मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सरकारला नीति बदलाची गरज

मागील चार वर्षात भाजपाने गाय आणि राम मंदिर मुद्द्यांच्या आधारे हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला सोबत त्यांनी विकसित देशांप्रमाणे देशाची अर्थव्यवस्था वाढवण्याचा प्रयत्न केला.मेक-इन-इंडिया , बुलेट ट्रेन या संकल्पना याचाच भाग होत्या.विकसित देशांचे अनुकरण करतानाच अगोदर नोटाबंदी आणि त्यानंतर जीएसटी लागू करण्यात आली जेणेकरून विकसित देशांप्रमाणे डिजीटल अर्थव्यवस्था स्थापित होईल मात्र सरकारची ही पाऊलं खास करून तिच्यासाठी हानीकारक ठरली आहेत.नोटाबंदी आणि जीएसटीने लहान उद्योगांना उद्धवस्त केले आहे.या लहान उद्योगांमुळेच मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत होता त्यामुळे रोजगारात कमतरता निर्माण झाली आहे.रोजगारात कमी आल्याने सामान्य माणसाच्या क्रय शक्तीचा –हास झाला आहे त्यामुळे बाजारपेठेत एक प्रकारचे मंदीचे सावट आले आहे.या कारणांमुळेच अर्थव्यवस्थेचा विकास दर पूर्ववत ७ वर टिकून आहे.   गरीबाने जर श्रीमंत माणसाप्रमाणे १०० रुपयांची एक कप चहा पिली तर त्याच महिन्याच बजेट बिघडून जात काहीस असच भारताद्वारे विकसित देशांची नीति लागू केल्याने भारताची अर्थव्यवस्था बिघडली आहे.वर्तमान भाजपा ...