मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वेदना घुंगरांच्या...

  स ध्या देश कोरोनाच्या तिस-या लाटेचा सामना करीत असुन कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गर्दीच्या ठिकाणी जमू नये,गर्दी टाळा अ शा शासनाच्या सुचना असल्याने अनेक ठिकाणच्या यात्रा रद्द होत आहेत . ज्या गावात तमाशाचे कार्यक्रम होते त्या गावातील यात्रा रद्द झाल्याने व राज्य शासनाने रात्रीची संचारबंदी घोषित केल्याने तमाशाचे कार्यक्रम सुद्धा होऊ शकणार नाहीत . जर ग्रामदैवतांच्या यात्रा, जत्रा सुरू झाल्या नाहीत तर लोकनाट्य तमाशा फडमालक व कलाकार यांच्यावर अधिकच उपासमारीची वेळ येणार आहे. समाजाचे प्रबोधन व मनोरंजन कर णारी तमाशा ही कला महाराष्ट्राची लोक कला म्हणून ओळखली जाते. वर्षातील आठ महिने गावोगावी फिरून ही कला सादर केली जाते. दस - या पासून तमाशाचा वर्षाचा हंगाम सुरू होत असतो. गुढीपाडव्यापर्यंत गावोगावी तंबूत तिकिटे लावून तमाशाचे खेळ हो तात . मार्च, एप्रिल, मे या कालावधीत महाराष्ट्रभर गावोगावी यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. पाडव्यानंतर गावोगावच्या जत्रांमध्ये तमाशा होतो. स्थानिक संयोजकांच्यावतीने गावातील यात्रेकरूंसाठी मनोरंजन व्हावे य...