मुख्य सामग्रीवर वगळा

आत्मविश्वास


 स्वत:विषयी जाणवणारा दृढ विश्वास म्हणजेच आत्मविश्वास. आत्मविश्वास म्हणजेच जगण्याचं मनोबल. आत्मविश्वास म्हणजेच जगण्यातला आनंद. आत्मविश्वास म्हणजेच जगण्याची ऊर्जा. आत्मविश्वास म्हणजेच जगण्याची उमेद ! आणि आत्मविश्वास म्हणजेच जगण्यातलं यश.. आत्मविश्वास मूलत: स्वभावात असतोच; तो बोलण्यातून जाणवत असतो आणि कृतीतून दिसत असतो. खरं तर आत्मविश्वास ही स्वत:च्या विचारांची प्रतिक्रिया असते. विचारांमध्येच आत्मविश्वासाचा स्रोत दडलेला असतो. विचारांमधला दृष्टिकोनच मनोबल वाढवत असतो. त्यामुळे स्वत:कडे, वास्तवाकडे, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन विचारांच्या मांडणीसाठी अधिक महत्वाचा ठरतो. म्हणून प्रत्येक कृतीमागचा विचार आणि दृष्टिकोन महत्वाचा असतो. एकदा एक व्यक्ती म्हणून जगायचं ‘कसं’ आणि ‘का’ ठरलं की, आत्मविश्वास अधिकाधिक वृद्धिंगत होत जातो. 

एखाद्या व्यक्तीकडे आत्मविश्वासाचा अभाव असतो म्हणजे नेमकं काय तर त्या व्यक्तीची विचार करण्याची पद्धत बऱ्याचदा नकारात्मक आणि चुकीची असते. कारण अंतर्मनातल्या भीतीचा परिणाम हा विचारांवर होत असतो. प्रत्येक व्यक्तीकडे उपजतच बुद्धिमत्ता, गुणवत्ता आणि क्षमता असून केवळ आत्मविश्वास गमावल्याने काही व्यक्ती अपयशाच्या बळी ठरत असतात. उदा. ‘मी करू शकेन का ?’ ही भीती आणि ‘मी करू शकेन’ हा आत्मविश्वास. आत्मविश्वासामध्ये अशक्य ते शक्य करण्याची प्रचंड शक्ती असते. आत्मविश्वासामध्ये स्वप्न साकार करण्याची स्वयंप्रेरणा असते. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी लागणारी जिद्द, चिकाटी, सातत्य आणि प्रयत्नांमधूनच आत्मविश्वास जाणवत असतो. व्यक्तिमत्वाचा विकास करणे अनेकांना अवघड बाब वाटते. परंतु, आपल्या दैनंदिन जीवनात आपण जसे वागतो, विचार करतो तसे आपले व्यक्तिमत्व घडते. समाजातील घटनांचाही आपल्या जीवनावर परिणाम होतो. आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचमुळे आपण कमी पडल्याची भावना मनात निर्माण होते. बऱ्याचदा खूप मेहनत आणि नियोजन करूनही ‘यश मिळालं नाही तर..’, ‘हातून चूक झाली तर..’’, ‘नीट जमलं नाही तर’ या नकारात्मक विचारांमुळे मनात भीती आणि गोंधळ सतत वाढत असतो. त्यातून नैराश्य येते. त्यामुळे आत्मविश्वास मिळविण्यासाठी मूलत: योग्य पद्धतीनं आणि सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करायला हवा.

आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे. जेव्हा तुम्ही एखादी क्रिया करता, त्यातून एक वेगळी उर्जा उत्पन्न होत असते. ही उर्जा तुमच्यातील आत्मविश्वासाची असते. हा आत्मविश्वास सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतात. आपण आपल्या परिस्थितीकडे पाहून रडत असतो. परंतु, आपण इतरांची परिस्थिती पाहिली तर आपण किती सुखात आहोत याचा आपल्याला अंदाज येईल. खरं आहे हे. 

