मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

समानतेच्या दिशेने

    रा ष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीए मध्ये प्रवेशासाठी आता महिला व मुलींना मे-२०२२ मध्ये होणारी प्रवेश परीक्षा देता येणार आहे. केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी ही माहिती देण्यात आली आहे. महिला व मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सहभागी करण्यात यावं, यासाठी दाखल केल्या गेलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करून, वरील माहिती देण्यात आली. सरकारकडून सांगण्यात आले की, योग्य वैद्यकीय आणि शारीरिक फिटनेस स्टॅण्डर्ड्सची मानके निर्धारित करण्याच्या प्रक्रियेत आहेत. याचबरोबर आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. पुरूष व महिला कॅडेट्स यांच्या निवासस्थानाची स्वतंत्र व चांगल्याप्रकारे सोय केली जात आहे. वय आणि प्रशिक्षणाचे स्वरूप लक्षात घेऊन, नियम बनवले जात आहेत. एनडीएमध्ये महिलांची पहिली बॅच २०२३ पासून सुरु होऊ शकते. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही दलांमध्ये देशातले सर्वोच्च अधिकारी या अकदामीतून तयार होतात.  एनडीएमध्ये महिलांना प्रवेश नाकारणं ही लिंगभेद करणारी गोष्ट आहे असं सांगत  या सं...

कोव्हिड योद्धयांची सरकारकडून उपेक्षाच

को रोना विरूद्धच्या लढ्यात डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफसह पहिल्या फळीतील कोरोना योद्धयांचे योगदान महत्वपूर्ण आहे. सेवा बजावत असताना आपले कुटुंबीय, प्रियजनांपासून दूर राहत इतरांच्या कुटुंबातील प्रियजन कोरोनाने हिरावले जावू नयेत म्हणून या सर्वांनी अहोरात्र मेहनत घेतली. कोरोनाची साथ भारतात पसरू लागली, तेंव्हा आपल्याकडिल आरोग्य सुविधा अतिशय तोकड्या होत्या. कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी अगदी पीपीई किट मिळणे अवघड होते. बाकी ऑक्सिजन, व्हेंटिलेटरर्स, औषधे आणि इतर भौतिक सुविधा तर सोडाच. सुरुवातीच्या काळात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून आरोग्य कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचं मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला. मग ते अगदी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी थाळ्या वाजवणं, दिवे लावणं, हेलिकॉप्टरमधून आरोग्य कर्मचाऱ्यांवर फुलांचा वर्षाव करणं इथपर्यंत अनेक गोष्टी केल्या गेल्या. सोबत केंद्र सरकरनं सांगितल की, आरोग्य क्षेत्रातील कर्मचा-याच कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला ५० लाख रूपयांची नुकसान भरपाई दिली जाईल. ही योजना जाहीर करताना भारताच्या अर्थमंत्र...

आत्मविश्वास

 स्व त:विषयी  जाणवणारा दृढ विश्वास म्हणजेच आत्मविश्वास. आत्मविश्वास म्हणजेच जगण्याचं मनोबल. आत्मविश्वास म्हणजेच जगण्यातला आनंद. आत्मविश्वास म्हणजेच जगण्याची ऊर्जा. आत्मविश्वास म्हणजेच जगण्याची उमेद ! आणि आत्मविश्वास म्हणजेच जगण्यातलं यश.. आत्मविश्वास मूलत: स्वभावात असतोच ; तो बोलण्यातून जाणवत असतो आणि कृतीतून दिसत असतो. खरं तर आत्मविश्वास ही स्वत:च्या विचारांची प्रतिक्रिया असते. विचारांमध्येच आत्मविश्वासाचा स्रोत दडलेला असतो. विचारांमधला दृष्टिकोनच मनोबल वाढवत असतो. त्यामुळे स्वत:कडे , वास्तवाकडे , आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन विचारांच्या मांडणीसाठी अधिक महत्वाचा ठरतो. म्हणून प्रत्येक कृतीमागचा विचार आणि दृष्टिकोन महत्वाचा असतो. एकदा एक व्यक्ती म्हणून जगायचं ‘कसं’ आणि ‘का’ ठरलं की , आत्मविश्वास अधिकाधिक वृद्धिंगत होत जातो.   एखाद्या व्यक्तीकडे आत्मविश्वासाचा अभाव असतो म्हणजे नेमकं काय तर त्या व्यक्तीची विचार करण्याची पद्धत बऱ्याचदा नकारात्मक आणि चुकीची असते. कारण अंतर्मनातल्या भीतीचा परिणाम हा विचारांवर होत असतो. प्रत्येक व्यक्तीकडे उपजतच बुद्धिमत्ता , गुणवत्ता आणि क्षम...

बैलपोळा

  "अमावस्या श्रावणाची, आली घेऊन सणाला…कृषीवल आनंदाने, सजवितो हो बैलाला”    श्रावण महिन्यात पावसाचे दिवस असल्याने सृष्टी आधीच हिरवाईचा शालु नेसुन नवीकोरी झालेली असते. संपुर्ण वातावरणात एक गारवा पसरल्याने मानवी मन देखील ताजं तवानं झालेलं असतं. अशा या श्रावण महिन्यात सणांची रेलचेल पहायला मिळते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी यांसारखे  अनेक सण या महिन्यात आपल्या भेटीला येतात. पुर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरांप्रमाणे हे सण आजही गावागावांमधुन साजरे होतांना आपल्याला दिसतात. या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावास्या येते आणि संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे 'बैलपोळा'. कर्नाटकात याला बेंदूर असं म्हणतात तर कर्नाटकाच्या काही भागात याच सणाला करुनुर्नामी म्हणतात. दक्षिण भारतात यास पोंगल आणि उत्तर व पश्चिम भारतात गोधन म्हणतात.निसर्गातील प्रत्येक वृक्ष, वेली, प्राणी, डोंगर, नदीची पूजा करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा भारतात आहे. ही परंपराच माणसाची निसर्गाशी असलेली नाळ कायम जोडून ठेवते. भारत हा एक कृषिप्रधान द...

सिद्धार्थ शुक्लाची अकाली एक्झिट

 अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्ला याचं गुरूवारी हृदयविकाराने निधन झालं. वयाच्या ४० व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने रात्री झोपण्यापूर्वी काही औषधं खाल्ली होती. यानंतर सकाळी तो झोपेतून उठलाच नाही. त्याला सकाळी इस्पितळात नेले असता मृत घोषित करण्यात आले. यावेळी झोपेतच हार्ट अटॅकने त्याचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. सिद्धार्थच्या अशा अचानक जाण्याने बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. चाहत्यांसाठी सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास ठेवणं खूप कठीण आहे. अनेकांनी सिद्धार्थला सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे. सिद्धार्थचा जन्म १२ डिसेंबर १९८० रोजी झाला. टीव्ही जगतातलं एक मोठं नाव म्हणून सिद्धार्थ शुक्लाकडे पाहिलं जायचं. त्याचा मनोरंजन विश्वातील प्रवासही तसा अनपेक्षितच होता. त्याला मॉडेलिंग आणि अभिनयात कधीच रस नव्हता. सिद्धार्थला नेहमीच बिझनेस करायचा होता. मात्र, त्याच्या लुक्समुळे लोक त्याचे खूप कौतुक करायचे. २००४  मध्ये एकदा आईच्या सांगण्यावरून सिद्धार्थने मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला. पोर्टफोलिओ न घेता सिद्धार्थ ति...