को रोना महामारीने अर्थव्यवस्था तर चौपट केली आहेच सोबत मानवी जीवनावर याचा वाईट प्रभाव पडला आहे. मानवी मुल्यं संकटात आहेत. या क्रूर विषाणूमुळे जगातील शिक्षण व्यवस्थाही जणू कोलमडून गेली आहे. अध्ययन-अध्यापनाच कार्य ठप्प झाल आहे. महाराष्ट्रात जून मध्ये नविन शैक्षणिक सत्राला सूरूवात तर झाली आहे मात्र शिक्षणाची मंदिरे बंदच आहेत. मग यावर पर्याय शोधण्यासाठी शिक्षण तज्ञांमध्ये विचारमंथन सुरू आहे. यावर एकच पर्याय सूचविला जात आहे तो म्हणजे ऑनलाईन शिक्षणाचा. आज विदयापिठ,शाळा,महाविदयालयांमार्फत झूम,गूगल मीट,वेबऐक्स,माईक्रोसॉफ्ट टीम सारख्या प्लॅटफॉर्मचा उपयोग विदयार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी केला जात आहे. मात्र सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, हा उपाय खरंच सर्वसमावेशक आहे का? यावर विचार मंथन करणारा हा लेख. एका अनुमानानुसार भारतात जवळपास २५ कोटी शालेय विदयार्थी आहेत.तर महाविदयालयात आणि उच्च शिक्षण घेणा-या विदयार्थ्यांची संख्या जवळपास ७ ते ८ कोटी आहे. एकूण मिळुन ३२ ते ३३ कोटी विदयार्थी आहेत. ही संख्या अमेरिकेच्या लोकसंख्येच्या बरोबर आहे. कोरोनाने या ३३ कोटी विदयार्थ्यांच्या भविष्यावर खूप वा...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.