मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2026 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मित्रांच्या गर्दीत हरवलेला मित्र

एकदा एका सहकाऱ्यासोबत सहज गप्पा रंगल्या होत्या. विषय होता – खरा मित्र कोण? मी त्याला विचारले, "तुझा सर्वात विश्वासू मित्र कोण आहे?" तो आत्मविश्वासाने म्हणाला, "अनेक आहेत." मी हसतच म्हणालो, "बरं, त्यापैकी चार जणांची नावे सांग." काही क्षणांत संपेल असे वाटणारे ते उत्तर बराच वेळ येईनाच. अखेर त्याने कसाबसा एकच मित्राचे नाव घेतले. तेही जणू संकोचाने. त्या क्षणी मला जाणवले—मित्रांची संख्या सांगणे सोपे असते; पण मनापासून ज्याच्यावर विश्वास ठेवता येतो, अशी व्यक्ती शोधणे मात्र फार कठीण असते. पुढे त्यानेच मला विचारले, "मग खरा मित्र कोण असतो?" मी शांतपणे उत्तर दिले, "संकटाच्या वेळी सर्वप्रथम ज्याची आठवण येते, तोच खरा मित्र." हे उत्तर ऐकून तो काही क्षण माझ्याकडे पाहत राहिला. कदाचित मी त्याच्या मनातीलच एखाद्या न बोललेल्या सत्याला शब्द दिले होते.                             आज विज्ञानाने जग जवळ आणले आहे. एका क्लिकवर हजारो माणसे जोडली जातात; पण मनांमधील अंतर मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. मोबाईलच्या संपर्क यादीत शेकडो नावे आहेत, समाजमाध्य...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे : समतेचा शिल्पकार

 "जग बदल घालूनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव..."   मराठी माणसाच्या ओठांवर आजही घुमणाऱ्या या ओळी केवळ गीत नाहीत; त्या परिवर्तनाची मशाल आहेत. ही मशाल प्रज्वलित करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यविश्वातील असे तेजस्वी व्यक्तिमत्त्व आहे की, ज्यांनी विद्यापीठाच्या पदव्या मिळवल्या नाहीत; पण जीवनाच्या विद्यापीठात त्यांनी वेदना, संघर्ष, श्रम आणि स्वाभिमानाचे सर्वोच्च शिक्षण घेतले. म्हणूनच त्यांच्या लेखणीतील प्रत्येक शब्दाला वास्तवाचा गंध आहे आणि प्रत्येक साहित्यकृतीला माणुसकीचा स्पर्श आहे.मराठी साहित्याच्या इतिहासात अनेक प्रतिभावंत झाले; पण आयुष्याच्या विद्यापीठात घडलेला, समाजाच्या जखमांवर शब्दांचे फुंकर घालणारा आणि अन्यायाविरुद्ध लेखणीला तलवारीची धार देणारा साहित्यिक म्हणून अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अद्वितीय आहे. १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे तुकाराम भाऊराव साठे यांचा जन्म झाला. समाजव्यवस्थेच्या तळागाळात जन्मलेल्या या लेकराला शिक्षणाची संधी मिळाली नाही. परंतु ज्याला शाळा मिळाली नाही, त्याने जीवना ला च गुरू मानले. भूक त्यांचा पहिला शि...

राजीनामा की व्यवस्थेवरील अविश्वासाचा कौल?

भारतीय लोकशाहीत काही घटना अशा घडतात की त्या केवळ एखाद्या व्यक्तीच्या राजीनाम्यापुरत्या मर्यादित राहत नाहीत; त्या संपूर्ण व्यवस्थेला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडतात. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही अशीच एक घटना ठरली आहे. या घटनेमागे केवळ एका मंत्र्याचा निर्णय नाही, तर लाखो विद्यार्थ्यांचा आक्रोश, पालकांची चिंता आणि शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाल्याची वेदना दडलेली आहे.  शिक्षण हे कोणत्याही राष्ट्राच्या भवितव्याचे अधिष्ठान असते. त्या शिक्षण व्यवस्थेत जर प्रश्नपत्रिका फुटणे, परीक्षांतील कथित अनियमितता आणि पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले, तर त्याचा परिणाम केवळ गुणपत्रिकेवर होत नाही; तो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर होतो. अनेक वर्षांची मेहनत एका चुकीमुळे व्यर्थ गेल्याची भावना निर्माण झाली की संताप अपरिहार्य ठरतो. याच पार्श्वभूमीवर "कॉक्रोच जनता पार्टीच्या " या विद्यार्थीकेंद्रित आंदोलनाने देशभरात व्यापक जनसमर्थन मिळवले.                   सुरुवाती...

