मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आयुष्यावर बोलु काही

ज न्म आणि मृत्यू या दरम्यानच्या काळाला आपण आयुष्य असे म्हणतो. आजकाल माणसाचे जीवन किती धकाधकीचे झाले आहे. रहदारीच्या त्रासापासून कौटुंबीक   अडचणींपर्यंत मानवी जीवन हे ताणतणावाने भरले आहे. प्रत्येक जण सुखाच्या शोधात धावतो आहे मात्र सुख हे शोधून मिळत नसत. शिक्षणातील वाढत्या स्पर्धेमुळे बालपण हरवून गेल आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात अभ्यासाचा ताण सहन करावा लागत आहे. वर पालकाच्या अपेक्षांचे ओझे आहे . थोडे मोठे झालो नाहीत की करिअर बनवण्याचा ताण आणि नंतर कौटुंबीक जबाबदारी. आयुष्य कधी सरत जावून म्हातारपण आल हेच कळत नाही. आयुष्यात काहीतरी जगायच राहून गेल असं नंतर प्रत्येकाला वाटायला लागत पण गेलेला काळ कधी परत येत नाही. आयुष्याची सुरुवात होते ती बालपणापासून. आपल मुल ३ वर्षाच झाल की त्याच्या पालकांना त्याच्या भवितव्याची चिंता वाटायला लागते. आपल मुल जगाच्या वाढत्या जिवघेण्या स्पर्धेत टिकायला हवं ही प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. यात काही गैर ही नाही. मात्र इथे त्याच्या बालपणाचा बिलकुल विचार केला जात नाही. फक्त त्याने आपल्या अपेक्षा पूर्ण करायला हव्यात. त्याला नेमक काय हवयं...

रोखूया अन्न आणि पाण्याची नासाडी

                           रोखूया अन्न आणि पाण्याची नासाडी काही दिवसांपूर्वी मी एका लग्न सभारंभात गेलो होतो.पाहुण्यांच्या जेवणासाठी बुफे पध्दतीची व्यवस्था करण्यात आली होती.तेथे मोठया प्रमाणावर ताटात अन्न उष्टे टाकण्यात आले होते तर दूसरीकडे पाण्याच्या बाटल्यातील पाणी संपलेले नसतानाच त्यांची विल्हेवाट लावण्यात येत होती.अन्न आणि पाणी या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत आणि याप्रती आपण एवढे संवेदनशिल नसू तर साहजिकच आपले आपल्या निष्काळजिपणावर लक्ष वेधायला हवे.आपण अन्नाच्या प्रति किती असंवेदनशिल आहोत हे आकडेवारीवरून आपल्याला लक्षात येईल.आकडेवारी असे सांगते की, जगात जेवढे अन्न बनते त्यापैकी एक तृतीयांश म्हणजे १ अरब ३० कोटी टन अन्न वाया जाते.एकीकडे संपन्नता वाढत असताना आपण अन्नाचा काळजीपूर्वक वापर करणे विसरत चाललो आहोत. विश्व खादय संघटनेनूसार जगात दररोज २० हजार मुले उपाशी पोटी राहतात मात्र ही आकडेवारी यापेक्षाही अधिक असू शकते.भारताच्या बाबतीत म्हणायचे झाले तर भारतात अनेक लोक उपाशी पोटी दिवस काढतात.आपल्याकडे एखादा लग्न सभारंभ ...

गुंफण नात्यांची

गुंफण नात्यांची मानवाच्या जन्माबरोबर तो अनेक नात्यांच्या बंधनात बांधला जातो.यापैकी काही नाती ही रक्ताची असतात.आई-वडिल , भाऊ-बहिण , आजी-आजोबा अशी अनेक नाती जन्माबरोबर आपोआप निर्माण होतात.या नात्यांमुळे कुटुंबाची निर्मिती होते.अनेक कुटुंब मिळून समाजाची निर्मिती होते आणि अनेक समाजांच्या सुमधुर नात्यांच्या परंपरेने देश बनतो.प्रत्येक नात्यांचा आधार ही संवेदना असते.संवेदना अर्थात सम आणि वेदना म्हणजे सुख आणि दु:ख मिळून तयार झालेले रूप जे आयुष्यातील ऊन –सावलीच्या भावनांशी ओळख करून देत.रक्तांची नाती तर जन्म घेताच मनुष्यासोबत स्वत:च जुडतात परंतू काही नाती काळासोबत आपल्या अस्तित्वाची जाणिव करून देतात.दोस्त असेल अथवा आपला शेजारी , वर्गमित्र असेल अथवा आपला सहकारी किंवा गुरू-शिष्याचे नाते.या नात्यांच्या सागरात सर्वजण आपसातील प्रेम आणि आणि भावनांच्या लाटेत डुंबत असतात.आपलेपणाची हीच भावना मनुष्याच्या जीवनाला सबळ आणि सार्थक बनविते अन्यथा मनुष्याला एकाकी जीवन जगणे कठिण आहे.सुमधूर नातीच मानवात मानवतेची निर्मिती करतात. मानवी जगात एक दुस-यांसोबत जुडले जाण्याची भावनेची जाणिव यालाच नाती म्हणतात , ...

