मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कमला हॅरिस यांची उमेदवारी ट्रंपसाठी डोकेदुखी

  अ मेरिकेत डेमोक्रेटिक पक्षाकडून भारतीय वंशाच्या कमलादेवी हॅरिस यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी देण्यात आली आहे ही एक ऐतिहासिक घटना आहे. जर आपण असं मानून चाललो की,नोव्हेंबर मध्ये होणा-या राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत बाइडन आणि कमला हॅरिस विजयी होतीलच आणि जर डेमोक्रेटिक पक्षाचे हे दोन्ही उमेदवार जिंकले तर अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणात आणि तिच्या विदेशी धोरणात गंभीर परिवर्तन होण्याची शक्यता प्रबळ होईल. डेमोक्रेटिक पक्ष जर ही निवडणूक जिंकला तर कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या कृष्णवर्णिय महिला उपराष्ट्रपती बनतील. अमेरिकेच्या इतिहासात आत्तापर्यंत महिला मंत्री तर बनल्या आहेत मात्र उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणा-या महिला उमेदवार आत्तापर्यंत कधीच जिंकलेल्या नाहीत. हिलरी क्लिंटन अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्रपती जवळपास झाल्याच होत्या. त्यांना डोनाल्ड ट्रंप यांच्यापेक्षा अडीचेक लाख मतं जास्त मिळाली होती. पण इलेक्टोरल मतांमध्ये त्या हरल्या. जगात इतरत्र जे घडतय आणि घडू घातलय याची रंगीत तालीम अमेरिकेत होतेय. अमेरिका हा देश कोणाचा आहे आणि तो कोणी चालवायचा, असं कमला हॅरिस विचारत आहेत. जर कम...

'सर्जा-राजा' च्या सणावर कोरोनाचे सावट

  श्रा वण महिन्यात सणांची रेलचेल पहायला मिळते.अनेक सण या महिन्यात आपल्या भेटीला येतात. पावसाळ्याचे दिवस असल्याने सृष्टी आधीच हिरवाईचा शालु नेसुन नवीकोरी झालेली असते. संपुर्ण वातावरणात एक गारवा पसरल्याने मानवी मन देखील ताजं तवानं झालेलं असतं. अशा या श्रावण महिन्यात आपण नागपंचमी,नारळी पौर्णिमा,रक्षाबंधन,गोकुळाष्टमी यांसारखे सण साजरे करतो आणि या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावास्या येते आणि संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो तो सर्जा-राजाचा सण म्हणजे 'पोळा'. गेल्यावर्षी हा सण महाराष्ट्रातील बहुतांश भागावर दुष्काळाचे सावट असल्याने काहीसा कमी उत्साहात साजरा करण्यात आला होता. यावर्षी आत्तापर्यंत चांगला पाऊस होवूनही कोरोना महामारीमुळे साथ प्रतिबंधक नियंत्रण कायद्याअंतर्गत ३१ अॉगस्ट पर्यंत लॉकडाऊन असल्याने सार्वजनिक  सण-उत्सव साजरा करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले असुन ईच्छा असुनही वर्षभर राबणाऱ्या आपल्या बैलांना सजवुन त्यांची मिरवणुक काढता येणार नाही याची हुरहुर शेतकऱ्यांना लागली आहे. त्यामुळे हा सण केवळ औपचारिकता म्हणून साजरा होण्य...

युद्ध आमुचे सुरूच

या शतकातील सर्वात मोठया आव्हानाचा सामना सध्या भारत करत आहे. हे आव्हान आहे कोरोना महामारीचे. भारतात कोरोना रूग्णांची संख्या १९ लाखाच्या आसपास गेली आहे आणि ३९ हजार मृत्यू झाले आहेत. कोरोनाचा आलेख ज्या प्रमाणात वाढत आहे त्याच प्रमाणात किंबहुना त्यापेक्षा जास्त रिकव्हरी रेट सुद्धा वाढत आहे ही दिलासादायक बाब आहे. हा लेख लिहीपर्यंत यापैकी १२ लाखाच्या आसपास रूग्णांनी कोरोनावर मात केली असल्याने रिकव्हरी रेट ६३ टक्के झाला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात या देशाला वाचवण्याचे आणि सोबत अर्थव्यवस्थेला सावरण्याचे दुहेरी आव्हान कधीच ऊभा टाकले नव्हते. मोदी सरकारने या अभूतपूर्व संकटाचा सामना करताना कुशल नेतृत्वाचा परिचय दिला आहे. भारताची मोठी लोकसंख्या, तिची घनता आणि गरीबीचे आव्हान असताना सुद्धा या महामारीचा सामना करताना ईतर देशांच्या तुलनेत चांगले प्रदर्शन केले आहे. कोरोना महामारी विरूद्ध हे युद्ध सुरूच असून या नेतृत्वासोबत भारत हे युद्ध जिंकुन पुन्हा नव्याने ऊभा राहिल.  जगाला जसा महामारीचा इतिहास आहे तसा भारतालाही आहे. बरोबर शंभर वर्षांपूर्वी भारतात १९१८ ते १९२० च्या दरम्यान इंफ्लूएंजा महामारीन...