मुख्य सामग्रीवर वगळा

खरंच ती सध्या काय करते.... ?



ती सध्या काय करते ? याची चर्चा आता सर्वत्र होताना दिसत आहे. आपल्याला निश्चितच असं वाटत असेल की मी एका मराठी चित्रपटाबद्दल बोलतोयनक्कीच नाही. तिच्याबद्दल जास्त बोलल जावू लागल ते दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर. कोपर्डीची दुर्दैवी घटना आणि ३ जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती होते त्यावेळी. ऐरवी मात्र ती कधी चर्चेत नसते तर कायम दूर्लक्षीत असते. ती सध्या काय करते या मथळ्याखाली कोणी आपल्या प्रेयसी बद्दल लिहिलकोणी आपल्या पत्नी बद्दल तर कोणी एखाद्या सशक्त राजकीय स्त्री नेतृत्वाबद्दल. होय मी बोलतोय ते अशा व्यक्तीबद्दल जी कुणाची मुलगीबहिणआईप्रेयसी व पत्नी या भुमिका निभावते तिच्याबद्दल. खरंच ती सध्या काय करते ती कोणत्या अवस्थेत आहे हा प्रश्न मला ही पडला आहे.

परिस्थिती खूप बदलली आहेतिची सर्व क्षेत्रातील भागिदारी वाढत चालली आहे असे फक्त आपण वर्तमानपत्रातटि.व्ही.चॅनलवर आणि राजकीय नेत्यांच्या तोंडून ऐकतो. आपल्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या तिचं उदाहरण देवून आपण तिच्यात झालेली प्रगती दर्शवितो. पण खर पाहिल तर काहीतरी अदभूत करणारी ती प्रत्येक काळात राहिली आहे. सिताद्रोपदीरजिया सुल्तानराणी दुर्गावतीराणी लक्ष्मीबाईअहिल्याबाई होळकर पासून ते इंदिरा गांधीसानिया मिर्झा पर्यंत. पण केवळ एवढ्यावरूनच तिच्या स्थितीत खूप बदल झालाय हे खरे वाटत नाही. सामान्यातली ती आजही होती त्याच अवस्थेत आहे. ती सध्या काय करते  तर चूल आणि मूल सांभाळते. एक चाकोरीबध्द जीवन जगते. ती घराण्याच्या प्रतिष्ठेपायी नव-याचा अन्याय सहन करतेतिचा शारिरीक छ्ळ केला जातोईच्छा नसतानाही तिचे तिच्या नव-याकडून लैंगीक शोषण केले जाते. आजही तिला गर्भातच मारलं जातआजही ती पुरुषप्रधान संस्कृतीच्या खाली दबली गेली आहे. आजही तिच्यावर समाजकंटकांची वासनांध नजर पडतेती अल्पवयीन असतानाही तिच्यावर बलात्कार केला जातो. आजही ती सुरक्षीत नाहीस्वत:चे संरक्षण करण्यात समर्थ नाही. आपण पुरुष मात्र तिची स्थिती बदलल्याच खोट चित्र उभा करतोय.

प्राचिन काळापासून भारतात पुरुषप्रधान संस्कृती आणि लैंगीक असमानता राहिली आहे. तिचे तिच्या कुटुंबाकडून आणि समाजाकडून कित्येक वेळा दमन केले गेलेतिच्यावर अगणित अत्याचार केले गेले. तिच्यासाठी प्राचिन काळापासून चालत आलेले चूकीचे नियम आणि पध्दतीला रुढी-परंपरेचे नाव दिले गेले. तिला आपल्या संस्कृतीने दुर्गा, आदिशक्तीलक्ष्मी या नावाने पुजल खरं मात्र तिला बंधनात जखडून ठेवल. प्राचिन भारतीय समाजात सतीची चाल, बाल विवाहविधवांचे केशवपनस्त्री-भ्रुण हत्याहुंडा प्रथा, देवदासी प्रथा होत्या. सोबत तिचे लैंगिक शोषण करणेकौटुंबीक हिंसाचार करणे सातत्याने चालायचे. मनुस्मृती सारख्या ग्रंथाने तर जणू तिचा माणुस म्हणून जगण्याचा अधिकारच काढुन टाकला. पुरुष प्रधान संस्कृतीने तिच्या सामाजिक आणि राजकीय अधिकारांवर म्हणजे कामाचे स्वातंत्र्यशिक्षणाचा अधिकार यावर बंधने लादली. राजाराम मोहन रॉय यांच्या अथक प्रयत्नांमुळे इंग्रजांना सतीची चाल बंद करावी लागली. ईश्वरचंद्र विद्यासागर, विनोबा भावेस्वामी विवेकानंदज्योतीबा फुले यांनी तिच्या सक्षमीकरणासाठी आवाज उठवलाप्रसंगी तत्कालीन समाजासोबत कडवा संघर्ष केला. विधवांचा पुर्नविवाह होत नसेत्यांना हालाखीचे जीवन जगावे लागे. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नांमुळे विधवा पुर्नविवाह अधिनियम १८५६ साली अस्तित्वात आला. दूसरीकडे शिक्षणापासून पूर्णत: वंचित असणारी ती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नांमुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली.

