मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2024 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्र भूषण : अशोक सराफ

 ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे, तर गंभीर ते खलनायकापर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडवलं आणि रसिकांवर अधिराज्य गाजवलं आहे. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांना महाराष्ट्रभूषण देऊन राज्य सरकारने एका बहुरूपी कलाकाराचा सन्मान केला आहे. मराठी रसिकांची पोचपावती या निमित्ताने त्यांना मिळाली आहे. अशोक सराफ यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी झाला. गिरगावातील चिखलवाडीमध्ये अशोक सराफ यांचे बालपण गेले. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. त्यांना आधीपासूनच अभिनेता व्हायचं होतं, पण त्यांनी नीट शिकावं आणि मग एखादी चांगली नोकरी करावी असं अशोक सराफ यांच्या वडिलांना वाटत होतं. त्यांनी वडिलांचा शब्द पाळत, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी सुरू केली. त्यासोबतच आपला अभिनयाचा छंद जोपासत ते नाटकांत काम करू लागले. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिर...