राजकारणाचे गुन्हेगारीकरण देशाला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर देशातील तत्कालीन नेत्यांनी देशात गांधीजींच्या स्वप्नातील रामराज्य आणण्याचा संकल्प केला होता.मात्र त्यानंतर तत्कालीन राजकीय पक्षांत खुर्ची मिळवण्यासाठी संघर्ष सुरु झाला , राजकीय पक्षांनी आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी गांधीवादी दृष्टीकोन नाकारल्यामुळे राजकारण आणि गुन्हेगारी यांचे घट्ट संबंध प्रस्थापित होण्यासाठी मदत मिळाली.जातीयवाद मिटवण्याच्या नावावर सुद्धा या प्रकियेला बळ दिले गेले.वर्तमान स्थितीत राजकारणाच्या गुन्हेगारीकरणात ज्या तिव्र गतीने वाढ होत आहे हे पाहून कोणीही म्हणू शकतो की आपण आपल्या देशात रामराज्य आणण्याचा मुळ ध्येयापासून पूर्णपणे भरकटलो आहोत. आजवर देशात राजकिय लोकांनी करोडो रुपयांचे घोटाळे केलेले समोर आले आहेत.या संदर्भात अनेक उदाहरणे आपल्याला घेता येतील.सुरेश कलमाडी यांच्यावर कॉमन वेल्थ गेम मध्ये १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप होता.त्यांना या बाबतीत तिहार जेलची हवा ही खावी लागली.माजी केंद्रीय दूर संचार मंत्री ए.राजा यांच्यावर टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात १ , ७६०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे.उत्तर...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.