मुख्य सामग्रीवर वगळा

युद्ध आमुचे सुरूच



या शतकातील सर्वात मोठया आव्हानाचा सामना सध्या भारत करत आहे. हे आव्हान आहे कोरोना महामारीचे. भारतात कोरोना रूग्णांची संख्या १९ लाखाच्या आसपास गेली आहे आणि ३९ हजार मृत्यू झाले आहेत. कोरोनाचा आलेख ज्या प्रमाणात वाढत आहे त्याच प्रमाणात किंबहुना त्यापेक्षा जास्त रिकव्हरी रेट सुद्धा वाढत आहे ही दिलासादायक बाब आहे. हा लेख लिहीपर्यंत यापैकी १२ लाखाच्या आसपास रूग्णांनी कोरोनावर मात केली असल्याने रिकव्हरी रेट ६३ टक्के झाला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात या देशाला वाचवण्याचे आणि सोबत अर्थव्यवस्थेला सावरण्याचे दुहेरी आव्हान कधीच ऊभा टाकले नव्हते. मोदी सरकारने या अभूतपूर्व संकटाचा सामना करताना कुशल नेतृत्वाचा परिचय दिला आहे. भारताची मोठी लोकसंख्या, तिची घनता आणि गरीबीचे आव्हान असताना सुद्धा या महामारीचा सामना करताना ईतर देशांच्या तुलनेत चांगले प्रदर्शन केले आहे. कोरोना महामारी विरूद्ध हे युद्ध सुरूच असून या नेतृत्वासोबत भारत हे युद्ध जिंकुन पुन्हा नव्याने ऊभा राहिल. 
जगाला जसा महामारीचा इतिहास आहे तसा भारतालाही आहे. बरोबर शंभर वर्षांपूर्वी भारतात १९१८ ते १९२० च्या दरम्यान इंफ्लूएंजा महामारीने विक्राळ रूप धारण केले होते ज्यात  त्यावेळच्या भारताच्या लोकसंख्येच्या ५ टक्के म्हणजेच जवळपास १.७ कोटी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. ही संख्या जगात सर्वाधिक होती. यामुळे १९११ ते १९२० च्या दशकादरम्यान भारताच्या लोकसंख्या वृद्धिचा दर घटला होता. जवळपास एका शतकानंतर मार्च २०२० पासून भारताला कोविड-१९ मुळे अनेक आशंकाचा सामना करावा लागत आहे. ईथपर्यंत म्हटले गेले की, जर परिस्थिती गंभीर झाली तर भारतातील जवळपास ६० टक्के लोक (८० कोटी) संक्रमित होवू शकतात.
मार्च मध्ये जेंव्हा आईसीएमआरचे अधिकारी निर्णय घेण्याच्या अवस्थेत नव्हते तेंव्हा केंद्राने आवश्यक पाऊले उचलुन संपूर्ण देशात कठोर लॉकडाऊन लागू केला. हे स्पष्ट आहे की, भारताने आपली आरोग्य व्यवस्था (बेड, पीपीई किट, टेस्टिंग किट) अधिक सक्षम करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून असे केले होते. महामारीच्या विरोधात दिर्घ लढाई लढण्यासाठी सरकारची क्षमता वाढवण्यात लॉकडाऊन ब-याच अंशी यशस्वी झाले. लॉकडाऊन काळात सरकारने वेगाने हालचाली करून आवश्यक सुविधा निर्माण केल्या. आत्तापर्यंत भारतात २ कोटी लोकांच्या टेस्टिंग झाल्या आहेत. या टेस्टिंग क्षमतेच्या बळावरच १९ लाख पॉझिटिव्ह प्रकरणांचा शोध घेता आला. लॉकडाऊन लागू करण्यात केंद्र सरकार आणि विविध राज्यांच्या प्रतिक्रियेवरही आपल्याला विचार करावा लागेल. केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या ६० दिवसांच्या काळात ४,००० पेक्षा अधिक मार्गदर्शक सूचना जाहिर केल्या. पंतप्रधानांच्या देखरेखीखाली जाहिर केलेल्या या अधिकाधिक मार्गदर्शक सूचनांमागे घरात असलेल्या नागरिकांपर्यंत आवश्यक सामानांची पूर्तता करणे हा हेतु होता.  
