद्धी आणि आनंद मिळतो. या पवित्र सणाच्या निमित्ताने लोक सकाळी लवकर उठतात , बेसन आणि उटणे लावून स्नान करतात . या दिवसापासून नविन मराठी वर्षाची सूरूवात होत अ...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.