' नका करू माणुसकीचा अंत' : माणुसकीच्या दीपस्तंभाची शब्दयात्रा

"माणुसकीचा दिवा तेवत ठेवा, स्वार्थाच्या वाऱ्यांनी तो विझू देऊ नका; जगण्याला अर्थ द्यायचा असेल, तर माणसातला माणूस मरू देऊ नका." आजच्या वेगवान, स्पर्धात्मक आणि स्वार्थाच्या भोवऱ्यात अडकलेल्या समाजात माणुसकी, संवेदना आणि सामाजिक बांधिलकी यांची उणीव प्रकर्षाने जाणवते. अशा काळात समाजाला अंतर्मुख करणारे, आत्मपरीक्षणास प्रवृत्त करणारे आणि माणुसकीचा दीप पुन्हा प्रज्वलित करणारे पुस्तक म्हणजे युवा लेखक बुद्धभूषण कांबळे यांचा 'नका करू माणुसकीचा अंत' हा ललित लेखसंग्रह होय. या पुस्तकातून लेखकाने समाजातील विविध प्रश्नांना केवळ स्पर्श केला नाही, तर त्यावर मनाला भिडणाऱ्या शब्दांत भाष्य केले आहे. पुस्तकाची पहिली आवृत्ती २०२६ मध्ये प्रकाशित झाली असून, त्यात एकूण ६९ वैचारिक लेखांचा समावेश आहे.  मुखपृष्ठावरील अक्राळविक्राळ जबड्यात झुंज देणारा माणूस आजच्या समाजातील अमानुष प्रवृत्तींचे प्रभावी प्रतीक ठरतो, तर ठळक अक्षरांतील 'नका करू माणुसकीचा अंत' हे शीर्षक मानवतेच्या रक्षणासाठी दिलेली आर्त साद वाटते. मलपृष्ठावरील स्तंभलेखक व पञकार सुरेश मंत्री यांची पाठराखण वाचकाला पुस्तकाच्या विच...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

अस्वस्थ करणारे प्रश्न, जागृत करणारे विचार : ‘कुठे आहे लोकशाही?’

मराठी साहित्यात समाजप्रबोधनाची परंपरा संत साहित्यापासून ते फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारधारेपर्यंत अखंडपणे प्रवाहित होत आलेली आहे. या परंपरेचा वारसा जपत तरुण लेखक बुद्धभूषण कांबळे यांनी लिहिलेला “कुठे आहे लोकशाही?” हा ललित लेखसंग्रह समाजातील विविध प्रश्नांवर भाष्य करणारा, विचारांना चालना देणारा आणि वाचकाला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारा महत्त्वपूर्ण ग्रंथ ठरतो. पुस्तकाचा केंद्रबिंदू लोकशाही असला तरी त्यामध्ये केवळ राजकीय लोकशाहीचा विचार नाही; तर सामाजिक, नैतिक आणि मानवी मूल्यांच्या लोकशाहीचाही शोध घेतला आहे.  पुस्तकाचे मुखपृष्ठ  सरदार जाधव यांनी रेखाटले असून ते अत्यंत आकर्षक आणि बोलके आहे. प्रस्तावना किर्तनकार व साहित्यिक माधव डाके यांची असून महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूरचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार यांचा अभिप्राय लाभला आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावर ज्येष्ठ साहित्यिक भरत सातपुते यांची पाठराखण आहे.  या लेख संग्रहात लेखकाने समाजातील विविध समस्या, मानवी नातेसंबंध, शिक्षण, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, पर्यावरण, बेरोजगारी, पालक आणि विद्यार्थ्यांचे नाते, मतदानाचे महत्त्व, स्...