बुधवारी लोकसभेत माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ऑनलाईन बेटिंग गेमिंग अॅप्सवर बंदीचे विधेयक मांडले होते ते सरकारने मंजूर केले होते त्यानंतर ते राज्यसभेतही पारित झाले होते. शुक्रवारी राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले आहे. या विधेयकाचे नाव ऑनलाईन गेम प्रचार आणि नियमन विधेयक २०२५ असे आहे. या विधेयकानुसार, ई-स्पोर्ट्स आणि सोशल गेम्सना प्रोत्साहन दिलं जाईल, तर ऑनलाइन मनी गेम्सवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या विधेयकाच्या कलम २ (जी) नुसार, ज्या खेळांमध्ये खेळाडूला पैसे किंवा काही आर्थिक लाभाच्या बदल्यात जिंकण्यासाठी शुल्क, पैसे किंवा स्टेक्स गुंतवावे लागतात, अशा सर्व खेळांवर बंदी घातली जाईल. लोक फॅन्टसी स्पोर्ट्स गेम्स, ऑनलाइन रमी, कार्ड गेम्स, पोकर प्लॅटफॉर्म आणि ऑनलाइन टीम तयार करून थेट पैशांची गुंतवणूक असणारे गेम्स खेळू शकणार नाहीत. आता या कायद्यानुसार, कोणतीही व्यक्ती ऑनलाइन मनी गेम्सशी संबंधित जाहिराती तयार करू शकत नाही किंवा त्यामध्ये मदतही करू शकत नाही. जर कुणी अशा प्रकारचे गेम्स खेळण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करेल तर त्याला या क...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.