आजही तिची स्थिती फारशी हव्या त्या प्रमाणात बदलेली नाही. तिची गर्भातच तपासणी करून ती जन्माला येण्याअगोदरच हत्या केली जाते. हरियाणा सारख्या राज्यात मुलगी जन्माला येणे म्हणजे जणू पापच. स्त्री-भृण हत्येमुळे समाजातील लिंग गुणोत्तरात मोठी तफावत निर्माण झाली. तिची संख्या वाढावी म्हणून १९९४ ला लिंग परिक्षण प्रतिबंधक कायदा करण्यात आला. बीड जिल्हयात काही वर्षांपूर्वी झालेल्या मोठया प्रमाणावरिल स्त्री-भृण हत्येमुळे महाराष्ट्र बदनाम झाला. तेंव्हा कुठे शासन खडबडुन जागे झाले आणि या कायद्याची कडक अंमलबजाणी झाली. अनेक डॉक्टरवर या कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. तरी आजही काही महाभाग शेजारील राज्यात जावून लिंग परिक्षण करत आहेत. तिच्या अस्तित्वाची चाहुल लागताच गर्भातच तिची हत्या केली जात आहे. काही समाजात तिची संख्या त्याच्यापेक्षा कितीतरी कमी झाली आहे. सामाजिक असंतुलन निर्माण झाल्याने आज अशांना ती हवी आहे मात्र फक्त समाजाची गरज म्हणून. बाकी तिचा सामाजिक दर्जा काही बदललेला नाही.

                आजही ती सुरक्षित नाही. समाजकंटकांच्या वासनांध नजरा तिच्यावर खिळतात. तिच्या अनेक मैत्रीणींवर बलात्कार झाले आहेत. वासनांध झालेले हे स्वत:ला पुरुष म्हणवणारे षंढ आपल्या वासनेचे शमन करण्यासाठी ती अल्पवयीन असतानाही तिच्या शरीराचे लचके तोडतात. महाराष्ट्राच्या बाबतीत म्हटलं तर स्त्री-अत्याचाराच्या बाबतीत देशात तीसरा क्रमांक लागतो. २०१५ मध्ये एकूण ४,१४४ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले. स्त्री अत्याचारात २१ टक्क्यांनी वाढ झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातील ब-याच प्रकरणातील आरोपी हे पिडीतेच्या ओळखीचे होते. यातील अनेकांनी तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले होते. आजही आपण तिचे रक्षण करू शकत नाही, तिला इतर पुरुषांच्या वासनांध नजरेपासून वाचवू शकत नाहीत. काही आगळीक झाली तर आपली बेअब्रू होईल म्हणून तिचा आजही बालविवाह लावून जबाबदारी झटकली जाते. बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अनेक पालकांना वयात आलेल्या तिला आपल्या वृध्द आई-वडिलांच्या देखरेखीखाली सोडून ऊसतोडीला जाता येत नाही म्हणून तिचा बालविवाह लावून दिल्याची अनेक उदाहरणे मी माझ्या जिल्ह्यात बघितली आहेत. २००६ ला बालविवाह प्रतिबंधक कायदा होवूनही आजही अनेक ठिकाणी बालविवाह होत आहेत. अकाळीच या कळ्या खुरडल्या जात आहेत.

तिच्या लग्नासाठी आजही हुंडा दयावा लागतो. हुंडा प्रतिबंधक कायदा१९६१ करून्ही हुंडा पध्दत बंद होण्याचे नाव घेत नाही. आजही तिला मुलापेक्षा दुय्यम स्थान दिले जाते. प्रत्येकाला वंशाला दिवा म्हणून मुलगा हवाच. देशाच्या लोकसंख्येच्या ५० टक्के असणारी ती आजही सक्षम नाही. तिला लहानपणापासून स्वंयपाक बनवणे गरजेचे आहे हे शिकवले जाते मात्र तिला कमवणे गरजेचे आहे हे मात्र शिकवले जात नाही. तिला आपण आर्थिकदृष्टया सक्षम होवू देत नाहीत. वाईट रुढी-परंपरा बंद करायला आपण तयार नाहीत. आपली मानसिकता तिच्या बाबतीत आजही फक्त उपभोगाची वस्तू अशीच आहे. आपण आपली विचारधारा जर बदलली तरच देश बदलेलतीही सक्षम होईल. आपण म्हणतो ती सध्या काय करते  ती गर्भात असतानाच तपसली जाते. ती एखादीच अनेक यातनांतून जन्म घेते. ती हसतेबागडते आईच्या कुशीत पण तिच हे हसणं-बागडनं आईच्या कुशीतच संपत. वयाबरोबर तिच्यावर बंधने लादली जातात घराण्याच्या ईज्जतीच्या नावाखाली. ती गुलाम बनते पुरुष नावाच्या प्राण्याची. मग तो तिचा बाप असो, तिचा भाऊप्रियकर किंवा नवरा असो. या सगळ्यांकडून आपल्या पुरुषी अहंकारापायी केवळ तिचा वापर केला जातो. हल्ली ती फक्त गर्भातच नाही मारली जात तर रोज मारली जाते चूकीच्या रुढी-परंपरेने. तिच्यावर फक्त बलात्कारच केला जात नाही तर याचा फायदा घेवून राजकारणही केले जाते. काही राजकारणी तर यासाठी तिलाच जबाबदार धरुन आपली मुक्ताफळे उधळत आहेत. सध्या ती फक्त भाषणाचा विषय झाली आहे. आज अनेक जण विचारत आहेत खरच ती सध्या काय करते आजही ती हसते आहेलढते आहे पुरूषप्रधान संस्कृतीशीविनाकारण होणा-या स्पर्शाशीसमाजकंटकांच्या वासनांध नजरेशी. ती आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जगते आहे. ती अंतराळ्वीर झाली आहे, ती राजकारणात आली आहेती खेळाडू बनून देशाचे नाव उज्वल करित आहे. हेच पुरुषी षंढ आपल्या घरातील तिच्यावर अनेक बंधने लादून कुणा दुस‌‌-याच्या घरातील तिच्या बद्दल क्षणोक्षणी आजही विचारत राहतात की ती सध्या काय करतेखरंच ती सध्या काय करते....?

 -सुरेश मंत्री.

                                     

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...