या महामारीची गंभीरता समजल्यानंतर सुरूवातीला केंद्र सरकारने परिस्थितीचा सामना करण्यासाठी पीपीई किटच्या अधिक उत्पादनावर भर दिला. या दरम्यान पंतप्रधान मोदी आणि संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेला वेळोवेळी संबोधित केल्याने या लढयाला जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले. जनतेची सहमती आणि सहकार्याशिवाय कोणताही देश २ महिने घरात बसु शकत नाही. अमेरिका आणि ब्रिटन मध्ये मात्र अडेलतट्टु नागरिकांमुळे लॉकडाऊनला विरोधाचा सामना करावा लागला. भारताच्या शहरी आणि ग्रामिण भागातील जनतेने मात्र सरकारच्या या निर्णयाप्रती कटीबद्धता दाखवली.
जेंव्हा भारतात कोविड-१९ चा प्रकोप सुरू झाला तेंव्हा एन-९५ मास्क आणि पीपीई किटच्या उत्पादनाची भारताची क्षमता अत्यंत मर्यादित होती. यांची अधिकाधिक आयातच केली जायची. केंद्रीय गृह मंत्रालयाने या उपकरणांची उपलब्धता करण्यासाठी ३० जानेवारीलाच अधिका-यांची एक समिती स्थापन केली होती. तेंव्हापासून भारतात स्वदेशी पीपीई किटच्या उत्पादनात उल्लेखनीय वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या २.२ कोटी पीपीई किटच्या ऑडरची पूर्तता करताना मे पर्यंत १.४२ कोटी पीपीई किटची निर्मिती करण्यात स्वदेशी उत्पादक सक्षम बनले होते. हा उद्योग ७००० कोटींची ऊलाढाल करेल असा अंदाज आहे. एका अहवालानुसार मार्च मध्ये भारतात दररोज ३,००० पीपीई किटचे उत्पादन होत होते मात्र जुन पर्यंत भारतात ८,००,७०० पीपीई किटचे उत्पादन दररोज होवू लागले. आत्तातर भारत पीपीई किटची निर्यात सुद्धा करत आहे.
आत्ताही कोरोनाचा धोका टळलेला नाही. तो आता ग्रामिण भागात आपले पाय पसरू पाहत आहे. भारतीय घटनेत आरोग्य हा राज्य शासनाच्या अखत्यारितील विषय असल्याने लॉकडाऊन नंतर विविध राज्यांनी या महामारीला रोखण्यासाठी केलेल्या उपायांचा परिणाम वेगवेगळा दिसुन आला. कुठे कोरोनाचा प्रकोप अधिक आहे तर कुठे कमी. दिल्लीचेच उदाहरण घ्या. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले होते की, ३१ जुलै पर्यंत दिल्लीतील कोरोना संक्रमितांचा आकडा ५.५ लाखांपर्यंत पोहचु शकतो. वेळीच केंद्र सरकारने मदतीसाठी पाऊले उचलली हे बरे झाले. राज्याच्या कंटेनमेंट क्षेत्राच्या धोरणात बदल केला गेला आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात आला. या दरम्यान राज्यात कोविड-१९ केअर सेंटर्सची संख्या वाढवुन बेडची क्षमता वाढवण्यात आली. याचे श्रेय केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांना द्यावे लागेल कारण त्यांनी वेळीच हस्तक्षेप करून राजधानीला वाचवले.
लक्षात घ्या, कोण्या औषधामुळे किंवा लसीमुळे जादुची कांडी फिरल्यासारख कोरोनाचा प्रकोप क्षणात थांबणार नाही. आता आपण ‘न्यू नॉर्मल’ अवस्थेतून जात आहोत ज्यात कोणी एक देश या आजारावर उपयोगी येणा‌-या औषधींचा संपूर्ण साठा गडप करू शकतो. जगातील अनेक देशांनी संभाव्य कोरोना लसीचा साठा अगोदरच मोठया प्रमाणात बुक करून ठेवला आहे. ही दिर्घकालिन लढाई असू शकते ज्यात कोण्या एका देशाची सरकार आणि जनतेच्या सहनशिलतेचा कस लागतो. आपण नागरिकांना प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. आवश्यक दक्षता सर्वांनी घेतल्यास निश्चितच या अभूतपूर्व संकटातुन आपण लवकरच बाहेर पडु.
-सुरेश मंत्री



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...