एक  गोष्ट आहे. एकदा एका अपघातात एका व्यक्तीचा एक हात मोडला. त्याला प्रचंड दु:ख झाले. त्याला नैराश्य आले. तो काही काम करण्यास तयार होईना. त्याने घराबाहेर पडणेच बंद केले. यामुळे त्याचे कुटुंबीय रस्त्यावर आले. त्यांचे हाल सुरू झाले. तरीही तो व्यक्ती काही केल्या आपली निराशा सोडत नव्हता. एके दिवशी त्याचे कुटुंबीय त्याला एका मंदिरात घेऊन गेले, तिथे एक मुलगा फुलं विकत होता. त्याला त्याची आई जेवू घालत होती. त्याला पाहून त्या व्यक्तीलाही हुरुप आला. जर बालपणापासून त्या मुलाचे दोन हात नसताना तो फुलं विकून आपले घर चालवू शकतो तर मग मी का नाही हा विचार करुन त्यानेही पुन्हा नव्या उमेदीने व्यापार सुरू केला. 

असेच जेव्हा तुम्हाला आपले दु:ख जास्त असल्याचे जाणवेल त्यावेळी तुम्ही तुमच्यापेक्षा अधिक दु:खी असलेल्या एखाद्या व्यक्तीकडे पहा मग तुम्हाला जाणवेल, की त्यापेक्षा तुम्ही अधिक सुखात आहात. म्हणून आपला आत्मविश्वास गमावू देऊ नका. काही झाले तरी केवळ तुम्ही याच बळावर यश खेचून आणू शकता. तुमचे व्यक्तीमत्व जर सुधारायचे असेल तर आधी तुम्हाला तुमचा आत्मविश्वास प्रबळ केला पाहिजे. आयुष्यात घडणा-या अनेक गोष्टींमुळे आपला आत्मविश्वास कमी होतो. याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनात व कामाच्या ठिकाणीही होत असतो. तुमचा आत्मविश्वास तुम्हाला समाजात एक मानाचे स्थान मिळवून देतो. त्यामुळे तुमच्या मनावर झालेला आघात कितीही मोठा असला तरी खालील उपाय करा व तुमचा आत्मविश्वास परत मिळवा. 

१. स्वत:ची स्तुती करा

दररोज सकाळी आरशासमोर उभे राहून तुमच्यात असलेले सर्व चांगले गुण आठवा. व्यवस्थित परिधान करा आणि अप टू डेट राहण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही कामासाठी सवलत घेऊ नका. पर्फेक्ट माइंडसेटने घराबाहेर पडा. दिवसभरात कोणीही तुमची कश्याबद्दलही स्तुती केली तर आभार माना परंतू गर्व बाळगू नका.

२. काळजी सोडा

चेह-यावर प्रसन्नतेचा भाव व तेजस्वी हास्य असू द्या. आतून द्वंद असेल तरी ते भाव चेहर्‍यावर येता कामा नये. सर्वांना मदत करा. लोकांशी प्रेमाने बोला व वागा. मात्र, चुकत असलेल्यांना पाठीशी घालू नका. अधिक कठोर नाही तरी योग्यरीत्या त्यांना मार्गदर्शन करा.

३. चांगली संगत निवडा

तुमचा आत्मविश्वास आजूबाजूच्या लोकांवरही अवलंबून असतो. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत रहा. जे लोकं तुम्हाला प्रोत्साहित करत असतील व पडत्या काळात तुमची मदत करत असतील असे लोकं योग्य मार्गदर्शन करतात. ती व्यक्ती कुटुंबातील, मित्र किंवा सहकारी असू शकते.

४. स्वत:साठी वेळ काढा

दिवसभराच्या धावपळीत स्वत:ला काय दिले याचा विचार करा. अर्थात स्वत:ला वेळ द्या. थोड्या वेळासाठी एकांतात राहा. स्वत:बद्दल विचार करा. मेडिटेशन करा किंवा स्वत:च्या छंदाला वेळ द्या. मग बघा आपला आत्मविश्वास कसा वाढतो ते.

- सुरेश मंत्री

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...