हिंदू नवर्षाची महिमा आणि वर्तमानकालिन आव्हाने

हिंदू नवर्षाची महिमा आणि वर्तमानकालिन आव्हाने सणांचा देश अशी ओळख असणा-या भारतात हिंदू नववर्ष अर्थात गुढी पाडव्याचे खास असे महत्व आहे.चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला हा सण येतो.याच सणाला ‘उगादी’ असेही म्हणतात.याच दिवसापासून हिंदू नविन वर्षाची सुरुवात होते.अस म्हणतात की , शालिवाहन नावाच्या एका कुंभार पुत्राने माती पासून बनविलेल्या सैनिकांच्या सेनेचा उपयोग करून शत्रुंचा पराभव केला होता.याच विजयाचे प्रतिक म्हणून शालिवाहन शकेची सुरुवात या दिवसापासून होते.आंध्र प्रदेश आणि कर्नाटक मध्ये हा सण उगादी या नावाने साजरा केला जातो तर महाराष्ट्रात हा सण गुढी पाडवा या नावाने साजरा करतात.अस म्हणतात की , याच दिवशी ब्रम्हा ने सृष्टीची निर्मिती केली होती म्हणून याच दिवसापासून नव संवत्सर ही सुरू होतो. शुक्ल प्रतिपदेचा दिवस चंद्राच्या कलेचा प्रथम दिवस मानला जातो. जर देशभरात प्रचलित परंपरांच्या बाबतीत म्हणायचे झाले तर , आंध्रप्रदेश , कर्नाटक आणि महाराष्ट्रात घरांना आंब्याच्या पानांचे तोरण लावून या दिवशी सजवतात.याच दिवशी महान गणित तज्ञ भास्कराचार्य ने सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत दिवस , महिन...

गरज मुलींची विचारधारा बदलण्याची

का ही   दिवसांपूर्वी माझ्या एका दूरच्या नातेवाईकांकडे गेलो होतो. तेंव्हा त्यांनी सांगितले की ,  ते आजकाल खूप परेशान आहेत कारण त्यांच्या मुलाचे लग्नच होत नाहीयय. खरंतर त्यांच्या मुलाला चांगला जॉब आहे आणि तो दिसायलाही सुंदर आहे. मी त्यांची ही अडचण ऐकुण थोडा हैराण झालो. जेंव्हा मी लहान होतो तेंव्हा लोकांना यासाठी परेशान बघितल होत की ,  त्यांच्या मुलीचे लग्न होत नाहीयय. तेंव्हा मुलाचे बाप मात्र ताठ मान करून फिरायचे. मुलींच्या लग्नावर कितीतरी म्हणी बनलेल्या आहेत. एका काळात असं मानल जायच की ,  मुलगा म्हणजे जणू पूढील काळातील चेक आहेत जेंव्हा पाहिजे तेंव्हा वटवा. म्हणजे फायदाच फायदा. मात्र आता परिस्थिती विपरीत झाली आहे. आता मुलांचे वडिल ही असेच परेशान आहेत जसे मुलींचे बाप राहत. याला कारण ही तसेच आहे. एकीकडे मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत कमी होत आहे तर दूसरीकडे मुलींच्या स्थितीत बराच बदल झाला आहे. आता ही गोष्ट राहिली नाही की ,  मुलीला विचारल्या शिवाय तिचे हात कुणासोबत ही पिवळे करावेत. आता त्या शिक्षण आणि आपल्या करिअरला अधिक प्राथमिकता देतात. लग्न ही त्यांची प्राथम...